असचं काहीतरी
पप्पूने इन्फ़िल्ड ला किक मारली ,नारायण पेठेतली एवढीशी गल्ली,इफील्डचे इंजिन रोंरावू लागले
मग फिल्मी स्टाईल ने पाय फिरवून पप्पू गाडीवर बसला, नेहमीप्रमाणे आपली सर्व समावेशक नजर अवतीभवती टाकली रजनीकांत सारखा गोगल डोळ्यासमोर धरून त्यातल्या प्रतीबिम्बातून पाठीमागे काय चाललाय ते पाहिले, मग सर्र कन फिरवून डोळ्यावर चढवला, दारातून आत नजर फेकली तर आजी काहीतरी बडबड करत धडपडत येतांना दिसली .
आजी काय म्हणतेय ते गाडीच्या फायरिंग मध्ये काहीच कळेना.मग चावी फिरवून इंजीन बंद केले.
"काय म्हणतेस, आजी .
मिसळपाव