पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग ३
भाग १, भाग २
शामोनित भटकून, फ्रेंच पदार्थ खाउन आता दुसऱ्या दिवशी काय करायचे हा प्रश्न होता. म्हणजे खरं तर मों ब्लां हे आल्प्सचे सर्वोच्च शिखर बघायचे हे नक्की होते. तिथे वर जाण्यासाठी शामोनिहून एक रोपे वे जातो, मधल्या एका ठिकाणी थांबून पुन्हा वर गेलो की आपण पोहोचतो ३७७७ मीटर उंचीवरील Aiguille du Midi ला, जिथून स्विस इटालियन आल्प्स चा Panaroma व्ह्यू दिसतो. इथून पुन्हा अजून वर जाण्यासाठी एक लिफ्ट आहे, जिने ३८४२ मीटर उंचीवरून मों ब्लां (Mont Blanc) हे शिखर जवळून बघता येते.
मिसळपाव