Skip to main content

समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 04/05/2024 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
“लोकांना समुद्र का आवडतो? याचे कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते.असं कुणी तरी म्हटलं आहे. माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं. समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण आहे.

महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 04/05/2024 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी काल प्रो. देसायांना म्हणालो, “रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत. या सूडाच्या भावना,वैयक्तिक वेदना आणि दु:ख यांचा एक समूह आहे.

सेपियन्स-(ऐसी अक्षरे -१७)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 04/05/2024 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
ट युवल नोव्हल हरारी हे नाव आता कोणाला माहित नाही हे फार कमी आहे. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? येताना काय काय मागे सुटले आहे ?काय काय गाठोड घेऊन इथे आलो आहोत? ते गाठोड आहे का ते ओझं आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा माणूस एका झटक्यात (ह्या पुस्तकात) देतो.

लपविलास तू हापूस आंबा -- विम्बल्डन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 04/05/2024 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
“सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच पाऊस येईल.केरळात पाऊस पडायला लागला.दहा जून पर्यंत पाऊस मुंबईला येईल.बाजारात निरनीराळे प्रकारचे आंबे दिसत असतील.

माझं challenge (आव्हान)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 04/05/2024 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण.ये.ते हा माझा लेख वाचत असताना किंवा वाचून झाल्यावर ,माझ्या आईची आठवण येऊन ही “ माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही किंवा मला हुंदका आला नाही” असा एखाद्या ही वाचकाने प्रतिसाद द्यावा.असं मी आव्हान करतो.Challenge देतो.

हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 03/05/2024 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्‍या सोबत असायच्या. मी बकर्‍या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.

आ. ई. तु झी. आ. ठ. व. ण. ये. ते

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 03/05/2024 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली! “आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)” म्हणजेच, “अगं मी येते!, अरे मी येते!

आवेग हृदयाचा की मनाचा असावा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 03/05/2024 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
आवेग हृदयाचा की मनाचा असावा मी श्री समर्थांना म्हणालो, “कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात . तसंच असेही लोक असतात जे फक्त उदिष्ट सफल करण्याचा जुजबी प्रयत्न करत असतात.आणि नंतर ठराविक वेळ प्रयत्न करून झाल्यावर ते प्रयत्न करायचं सोडून देतात. आणि निश्चिंत होतात. खूप उशीर होईपर्यंत ती व्यक्ती स्वतःला बांधून ठेवत नाही. किंबहुना,त्याने कधी थांबायचं हे त्याला माहीत असतं, कारण तो त्याची शक्ती, वेळ आणि स्वत:ची भावना ओळखून असतो.

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 03/05/2024 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/05/2024 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं प्रीतीच्या मार्गी भिंत आणणार्यानो कुणी सांगेल कां ही भिंत दूर करूं कशी नैराशेत जखडलेली गीतें असती अनेक मनाचे गीत-वाद्द तुटतां गीत गाऊं कसे नैराशेचा बोझ असेना, पेलता येतो जीवनच बोझ असता,पेलवूं कसा प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं
काव्यरस