श्रीगणेश लेखमाला २०२३ - पुथारेकुलू (పూతరేకులు)
काही नाती अशी असतात की ती कितीही जुनी झाली तरी नि:स्वार्थी, प्रेमळ, मन प्रसन्न, ताजीतवानी ठेवणारी. असेच एक नाते, ते म्हणजे बायकोची बहीण. या नात्याबद्दल काय सांगायचे.. बायको या फ्रंटवर लढण्यासाठी असलेला एकमेव मित्रपक्ष. तर सांगायचे प्रयोजन असे की आग्रहाचे निमंत्रण पेंडिंग होते. बरेच दिवस झाले जायचा योग येत नव्हता. पण म्हणतात ना, किस्मत से जादा और समय से पहले कुछ भी नही मिलताl शेवटी एकदाचा योग आला. पुणे-हैदराबाद शताब्दीचे तिकीट आरक्षित झाले. खरे तर मला चारचाकीने जायचे होते, बर्याच दिवसांत चारचाकीने दूरचा प्रवास केला नव्हता. पण घरातील सर्वानी मला 'म्हातारे झालात' म्हणून गप्प केले.
मिसळपाव