Skip to main content

इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 13/01/2024 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
Indrayani at CSMT पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.

हर किसमी मै है किस !!!

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 12/01/2024 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
हर किसमी मै है किस !!! यंदा गणपतीत मित्राच्या घरी आरतीला गेलो होतो. आरती झाल्यावर त्यांनी प्रसाद म्हणून चक्क Hershey's Kisses वाटले. दिसायला मोदकांच्या आकाराचे असतात पण म्ह्णून गणपतीचा प्रसाद अमेरिकन चॉकलेट्स?!! बाप्पा ऐवजी प्रसाद वाटणाऱ्या यजमानांनाच 'घालीन लोटांगण वंदीन चरण' करावसं वाटलं. आपल्याकडे पूर्वी सणासुदीला एकमेकांना मिठाई देण्याची पद्धत होती. त्याची जागा आधी हल्दीरामच्या 'सोनपापडी'ने आणि मग अलगद 'कुछ मीठा हो जाए' च्या जाहिरातीद्वारे "कॅडबरीने घेतली आहे. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी 'इंपोर्टेड चॉकलेट्स'चं बरंच अप्रूप होतं.

.

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 12/01/2024 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
.

पीळ

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 11/01/2024 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेच्या काही ओळी जरी सहज सुचल्या दोन चुकल्या मात्रेत दोन वृत्तात गंडल्या यतिभंग एकीमध्ये एकीमध्ये रसभंग दोष दूर करण्यास पछाडिले जंग जंग मात्रा, वृत्तांची बंधने पाळताना दमछाक झाली-आली कुठूनशी मुक्तछंदाची झुळूक मुक्तछंदाच्या स्पर्शाने ओळ ओळ थरारली कोष कोंदट फोडून फुलपाखरे उडाली खळखळा तुटताना बेड्या आनंदे म्हणती लघु, गुरू, मात्रा यांची मुक्तछंदी ना गणती वेध लागला मुक्तीचा बंधी कोंडल्या ओळींना सुंभ जळला-पण का पीळ जळता जळेना ? :)

महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी स्मिताची सायकल यात्रा

लेखक मार्गी यांनी बुधवार, 10/01/2024 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझी मैत्रीण स्मिता अशी सायकल राईड करणार आहे- महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी सायकल यात्रा स्मिता मंडपमाळवीचे गोवा ते मुंबई सोलो सायकलिंग मोहीमेची उद्दिष्टे सामान्यत: प्रबोधनासाठी बैठका, चर्चा, ब्रॉशर्स व परिसंवाद अशा माध्यमांचा वापर केला जातो. पण इतरही पर्याय असतात. जेव्हा आपण सायकलिंगसारख्या अगदी वेगळ्या माध्यमाचा वापर करतो, तेव्हा आपण अनेक लोकांसोबत संवाद साधू शकतो व एखादी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. हे लक्षात घेऊन मी, स्मिता मंडपमाळवी गोवा ते मुंबई एकटीने सायकल यात्रा करणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं.

'माल' वून टाक 'दीवज' (विडंबन)

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 09/01/2024 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीववर भारतीयांचा संताप, EaseMyTrip कडून सर्व बूकिंग्स रद्द; सीईओ म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या…" | EaseMyTrip suspends all Maldives flight bookings over anti-PM Modi remarks - https://www.loksatta.com/desh-videsh/easemytrip-suspends-all-maldives-f… 'माल' वून टाक 'दीवज',चेतवून जंग जंग, राजसा किती मतांत, चालता टूरिझम बंद... त्या तिथे व्हिलाव्हिलात, पेंगते अजून रात, हाय तू करू नकोस, एवढयात दिवाळभंग... ते तुला कसे कळे
काव्यरस

स्मृतिचित्रे -लक्ष्मीबाई टिळक (ऐसी अक्षरे...मेळवीन-१३)

लेखक Bhakti यांनी रविवार, 07/01/2024 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
अ स्वातंत्र्यपूर्वीचा १८७०-८० मधील काळ जलालपुरच्या मनकर्णिका कोकणस्थ नारायण टिळक यांच्याशी तेव्हाच्या पद्धतीनुसार बालपणीच विवाहबद्ध झाल्या आणि त्या लक्ष्मी नारायण टिळक झाल्या.मी अगदीच सामान्य रुपाची टिळकांसारख्या सुस्वरूप व्यक्तीला कशी पसंत पडले कोण जाणे?

थोडी गंमत.

लेखक भागो यांनी रविवार, 07/01/2024 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखा पाहू. खालीलपैकी एक विधान (स्टेटमेंट) सत्य आहे. पहा तुम्हाला ओळखता येत आहे का. १.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासात एक अणू मधुबालाने(इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही नटाचे/नटीचे/व्यक्तीचे नाव टाकू शकता. उदा. शााहरुखखान) टाकलेल्या निश्वासातला असतो. २.एक द्रव्य (liquid) असेही आहे की जे उतारावर वाहण्याऐवजी चढावर वाहू शकते, म्हणजे नदी सागराला मिळण्याऐवजी हिमालयाकडे माहेरी परत जाते जणू. ३.लग्न करताना तळमजल्यावर काम करण्याऱ्या मुला/मुलीशी पहिली पसंती द्या कारण त्यांचे वय हळू हळू वाढतेे (इतरांच्या तुलनेत) . तसेच पहिल्या मजल्यावरची सदनिका घ्या. म्हणजे तुम्ही बरीच वर्षे तरुण रहाल. ४.

Three of Us : एक काव्यात्मक सुंदर अनुभव.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 06/01/2024 21:40 या दिवशी प्रकाशित केले.

काही सिनेमे पुस्तकातल्या सुंदर कवितेसारखे असतात. असाच एक हिंदी सिनेमा. एका रुटीन आयुष्य जगणा-या मध्यमवर्गीय माणसाची कथा. आपला फ्लॅट आपली नौकरी. नव-याचा वेगवेगळ्या पॉलीसी विकण्याचा व्यवसाय. मुलगा इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी बाहेर गावी आहे.