चित्रा
लेकीच पहिलं बाळंतपण! आपल्याच घरी व्हावं म्हणून आईने खूप प्रयत्न केलेले पण लेकीच्या सासरच्यांनी, 'कशाला त्या गावखेड्यात? तित काय येळला सोयी-सुविधा हायेत, का रातीअंधारचं गाडी-घोडा आहे? शिवाय एकली आई आन म्हातारी आज्जी. त्यांच त्यान्ला तरी उरकतयं का ह्ये परपंचाच ऱ्हाटगाडग?' अशा उलटतपासण्या करून बाळंतपण कुठे व्हाव हा विषय संपवून टाकला!
मग नातीने चिमुकले पाऊल सा-यांच्याच जगात ठेवल्यावर लेकीच्या आग्रहाखातर आठ-पंधरा दिवसांसाठी आई गावातल्या वावरातली विळा-खुरपी तिथेच सोडून शहरातल्या इमारतींच्या जंगलात आली. पहिल्यांदाच एकटी आलेली!
भयंकररस:२
आमच्या भागातला नामचीन गुंड
दारी माझ्या येई मते मागण्या
दगडी चेहरा तयाचा तो
सौजन्याने नुसता थबथबलेला
शुभ्र पांढरे तसेच कपडे
मागे कार्यकर्त्यांचा मेळा जमलेला
हात विनयाने की जोडलेले अन्
आवाजात उसना आपलेपणा आनलेला
जरी सोंग छान सारे अगदी वठलेले
मग्रुरी अन् माजोरीपणा न
डोळ्यांतला गेलेला
बोलणे-चालणे-अविर्भाव जरी आकर्षक
त्याचे
अजूनही वाटे तरी भयानक ते सारे मला
भयंकररस:१
सारा जन्म पोरी फिरवण्यात गेला
पोरींचा गराडा त्यास सदा पडलेला
दरवर्षी एखादी तरी पोरगी गटवतोच
असा त्याचा लौकिक आता झालेला
सहकारी शिक्षिकांवरही त्याचा तसा
नेहमीच अन् डोळा हा राहिलेला
जरा कुठे ओढणी हलली, पदर ढळला
लगेच त्वरे तिकडे तो पाहू लागला
विद्यार्थिनीप्रिय शिक्षकाचा शिक्का त्यावर
तरीही उजळमाथ्याने वावर त्याचा राहिला
नैतिकतेवर जेव्हा भाषण देई मंचावरुनी
भयानकच ते अगदी सारे वाटे मजला!
काव्यरस
एका बोक्याची गोष्ट -१
आमच्याकडे तीन वर्षापूर्वी मार्जार घराण्यातील एका राजपुत्राचे आगमन झाले.
शुभ्र पांढरा रंग आणि पाठीवर व शेपटीवर केशरी रंग.
फोटो टाकायचा आहे पण कसा टाकू ते समजत नाहीय.
असो...
तर या राजपुत्राचे म्हणजे आमच्या बोक्याचे स्वभाव वैशिष्ट्य जरा वेगळे आहे.
म्हणूनच मी सुरूवातीला त्याचा राजपुत्र असा उल्लेख केला.
त्याचा मूड सारखा बदलत असतो.
खाणे-पिणे, झोपणे, खेळणे, लाडात येणे या सगळ्याच बाबतीत त्याचं वागणं हे इतर मांजरांपेक्षा खूप वेगळं आहे..म्हणूनच ते तुम्हाला सांगावं असं वाटतयं..
चला तर मग सुरूवात करूया...
१. लहानपणी आमचा हा राजपुत्र दूध पित नसे...तर नुसती भाकरी खात असे...
कवितेवर केलेली कविता
*****कविता*****
कविता म्हणजे कवीजीवनाचे पहिले पान
कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान
कविता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतिबींब
कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंंब
कविता म्हणजे हरवत जाणारी वाट
कविता म्हणजे सुविचारांची पहाट
कविता म्हणजे तृणातील इवले फूल
कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल
कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा
कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा...
- निलम बुचडे.
काव्यरस
कट्यार पुन्हा काळजात घुसली
पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले.
माझ्या मराठीचा बोल
नमस्कार
कवी अशोक बागवे यांच्या 'माझ्या मराठीचा बोल' या कवितेवरून प्रेरणा घेऊन खालील काव्य लिहिले आहे. अर्थात कवितेचा भाव अशोक बागवे यांच्या कवितेच्या अगदीच विरुद्ध आहे. आज मराठी भाषा, मराठी संस्कृती किंवा आपलं मराठीपण या गोष्टींबद्दल एकंदरितच मराठी माणसांमध्ये जी अनास्था बघायला मिळते त्यावरून खरं तर हे काव्य सुचलं. सदर परिस्थिती आशादायक नाही, आणि भविष्यात मराठी माणसाची विचारपद्धती बदलली नाही तर आगोदरच कमी असलेलं मराठीचं महत्व नगण्य होईल आणि तेंव्हा हळहळून काहीही उपयोग नसेल.
इंग्रजीचा दुराग्रह आणि हिंदीला दिलं जाणारं निरर्थक प्राधान्य हे मराठीसाठी धोक्याचं आहे.
काव्यरस
प्रवास
तू नि मी
मिसळपाव