बाभळीच्या काट्यांची उसळ
इथे एका पेक्षा एक पाककृती टाकून लोकांना आनंदी करणाऱ्या सगळ्यांची माफी मागून . .
हापिसात जात नसलेला वेळ . . आणि आत्ताच खाल्लेल्या तंदुरी चिकन आणि बिर्याणीने पोट भरल्यामुळे कैच्या काय चालणारं डोकं . . याचा हा परिणाम
तर . . मंडळी . .
बाभळीच्या काट्यांची उसळ :-
साहित्य :-
१५० - २०० बाभळीचे काटे . . कमीत कमी ३ - ४ इंच लांबीचे (आता हे कुठून मिळवायचे हे तुमचं तुम्ही बघा )
२ वाट्या दही . . जितकं आंबट असेल तितकं चांगलं . .
२ - ३ दिवस खाण्याच्या कपाटात दह्याचं भांडं उघडं ठेवलं कि होईल आंबट . . ( खाण्याचं कपाट काय हे समजलं नसेल तर जवळपास च्या "वाड्यात" राहणाऱ्या लोकांना विचारा . .
मिसळपाव