Skip to main content

जागतिकीकरणात देश ही संकल्पना सुसंगत?

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 16/01/2015 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत एकीकरण करणे होय. किंवा जागतिकीकरण म्हणजे एकाचवेळी सर्व जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे. जागतिकरणामुळे देशांच्या सिमा फिकट होउन जग हे एक राष्ट्र असल्याचा अनुभव येत आहे. जागतिकीकरण मुळे उत्पादन करण्यास अनुकुल असणार्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी वाढत आहे. परंतु काहींच्या मते जागतिकीकरणामुळे देशातील गृह उद्योग लोप पावत असुन देशी वस्तुंची जागा ही विदेशी वस्तुंनी घेतली आहे म्हणजेच लोक विदेशी वस्तु खरेदी करत आहे. परंतु माझ्या लोक ही वस्तु ही देशी आहे की विदेशी हे न बघता त्या वस्तुची उपयोगिता व किंमत बघुन विकत घेतात. जर आप

मुसाफीर

लेखक यमन यांनी गुरुवार, 15/01/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी "मुसाफीर "वाचायला मिळालं . परत एकदा गोडबोले सरांची "range "बघून अवाकलो . त्यांचं प्रत्येक पुस्तक मराठी माणसाला घडवतंय . त्यांना आणि त्यांच्या व्यासंगाला आपला कुर्निसात . किमयागार , अर्थात ,बोर्डरूम ,मनात, मुसाफिर हि पुस्तकं प्रत्येक मराठी घरातल्या कुंकवाच्या करंड्या इतकीच महत्वाची आहेत . आधी "बालकांड" आणि आता "मुसाफीर "एकूणच "मनुवादी "(म्हणजे आडनावाने "मनुवादी"… विचारांनी नाही म्हणत मी)आत्माचारीत्रांना बरे दिवस आलेत असं दिसतंय . एवढ्या सगळ्या गोष्टी शिकताना ,अनुभवताना वेळ कसा मिळतो ? हे मला खरोखरच इंजिनीरिंग च्या कित्येक विषयान सारखं अनाकलनीय आहे .

तुकडाबंदी व गुंठा जमीन

लेखक hitesh यांनी गुरुवार, 15/01/2015 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
नॉन एन ए प्लॉट गुंठेवारीवर विकले जातात. तेंव्हा आपण आपल्या कुवतीनुसार एक दोन गुंठा जमीन घेतो. पण आज एक नवी माहिती मिळाली की शेतकी जमिनीचे प्लॉट विकताना तुकडाबंदी कायदा पाळला जातो. म्हणजे त्या एरियात १६ गुंटे , २१ गुंटे असाच तुकडा विकावा / घ्यावा लागतो. बिल्डर बोलला की हो असा कायदा आहे. त्यामुळे खरेदीखत हे अनेक लोकांचे मिळुन केले जाते. यातुन अडचणी येउ शकतील का ? भविष्यात असा प्लॉट डेवलप करताना वा विकताना काय त्रास होऊ शकेल ? अशा एक गुंट्यासाठी कर्ज मंजुर होऊ शकते का ? अशा जमिनीवर फ्लॅट घेताना अडचणी येणार नाहीत. कारण बिल्डर मोठा तुकडा घेऊन त्यावर बिल्डिंग बांधत असतो.

बॅक टु द फ्युचर

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 15/01/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
युनिव्हर्सल पिक्चर्स स्टुडियोचे 'बॅक टू द फ्युचर' सेरिजचे भन्नाट चित्रपट मध्य ८० च्या दशकात आले होते. कि ज्याची संकल्पना काळाची/चौथी-मितीवर बेतलेली होती. मोटाररुपी टाइम मशीनमध्ये चित्रपट आपल्याला थेट भविष्याचा वेध घेत काळाच्या पुढे घेवून धावायचा. भविष्यामधील जग कसे असेल? याची चुणूक पाहत असतानाच कथा पुन्हा एकदा त्यावेळच्या 'चालू वर्तमानात' यायची. प्रेक्षकांना मनात माहिती असायचं की, हे सारे खोटे आहे,पण ते सारे इतक्या परिणामकारक रीतीने चित्रपटात समोर यायचंकी ते नुसते पाहत न राहता त्याचाच एक भाग बनून अनुभवायचे. हे आज आठवण्याचं कारण कि त्या चित्रपटातील भविष्यकाळ, आज आपल्यासाठी वर्तमान आहे.

" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय?..."

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय ?...." "महाराष्ट्र" हे अनेक महान संताच्या चरनांच्या धुळीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले मराठी माणसांचे एकमहान राज्य. पण आज महाराष्ट्राकडे बघितले की महाराष्ट्र हे खरीच मराठी माणसाच राज्य आहे का? हा एकमोठा प्रश्न निर्मान होतो.

" आईले विचारल म्या "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
आईले विचारल म्या आपलीपरिस्थिती एवढी गरीब कौन असते?, आईन सांगितल मलेआपनशेतकर्याच्या एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!! आईले विचारल म्या लोक तं आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते, आईनं सांगितले कारण त्याईच्या ईथची पोई आपल्या ईथचपिकते !!! आईलाविचारल म्या त्या नेत्याच्या अंगावरले कपडेएवढे पांढरे कसेकाय असते, आईने सांगितले कारण त्यांईच्या कपडाचा कापुस पणआपल्याच मिळते!!! आईले विचारल म्या मग माया अंगावरचे कपडे कौन मयकलेअसते, आईन सांगितले कारण तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!! आईले विचारल म्या मलेशाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते, आईने सांगितल कारण आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!! आईल
काव्यरस

" नवी क्रांती घडवायची आम्हाला "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
———————————————— हवी आमच्या हक्काची भाकर, नकोय तुमची भिक आम्हाला !! हवय आमच्या मेहनतीच मोल, नकोय लाखोचे दान आम्हाला !! हवय शेतीला चांगल बी बियाणे, नकोय तुमची आश्वासने आम्हाला !! हवाय पिकाला योग्य हमीभाव, नको नावापुरत पॅकेजआम्हाला !! भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच, कारण जगाची काळजी आहे आम्हाला !! करायच भारताच नाव मोठ, नका करुडिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !! आम्ही नाही करणार आत्महत्या, कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !! आमचीनका करुकाळजी तुम्ही, कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !! ————————————————— ————————————————— @@ कवी @@ संजयरा. कोकरे अमरावती मो. नं.

" युवकाच्या देशात युवकांच्या समस्या "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
" ये देश युवाओका है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देशम्हटल तर तेउचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ?या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 15/01/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.