Skip to main content

हिवाळी अधिवेशन -मित्रपक्षांचीही नाराजी ? शेतकरी आत्महत्यांवर काय करणार?

लेखक अनिकेत एस जोशी यांनी सोमवार, 07/12/2015 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
नागपुरात सध्या हलक्या थंडीची सुरुवात झालेली आहे. सकाळच्या वळेत एखादा स्वेटर चालू शकेल इतपतच थंडी आहे. सोमवारपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते आहे आणि त्यासाठी इथे दाखल होणाऱ्या मुंबईकरांना ही थंडी आल्हाददायक नाही वाटली तरच नवल. वातावरण पुढे अधिकाधिक थंड होणार आणि राजकारण मात्र गरमागरम होत जाणार असे नागपूरच्या अधिवेशनाचे वैशिष्ठ्यच आहे. तसेच यंदाही घडते आहे. गेली अनेक वर्षे प्रत्येक मुख्यमंत्र्यांना मनात कुठेतरी एका कोपऱ्यात नागपूरच्या अधिवेशनाची भीती वाटावी अशीच स्थिती राहिलेली आहे.

मला आवडलेला विनोद

लेखक भंकस बाबा यांनी रविवार, 06/12/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट. एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले. गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली. बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले. "अरे त्या गाईला पहल्यान्दा थोपटायचे असते.

कोपरयातलं रोपट.

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 06/12/2015 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कॉलेजला नुकत्याच सुट्टया लागलेल्या होत्या. सगळं चंबुगबाळ घेऊन गावी निघालो होतो. पेपर संपल्यानंतरची खुशी काय वर्णवावी! रिझल्ट लागेपर्यंत का होईना ती टिकून राहते. बसस्थानकात अत्यंत स्वच्छ, मोकळी बस मझ्यासाठी उभी होती. 'प्रवासी हेच आमचे दैवत' हे सिद्ध करणारा तेजस्वी,हसरया चेह्रयाचा कंडक्टरही लाभला होता.कंदमुळे खाऊन या कंडक्टरने कोणालाही कंप सुटावा अशी तब्येत मिळवली असेल असे वाटले. अदबीने तिकीट फाडुन माझ्याकडे दिले गेले .नेहमीप्रमाणे अखिल भारतीयांना सतावणारा सुट्टया पैशांचा प्रश्न त्यालाही भेडसावत होता हे कळाले.

विश्वाचे आर्त - भाग ३ - अस्तिस्तोत्र

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 06/12/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
"समुद्राचा विस्तार निश्चल आहे. त्याच्या किनाऱ्यावरील क्षारांच्या खडकांत मृत आकृती जन्म घेतात, प्रतिबिंबांत आपल्या खुणा उमटवतात. परंतु त्यामुळे समुद्रात विचलता येत नाही. त्याला भरती नाही म्हणून त्याला ओहोटीही नाही. त्याच्यात जन्माचा स्फोट नाही त्यामुळे मरणाचे विसर्जनही नाही. त्याला मृत्यूची भीती नाही, त्यामुळे मृत समुद्र अमर आहे. त्यालाच चिंतन नाही, कारण त्याच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे. आता समुद्र केवळ आहे." जी. ए. कुलकर्णी, ‘अस्तिस्तोत्र’ - सांजशकुन, पॉप्युलर प्रकाशन. ----- जी. ए. कुलकर्णींच्या कथांमध्ये आपल्याला एका अजब विश्वातून भरकटवत नेण्याची शक्ती आहे.

उर्फी-मराठी चित्रपट

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 06/12/2015 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान हे प्रथमेश परब (आपला टाईमपास मधला दगडू) आणि नवीन तारका मिताली मयेकर यांना नवीन चित्रपटात घेऊन आले आहेत. मराठी चित्रपटाचा जीव म्हणजे "प्रेम" तर यात आहेच पण या बरोबरच मैत्री, कुंभमेळा आणि दहशवाद असल्या पूर्णपणे विरुद्ध कोनी विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो. प्रयत्न चांगला असला तरी प्रेक्षक कितपत स्वीकारतात हे बघणेबल राहील. विक्रम प्रधान किंवा स्वत: प्रथमेश परब या दोघांपैकी कुणीतरी किंवा दोघेही अजूनही "दगडू" या व्यक्तिरेखेच्या अमलाखालीच असावेत असे वाटते. या चित्रपटातली 'देवा' ची एन्ट्री पासूनच अनेक प्रसंगात दगडूची छाप व्यक्तिरेखेवर अनेकदा जाणवते.

सिंहलव्दीपाची सहल : ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 06/12/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

वाहतं वारं

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/12/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
[ या आधीचा भाग: www.misalpav.com/node/33741 . तशी ती ही एक स्वतंत्र कथा होती आणि ही पण स्वतंत्र आहे. ] ________________________________________________________________________ टिपूर टिपूर चांदणं वढ्यामधी पडलयं. गढाळल्यालं पाणी खळबळ करुन वाहतयं. केक्ताडात बसून सुभान्या वगळीकडं बघतोय.सुताराचं म्हातारं वाट तुडवतं उतरणीला लागतं. पिशवी घीऊन जवा सुभान्यापशी येतं तवा हातातलं पुडकं त्येच्या हवाली करतं. भर अंधारात चिलीम जळत राहते. सुभान्या अंधारच पिऊन टाकतो. नशेत ऊठून चालत चालत सुभान्या भैरुबाच्या टेकाडावर येतो.

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी रविवार, 06/12/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.

रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना....

लेखक कविता१९७८ यांनी रविवार, 06/12/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना विसरते मी दिवसभराचे सर्व कष्ट तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या आईचाही तिरस्कार करु शकतोस तिथे दुसर्‍या बायकांची काय बिशाद तरीही तुझ्याकडुन सन्मानाची वेडी आशा केलीच मी आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु तरीही जा तुला माफ केले कारण एक आई दुसर्‍या आईच्या कुसेचा अवमान करुच शकत नाही..
काव्यरस