Skip to main content

एक अनुभव

लेखक अहिरावण यांनी मंगळवार, 23/04/2024 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात. आणि अवशेष दणादण डोक्यावर कोसळत पडतात. खिशात मोजून ४०० रुपये. घरात सामान आणायचे तर दोन हजार तरी लागतील. मोबाईल वगैरे तेव्हा नव्हते पण दूरध्वनीचे बील भरणे भाग. करंट खात्यावर शेवटचे साडेचार हजार पडलेले.

माझे खाद्य प्रयोग: बिन ऑईल कढ़ी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 22/04/2024 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. आजकल तुम्हाला खाण्याचे डोहाळे खूप लागतात म्हणत, माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. पण आज सोन्याचा दिवस उगवला. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 ची असते. आज तिची बीसी होती. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा, तंबोला इत्यादी. मुख्य कार्यक्रम मनाला आनंद देणारा सांस्कृतिक आदान - प्रदान,. याशिवाय आज चिरंजीव ही ऑफिसला जाणार होते.

आजचा मेन्यू -४ मोड आलेल्या मेथी दाण्यांची भाजी

लेखक Bhakti यांनी सोमवार, 22/04/2024 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
A मला जादूचा डब्बा मिळाला.आणि डाळींना मोड आणणे हा कंटाळवाणा कार्यक्रम आनंददायी झाला.खाकराचे जे पसरट गोल डब्बे मिळतात ते वापरून मूग आणि मेथी दाणे याला मस्त मोड आले.भिजलेले दाणे टाकून दर रात्री पाण्याचा थोडा शिपका त्यावर मारायचा.तिसर्या दिवशी डब्याला खुलजा सिम सिम केलं की छान छान मोड दिसतात. १.वाटीभर मे

एक लघुकथा.

लेखक भागो यांनी सोमवार, 22/04/2024 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक लघुकथा. उन्हाळ्यातल्या एका संध्याकाळी ते त्याला गच्चीवर घेऊन गेले. तिथून त्याला पदुआ शहराचा देखावा दिसत होता. संध्याकाळ सरली आणि अंधाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले. आकाशात सर्च लाईट टाकले जात होते. बरोबरचे दारुच्या बाटल्या आणण्यासाठी खाली गेले. गच्चीत आता फक्त तो आणि लुझ होते. लुझ बेडवर बसली होती. ती फुलासारखी टवटवीत दिसत होती. तीन महिने लुझ नाईट ड्युटी करत होती. सगळेच खुश होते. त्याच्या शस्त्रक्रियेची वेळ आली, लुझ त्याला शस्त्रक्रियेसाठी तयार करत होती. शस्त्रक्रियेच्या टेबला वर सुद्धा त्यांचे शत्रू आणि मित्र ह्याबद्दल जोक चालूच होते.

हृदयसंवाद (२) : हृदयरचना आणि कार्य

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 22/04/2024 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ... .. .. .. या लेखात आपण हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान, त्याची बाह्य व अंतर्गत रचना आणि त्याचे रक्ताभिसरणातील मध्यवर्ती स्थान यांचा आढावा घेऊ. मूलभूत रचना व कार्य हृदय आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये मधोमध वसलेले असून ते थोडेसे डाव्या बाजूस झुकलेले आहे. एखाद्या बलदंड पैलवानाच्या एका मुठीत मावेल एवढाच त्याचा आकार आणि वजनही जेमतेम 300 ग्रॅम. खालील चित्रात हृदयाची अंतर्गत रचना दाखवलेली आहे.

एक अचानक मिपाकट्टा : चिंचवड

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 19/04/2024 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रगुप्त, बबन तांबे आणि मी अर्थात चौथा कोनाडा यांचा अचानक ठरलेला पाषाणचा मिनी कट्टा झकास झाला होता. कट्टा संपताना मी चित्रगुप्तांना चिंचवडच्या मोरया गोसावी समाधी मंदिर आणि सुमारे तीनशे वर्ष जुन्या अशा मंगलमूर्ती वाड्याबद्दल माहिती सांगितली. माहिती त्यांना खूपच रोचक वाटली. ते म्हणाले "योग जुळून आले तर एखादा दिवस मंगलमूर्ती वाडा पाहायला नक्की येईन" मला या शनिवारी सुट्टी होती त्यामुळे माझी शनिवारची सकाळ मोकळीच होती. आदल्या रात्री चित्रगुप्तांशी संपर्क साधला आणि उद्या जमेल का असा विचारलं…. आणि चित्रगुप्त यांनाही वेळ होता. योग जुळून आले !

जैवज्ञाता श्लोक-१

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 19/04/2024 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी एक कोर्स करत आहे.त्यात मी शांतीसाठी लिखाण करते आणि लिखाणाच्या फ्लोमध्ये एकरूप होते आणि बाकी सर्व भूत-भविष्य विसरते,असे नमूद केले आहे.तेव्हा मिळालेल्या सूचनेनुसार गीतेतील श्लोक वाचून समजून मी अर्जूनाला कसे समजवले असते.याप्रमाणे लिहायचे असं सुचलं.आधी मी केवळ मतितार्थ लिहिणार होते.बाजूलाच प्रगोचा अफलातून धागा आहे.तर म्हटलं आपणही जरा विज्ञान-अध्यात्म ब्लेंड करावा.. अल्प प्रयत्न...चुभूद्या...

हृदयसंवाद (१) : प्रास्ताविक व स्वागत

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 18/04/2024 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
सन 2018 मध्ये मी आपल्या आणि अन्य एका संस्थळावर “ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’वर शिक्कामोर्तब“ हा लेख लिहिला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023मध्ये ध्यानीमनी नसताना त्या लेखाच्या एका वाचकांनी अन्यत्र स्वतःच्या हार्ट अटॅकसंबंधी अनुभवकथन केले. त्यात त्यांनी ट्रोपोनिनच्या त्या लेखाचा जीवरक्षक म्हणून उपयोग झाल्याचे नमूद केले. ते वाचून आनंदयुक्त समाधान वाटले. त्या निमित्ताने हृदयविकारावर अनेकांशी व्यक्तिगत संपर्कातून ओझरती चर्चा झाली.

एक एकटा एकांत

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 18/04/2024 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
यावेळी काही तू भावला नाहीस. . . दरवेळी आगोशमे घेण्यासाठी रुंद हात पसरुन बोलावणारा राकट सगा जणु विरक्त वाटला, की माझचं मन खट्टू असल्यानं लांबच राहीलास रे. . इतका कोरडेपणे वागलास जसं की सोपस्कारापुरतं तळव्यांना गुदगुल्या करत वाहुन जाणार्‍या वाळूशीच फक्त तुझी बांधिलकी. बोटांच्या बेचक्यातुन अलगद झिरपुन जाताना मागमूसही राखत नाही काही क्षणापुर्वीच्या आर्द्र आलिंगनाचा! हे असे वाहते राहण्याचा काळ सरुन गेला अन् सदा सोबतीचे हक्काचे इमले साकारल्याचा फुकाच म्हणावा असा विश्वासही वाटायला लागतो तोच पुन्हा सगळं निसटुन जातय असं वाटत.