Skip to main content

महाभारत... (शतशब्दकथा)

लेखक शब्दबम्बाळ यांनी शनिवार, 18/07/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
"बरेच दिवस ते युध्द सुरूच होत. न भूतो न भविष्यति असा तो संग्राम होता. एकाहून एक भयानक आणि संहारक अस्त्र शस्त्र वापरली गेली. लाखो लोक मारले गेले, जे युद्धातून वाचले ते उपासमारी आणि रोगराईने मृत्युमुखी पडले. जेव्हा युद्ध संपले तेव्हा जमीन रक्ताने लाल झाली होती, ब्रम्हास्त्राच्या अति वापराने निर्माण झालेल्या काळ्यामिट्ट ढगांनी सुर्य देखील झाकोळला गेला होता, सगळीकडे अंधःकार पसरला होता. निसर्गाची अपरिमित हानी झाली होती. समस्त मानवजातीला याची किंमत मोजावी लागणार होती" हे सगळे ऐकून चिंतातूर होत त्याने प्रश्न केला,"मला हे जमेल?" "मला पूर्ण विश्वास आहे.

"ती"

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 18/07/2015 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा संपूर्ण /अति काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. -----------------------------------------------------------------------
मे महिन्याची सुटटी पडली की मामाचा गाव हे ठरलेलं, तसा माझा स्वतःचा गाव हा मामाच्या गावापेक्षाही हिरवागार आणि शांत. माझ्या स्वतःच्या गावात लोकवस्ती अत्यंत कमी त्यामुळे शांतता जास्त. कदाचित लोकवस्ती अत्यंत कमी असल्यामुळेच हिरवाई जास्त होती. आमचं गाव म्हणजे मोठ्या गावाकडे जाणार्‍या एसटीचा थांबा. ओहळाच्या कडेकडेने असलेली मोजून बारा घरे. दोन घरांच्या मधे जी काही जागा होती तिथे नारळ आणि पोफळ (सुपारी).

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

लेखक राजघराणं यांनी शनिवार, 18/07/2015 02:16 या दिवशी प्रकाशित केले.

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया .

द स्केअरक्रो - भाग ‍११

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 18/07/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १० द स्केअरक्रो भाग ११ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) एली तुरुंगाच्या मोठ्या दरवाज्यातून आत जाताना तर माझी मनःस्थिती पूर्णपणे नैराश्यमय होती. मी यांत्रिकपणे तिथले सगळे सोपस्कार पार पाडले आणि वकील आणि त्यांचे सहाय्यक यांच्यासाठी एक वेगळा प्रवेश होता, तिथून आत गेलो. स्किफिनोने मला दिलेलं पत्र तिथल्या कॅप्टनला दाखवलं. त्याला बहुधा त्यात काही वावगं वाटलं नाही आणि त्याने मला एका खोलीत बसायला सांगितलं. जवळजवळ अर्ध्या तासाने दरवाजा उघडून तो कॅप्टनच आत आला. ब्रायन ओग्लेव्हीचा पत्ता नव्हता. “मि.

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/07/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

मार्केट(यार्ड)... एक संवादी मुक्तक! भाग-१

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/07/2015 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्श्....क्लेमर! :- ज्यांना लेखन वाचताना शिव्यांचा व तथाकथित अश्लिलाचा त्रास होतो,त्यांनी खरच येथून खाली वाचू नये..आणि तरिही वाचलेत व वाचून वाइट वग्रे वाटू लागले..तर ते मनातल्या मनातच-वाटून घ्यावे! ;) तसेच कथा/संवाद हे वास्तववादी आणि पात्र काल्पनिक आहेत. हे जम्ले त्र लक्षात ठिव्ने! टाइमः- हमालांची ..मार्केटयार्ड मधली कामं संपल्यानंतरची एक दुपार.. राम्या:- ए गन्या........गां*&^% बडिशोप कशाला आन्ली बे परत? गन्या:- मां...ग्??? सारकि सारकि जिरा कशाला? आजारी पडल्यागत वाटतं पिताना राम्या:- आरं पन आय&^%$ हीनी दुपारचं आंग लै काटा मारत ना बे.......! गन्या:- मंग त्येला काय जालं?

माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 16/07/2015 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात). साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले, मी केलेल्या पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात. आज लेक- जावई येणार आहे. त्या साठी तुम्हीच डिश बनवा. मी ही म्हणालो त्यात काय आहे, मला ही चांगले पदार्थ बनविता येतात, तू बघच. त्यावर सौ. म्हणाली साधी- सौपी पनीरची भाजी करा. काल संध्याकाळीच बाजारातून अर्धा किलो विकत घेतले आहे.

रस्ते, नियम आणि पोलिस

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 16/07/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते, नियम आणि पोलिस कोपर खैरणे नवी मुंबई ते ठाणे घोडबंदर हा माझा रोजचा ऑफिस ला जाण्या येण्याचा रस्ता. तसा मी नेहमीच वाहतुकीचे सर्व नियम पाळत ठाणे बेलापूर रस्त्यावर माझी दुचाकी चालवत असतो.

डिस्टिलेशन (शंबर लंबरी कथा)

लेखक सोंड्या यांनी गुरुवार, 16/07/2015 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा तो अगदी घामेजून गेला होता! ! त्याने नवसागर, काळा गुळ, मोहाची फुलं, युरिया, जुन्या बॆट-या हे सगळे जिन्नस वापरून काहीतरी बनवीले होते. उत्सुकता म्हणून त्याने ते बोटावर ओतुन जाळावर धरलं. भपकन पेटणारा तो द्रव जबरी वास मारत होता. त्यांच्या धंद्याच्या उसुलात प्रत्येक बाटलीला "बूच" लावने आवश्यक होतं. त्याच्या जवळच काम करणार्या मित्राला त्याने विचारलं "दादूस...मांझा माल खपल ना...." "हेच्या आसला हेच्या बेंबट्या.... कं बोलतोस कं तू....हा तर पयल्या धारंचा माल हं.... खपलाच पायजे बोल.... उद्या गटारी आमोशा हं....

चाळीतील आठवणी: भाग दुसरा

लेखक भिंगरी यांनी गुरुवार, 16/07/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीतील आठवणी जलाविभाग आणि बांधकाम विभाग असे आम्ही राहत असलेल्या बी.एम.सी. वसाहतीचे दोन भाग होते. माझे वडील जल विभागात होते. ह्या विभागात साहेबासाठी (इंजिनियर) एक भव्य ब्रिटिशकालीन बंगला होता व कर्मचार्‍यांसाठी दोन चाळी होत्या. एकूण १० कुटुंबे ह्या विभागात होती. बांधकाम विभाग मोठा होता व त्यात २५-३० इंजिनीअर व कर्मचारी होते. जल विभागात कार्यालय व कर्मशाळा आमच्या चाळीला लागूनच होत्या. तानसा व वैतरणा जलाशयातून मुबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भल्या मोठ्या जलवाहिन्यांची देखभाल करणारे कामगार वसाहतीच्या २-३ कि मी.