Skip to main content

हांगचौमध्ये आपलं स्वागत!

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 21/09/2023 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
Team India हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक कोरोनामुळं एक वर्ष लांबणीवर पडलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत चीनमधल्या हांगझाऊमध्ये (चिनी भाषेतील उच्चार - हांगचौ) पार पडत आहेत.

श्रीगणेश लेखमाला २०२३ - माझा खत प्रकल्प

लेखक निमी यांनी गुरुवार, 21/09/2023 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझा खत प्रकल्प घरातील ओल्या कचऱ्याचं सुंदर गांडूळ खत होतं, हे मला माहीत असूनही त्याचा योग येत नव्हता. खत करण्यासंबंधी एक-दोन छोट्या पुस्तिका वाचनात आल्या होत्या. गांडूळ हा प्राणी तसा अगदी निरुपद्रवी, पण अतिउपयोगी. आवाज नाही, रडारड केकाटणं नाही, खाण्यापिण्याची तक्रार नाही, बाळंतपणसुद्धा अगदी बिनबोभाट. नर-मादी असा भेदभाव नाही. प्रजननाचा ठरावीक काळ नाही.. मादीला भुलवणं, इतर नरांशी स्पर्धा करत हिंसा करणं नाही. तसा अगदी सोपा, सुटसुटीत जीव. तरीही 'गांडूळ' म्हटलं की काहीतरी वळवळल्यासारखं वाटायचं आणि ते खत करणं लांबणीवर पडायचं.

श्री गणेशोत्सव - अजुन काही ऐतिहासिक कविता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 20/09/2023 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
गणेसोत्सवात एक सकाळची पुजा आरती आणि एक संध्याकाळची पुजा आरती केली की उर्वरीत वेळ रिकामा असतो, किंबहुना जाणीवपुर्वक काही वाचनास, चिंतनास वेळ रिकामा ठेवलेला असतो. आज सहज वाचन करताना अजुन काही ऐतिहासिक कविता वाचनात आल्या त्या येथे उधृत करीत आहे. सदर लेखन दामोदर हरि चापेकर ह्यांनी येरवडा जेल मध्ये असताना लिहिलेले आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांचे आडनाव चाफेकर असे नसुन चापेकर असे आहे. हे तिघे भाऊ १. दामोदर हरि - वय २७, २. बाळकृष्ण हरि - वय २४ आणि ३. वासुदेव हरि - वय १८. दामोदर आणि बाळकृष्ण ह्यांनी गणेशखिंडीत रॅन्ड ह्या अधिकार्‍याचा वध केला.

मढे-घाटाची अनवट वाट, रॅपलिंगचा थरार आणि गुंजवणीकाठची अंतरोली

लेखक चक्कर_बंडा यांनी बुधवार, 20/09/2023 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मढे-घाटाची अनवट वाट A पुर्वीचा अतिदुर्गम अशी बिरुदावली मिरवणारा व त्यामुळेच निसर्गाच्या दृष्टीनं अतिशय समृद्ध असणारा, "प्रचंडगड" तोरणाच्या छत्रछायेखाली स्वतःचं अनवट वेगळेपण राखून असलेला तालुका म्हणजे "वेल्हा".