Skip to main content

जा री जा री ओ कारी बदरीया.......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/01/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी कसं होतं ना? एखादा संगीतकार , एखाद्या चित्रपटात एका वर चढ एक सुंदर गीते देवून जातो. मग प्रेक्षकाची - श्रोत्याची अवस्था "देता किती घेशील दोन कराने" (इथे "ऐकता किती ऐकशील दोन कानाने" असे वाचायलाही हरकत नाही ;) ) अशी होवून जाते. पण या सगळ्या आनंदात बरेच वेळा असेही होते की अत्युत्तम असे काही ऐकताना त्याच चित्रपटातील एखादे साधेच पण नितांत सुंदर असलेले गाणेही नकळत दुर्लक्षीत होऊन जाते. आता हेच बघा ना. श्री. एस.एम.श्रीरामलु नायडू या यंडु गुंडू वाटणार्‍या नावाच्या माणसाने १९५५ साली युसुफसाब उर्फ दिलीप कुमार आणि मीनाकुमारी यांना घेवून 'आझाद' नावाचा एक तद्दन मसालापट काढला.

गप्पा

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 23/01/2015 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज्जी हे बघ मिकी काय म्हणतो आहे! काय म्हणतोय? पोळ्यांची कणीक मळता मळता तिने स्वैपांकघरातून ओरडून विचारले. टीवी लाव म्हणतो आहे। तेला कार्टून बगायचे आहे. मिकीला की तुला? नाय, मिकीला! चल गप्पिष्ट कुठला. असा आजीचा काहीना काही संवाद दिवाणखान्यात एकटाच खेळणा-या दीपशी स्वैपांकघरातून तार स्वरात ओरडून सुरू होता. ओरडून घसा दुखला तशी भराभरा हातातले काम संपवून ती दिवाणखान्यात आली. आज्जी, हे बग, मी डंपर, डिगर सगळे बाहेर काढले. आज्जी हा मानूसला आत बसव नां ए आज्जी फ़ायर ईंजीन वी वौ वी वौ अस कां करतं? अरे त्याला लवकर जायच असत ना, म्हणून लोकांना रस्त्यातून बाजूला करायला आवाज करतं वी वौ वी वौ ....

देवस्थाने आणि भटजी....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/01/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/01/2015 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत. फक्त त्या कुणाला लाभतील,हा मात्र त्या (अगम्य) नशिबाचाच भाग आहे.. पुढे चालू... ======================================= पहिले सहा महिने संपले..दिवाळीची सुट्टीही झाली. आणि आंम्ही सर्व मुलं पळत पळत पाठशाळेत परत आलो. अगदी ठरल्या दिवशी! माझ्या घरून निघायच्या एक दोन दिवस अलिकडे तर.. आज्जीला, माझ्यावर शाळेतून कुणी चेटूक केलय की काय???

भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 22/01/2015 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर ह्याआधी यवतच्या यादवकालीन भुलेश्वर मंदिरावर असंख्य लेख तसेच छायाचित्रे येऊन गेलीत. पण इथल्या पौराणिक शिल्पपटांचे फारसे वर्णन आल्याचे मात्र अजिबात दिसले नाही. त्यामुळे ह्या लेखाद्वारे मी मंदिराचे इतर वर्णन न देता येथील काही पौराणिक शिल्पपट उलगडून दाखवण्याचा मात्र अल्पसा प्रयत्न करतोय. रामायण, महाभारतातील प्रसंगांच्या शिल्पपटांबरोबरच येथील काही आगळीवेगळी शिल्पेही आपण विचारात घेऊयात. भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे प्रत्येकी तीन शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना.

सर्वोच्च न्यायालयाचा बीसीसीआय ला झटका

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 22/01/2015 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिसमधील हत्याकांडाच्या धाग्यावर विषय क्रिकेटकडे वळला आणि त्यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही एक सरकारी संस्था नसून एक खाजगी संस्था आहोत व 'भारतीय क्रिकेट संघ' या नावाने ओळखला जाणारा व कोट्यावधी भारतीय ज्या संघाला आपल्या भारत देशाचा क्रिकेट संघ आहे असे मानतात, तो संघ भारत या देशाचे प्रतिनिधित्व करीत नसून बीसीसीआय या खाजगी संस्थेचे प्रतिनिधित्व करतो असा दावा काही जणांनी केला. या दाव्याला आधार म्हणून बीसीसीआयने काही वर्षांपूर्वी 'आपण एक खाजगी संस्था असून क्रिकेटचा संघ हा भारत या देशाचे प्रतिनिधित्व करीत नसून बीसीसीआय या खाजगी संस्थेचे प्रतिनिधित्व करतो.

सामंत

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 22/01/2015 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
'गांधी येडा होता रे' सामंत नेहमी म्हणतो आणि मग फोडला पायजे...XXत दम...ईस्रायल... असं कायकाय बोलत राहतो दोन पेग चढवलेले असतील तर सामंत अध्यात्म, सेक्स, मायन संस्कृती, काश्मीर प्रश्न यावर पण बोलतो 'नेहरू एक्झॅक्टली कुठे चुकला' हे सांगतो मग तो. सामंतला ब-याच गोष्टींबद्दल माहिती असते ....वरवरची आणि माहिती नसलेल्या गोष्टींबाबत सामंत 'अमेरीकेचा गेम आहे सगळा' असं म्हणतो अमेरीका नक्की काय करते ते त्यालाही माहिती नसतं पण त्याने त्याला काही फरक पडत नसतो खरंतर, कुणालाच काही फरक पडत नसतो कारण 'अमेरीका गेम करते' म्हणल्यावर सगळे माना डोलावतात. सामंत बोलतो... माहिती असो वा नसो ...सामंत बोलतो आणि बेधडक आप

(सोबती) सकारात्मक.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 22/01/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सुचेता ह्यांची सोबती ही कविता वाचली आणि आवडलीही. तसं पाहिलं तर काव्य करणं हा माझा प्रांत नव्हे. पण मधेच कधीतरी सुरसुरी येते. सुचेता ह्यांची 'सोबती' कविता वाचली आणि आलेल्या सुरसुर्‍या अवस्थेत एक कविता होऊन गेली. तुम्हा सर्वांच्या आस्वादार्थ...... सुखाला अनंत सोबती जरी, दु:खातही तुम्ही एकटे नसता, मित्र असतो सोबतीला, सगळेच कडेने पोहणारे नसतात. ज्याचं त्याने सामोरं जावं, प्राक्तनाला दोषी का धरावं? जीद्द अशी बाळगावी, दैवानेही समोर झुकावं. अरे हेच चिरंतन सत्य आहे, पाठ फिरवून पळायचं नसतं. संघर्ष जो सदैव करीतो, दैव त्यालाच प्रसन्न होतं.

पोरगीपटाव शास्त्रानंतर...

लेखक जेम्स बॉन्ड ००७ यांनी गुरुवार, 22/01/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे? असे अनुभव सदस्यांना नक्कीच आले असतील. या वेळी तुम्ही काय करता?