गाडीला ब्रेक हवा
जी साधने आपण वापरतो. ती घेऊन आपण जसे सुस्साट धावत सुटतो तसेच कुठे थांबायचे याचेही भान हवे. कॉम्प्यूटर हा आज आवश्यक भाग बनला आहे. त्याचे अगणित उपयोग आहेत. आपल्या अनेक कामात आपण त्याचा वापर करून घेतो. त्याला इंटरनेटची जोड दिल्याने तर गाडी एकदम सुपरफास्ट धावू लागली आहे. पूर्वी एक निरोप देण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज पडायची. त्या ऐवजी ते काम एका एसएमएस ने होऊ लागले आहे. वेळ खूप वाचू लागला आहे. कंप्यूटर अनेक कार्यालयामधे वापरणे सुरु झाल्याने कामे सुकर झाली आहेत. लाईफ बीकेम ईझियर. मात्र गरजेसाठी ही साधने आहेत हे भान राहत नाही. नीड आणि ग्रीड यातला फरक बर्याच लोकांच्या लक्षात येत नाही.
मिसळपाव