आपला दिनु( थोडं भय)
आकाशात स्वच्छ चांदणे पसरले होते, दिनू आज खूपच अस्वस्थ होता. आता तूम्हाला वाटल असेल की आपला दिनु का बरं अस्वस्थ होता अहो तस काही मोठ कारण नव्हत ! कालपासून त्याला थोडे जुलाब होत होते म्हणून आज सकाळीच बसने तो तालूक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात गेला होता दवाखान्यात खुपच गर्दि असल्यान खुप उशीरा त्याचा नंबर लागला इंजक्शन ,गोळ्या घेउन तो तातडीन स्टँडवर आला दुपारची तर बस निघुन गेली होती. आता उरली ती शेवटची
६ वाजेची बस तोपर्यँत काय करायचे तेवढ्यात त्याला समोरच पेपरच दूकान दिसल तिथून एक पेपर घेऊन तो कोडी सोडवत बसला बघता बघता कसा वेळ गेला दिनूला कळलेच नाही.
मिसळपाव