Skip to main content

चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था

लेखक रम्या यांनी बुधवार, 17/01/2024 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
रंगराव पाटील, जगन्नाथ कांबळे आणि मधुकर देशपांडे तिघंही सोसायटी ऑफिस मधील विसपंचवीस रिकाम्या खुर्च्यांकडे बघत बसले होते. अधूनमधून घड्याळाकडे नजर टाकत होते. तासभर होऊन गेला होता. बसून बसून बुडाला मुंग्या आल्या होत्या आणि उठायची तर सोयच नव्हती. जरा खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला की देशपांडे डोळे मोठे करून बघत. 'खबरदार, जागेवरून उठलात तर!' असा त्याचा सरळ अर्थ होता. वेळ सरत नव्हती, खुर्च्या भरत नव्हत्या. देशपांडे उठू देत नव्हते आणि मुंग्या बसू देत नव्हत्या. देशपांडे तर प्रचंड संतापले होते. आणि का संतापू नये?

सात वारांची भारतीय पद्धती

लेखक निनाद यांनी सोमवार, 15/01/2024 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.) तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.

आवडती, आवश्यक आणि आरोग्यदायी

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 14/01/2024 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! सन 2020मध्ये ‘सुखी झोपेचा साथी’ हा लेख इथे लिहिला होता. त्यामध्ये फक्त मेलाटोनिन या झोपेशी संबंधित एकाच हॉर्मोनचा विचार केलेला होता. त्या धाग्यावरील चर्चेदरम्यान वाचकांनी सूचना केली की, झोपेची एकंदरीत प्रक्रिया या विषयावर सविस्तर लेखन करावे. या चांगल्या सूचनेचा विचार करून हा लेख लिहीतोय. यामध्ये आपण झोपेची आवश्यकता, तिच्या दरम्यान होणारे शारीरिक बदल, तिचे शास्त्रीय प्रकार, तिचा वयाशी संबंध आणि झोप-जाग चक्र या मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत.