सेकंड लाईफ - भाग ५
या अगोदरचे भाग :
सेकंड लाईफ
सेकंड लाईफ - भाग २
सेकंड लाईफ - भाग ३
सेकंड लाईफ - भाग ४
-----------------------------------------------
आज लवकरच उठलो. उठलो म्हणावं तर झोप तरी नीट लागली होती का ? नाहीच म्हणायला पाहिजे.
लवकर लवकर आवरुन घराबाहेर पडलो. आई बाबांना रात्रीच सांगीतलं होतं की सकाळी लवकर जाणार आहे आणि २-३ दिवस बाहेरच रहावे लागेल म्हणून.
रिक्शा पकडून एसटी स्टँडवर पोहोचलो.
उंच उंच झोका
झुला, झोपाळा, पाळणा प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. सुगंधी, रंगीबिरंगी हारा-फुलांनी सजून, फिरत्या भिंगरीच्या खेळण्याच्या गमतीत, ठरलेले नाव फुला-रांगोळ्यांसह गुपित सांभाळत, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या च्या सुरेल लयीत, बाळाचे नाव पाळण्याच्या कुशीत, पाळण्याच्या साक्षीने बाळाच्या कानात ऐकवून प्रचलित केले जाते. पाळणा गीताच्या सुरांवर बाळाच्या उंच झोक्यांची सुरुवात इथूनच होते. अशा प्रकारे अगदी बालपणापासूनच पाळण्याची संगत प्रत्येकालाच लाभलेली असते.
वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे पाहण्यात येतात.
एक ओपन व्यथा भाग ९ (अंतिम)
शेवटच्या भागाच्या निमित्ताने.....
१. खरं तर अश्या प्रकारची लेखमालिका लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न. त्यामुळे ह्या मालिकेत नक्कीच काही उणिवा राहिल्या असतील. पुढच्या वेळेस त्या नक्की सुधारेन.
२. हे संपूर्ण लिखाण अज्जिब्बात म्हणजे अज्जिब्बात काल्पनिक नाही. ह्यातील प्रत्येक घटना मी एक तर अनुभवलेली आहे किंवा पाहिलेली आहे किंवा वाचलेली तरी आहे. मुद्दामच मी कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख टाळला आहे.
३. हे लिखाण कोणाही जातीच्या वा धर्माच्या विरोधात नाही. एक साधारण ओपन व्यक्तीही किती हतबल होऊ शकते ह्याचं उदात्तीकरण मी केलं असं म्हटलं गेलं तरी मला ते मान्य असेल.
गो गोवा... भाग २
गो गोवा... भाग १
११:३० ला येणारी मंडळी बरोबर १२:३० ला माझा दारात होती. तासभर माझा जीव टांगणीला लागला होता. घरच्या बॉस सोबत पुन्हा आश्वासनांची उजळणी करून मी घरचांचा निरोप घेतला.
गाडी जवळ आलो तर माझे तिन्ही परम मित्र माझी गळाभेट घ्यायला आतूर होते आणि मी ही. गाडी पण सांगितल्याप्रमाणे नवीन होती. गाठीभेटी झाल्यावर गाडीत बसायला लागलो तर तिथे मागच्या सीट वर कोणीतरी पांघरुणात लपलेल होत. मी हळूच विन्याकडे पाहिल आणि खुणावलं,
" कोण?".
"अरे तो आपला ड्राइवर आहे", विन्या.
"ड्राइवर?
स्टँबिलाईझ्ड
निष्काम ,निष्फळ सर्फींग
निरिच्छ,निरंतर श्वसन
हवेतही स्तब्धता
ना हसू न आसू
ना खेद न मोद
स्टँबिलाईझ्ड
मनात कसलीच इच्छा नसण
यासारख सुख नाही
गोष्टी घडत राहतात
लेट देम हँपन
तिथे गणपतीचे डेकोरेशन सुरू आहे
मला ते करावस वाटत नाही
एखादा व्याख्याता बोलवावा का प्रबोधनासाठी?
लोक स्मार्ट आहेत .त्यांना गरज नाहीये.
कुणालाही कसलीही गरज नसावी.
इच्छा म्हणजे स्वार्थ
बादलीयुद्ध ८
खिंडारात तर आजकाल कुणीही सापडतं. गावभर चर्चा वगैरे होते तो भाग वेगळा. मुळात खिंडारात कुणीही गेलं प्रेमाचे नवेनवे अविष्कार साजरे होतात. बर, बघणारे त्यावेळी तिथेच कसे हजर असतात हा ही मला प्रश्न आहे. परवा रात्री म्हणे तिथे निलम सापडली. नक्की कशाला गेलती किंवा नक्की कोणत्या पोझिशनमध्ये सापडली याचे डिटेल्स अजूनतरी आलेले नाहीत.
मी काय अमोलची गाठ घेतली नाही. त्याला काही विचारलंपण नाही. उगाचंच त्याला डिवचणे योग्य नव्हते.
अमोल एकतर फारंच लुकडा. डोक्यालापण अर्धवट टक्कल पडायला सुरुवात झालेली.
रम्य त्या बालपणीच्या आठवणी
रम्य त्या बालपणीच्या आठवणी.
सर्व सामान्य माणसाच्या जीवनाचे, विशेष असे कांही भाग किंवा टप्पे असतात.
हरवलेलं विश्व (भाग ६) शेवटचा
हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836
हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891
हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920
हरवलेलं विश्व (भाग ४): http://www.misalpav.com/node/36944
हरवलेलं विश्व (भाग ५): http://www.misalpav.com/node/36968
भाग ६
वातावरणातला गारवा आणि रात्र होत आल्यामुळे असेल पण गावतल
भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला
(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि तिच्या चाह्त्यांनीच तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली )
ज्ञान प्राप्तीसाठी भगवान बुद्ध कठोर तपस्या करत होते. उग्र तपस्येमुळे त्यांचे शरीर हाडांचे पिंजर झाले. पण त्यांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. वीणेची झंकार ऐकून त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. सुजाताच्या हातची खीर प्रश्न करून ते ध्यानमग्न झाले. त्यांना ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्ती साठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शरीर हे गरजेचेच.
मिसळपाव