Skip to main content

भव्यत्वाची जेथ प्रचिती! वेरूळ..सफर आणि बरेच काहि! १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/01/2015 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
(शीर्षकामुळे आशय बदललाय की काय? किंवा का बदललाय? असं जरूर वाटेल.पण येथले दिव्यत्व त्या भव्यत्वात अनुस्यूतच आहे. अजुनंही अंगावरचे रोमांच हलत नाहीयेत.. ) दहा तारखेला भल्या (थंडिच्या) पहाटे, आमच्या पुण्यपत्तनखाज'गीवहातुकप्रवासीउपकारांकितगतजन्म्पुण्यबॅलन्सनिमित्तेनरिक्षाप्राप्तीअतीशुभयोगा मुळे (हुश्श्श्श्श् :-/ ..काय ती शब्दलालं'सा! =)) ) एकदाचे आंम्ही तिघे म्हणजे मी (उर्फ..स्वआर्तिक्यकुशल! ;) ) धन्या (उर्फ छोटा हत्ती,मंजेच आगोबाचा भाऊ!

एस. एस. सी., सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई.

लेखक वारा यांनी सोमवार, 12/01/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पिल्लु ला शाळेत अ‍ॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय. १) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे. फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी. तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त. अ‍ॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त. २) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा.

' यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा...'

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 12/01/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा छान हा दु:खासही आला फुलोरा ये, वसा घे वेदनेला माळण्याचा आणशी हे रोज तू कोठुन बहाणे केवढा हा सोस तुजला टाळण्याचा मी करू चिंता कशाला काजळाची सोडला संकल्प मी डागाळण्याचा श्वास घे माझे तुझ्या श्वासात भरुनी ये, ऋतू आला फुले गंधाळण्याचा डॉ.सुनील अहिरराव

नवीन

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 12/01/2015 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोळ्यातून , ओठांतून ,शब्दातून , सुरांतून ओघळणाऱ्या स्मिताआडून झरणारे दु:ख … मला इथे कोसो दूर जाणवतंय … चला , माझा चष्मा किंवा तुझा मेकप बदलायची वेळ झाली.

अंधार क्षण भाग ५ - व्लादिमीर ओग्रिझ्को (लेख २५)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 12/01/2015 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - व्लादिमीर ओग्रिझ्को जर मला आज कोणी विचारलं की १९३९ ते १९४५ हा जो दुस-या महायुद्धाचा संपूर्ण कालखंड आहे त्यातला सर्वात महत्वाचा आणि निर्णायक असा दिवस निवड, तर मी सर्वांना माहीत असलेले दिवस - उदाहरणार्थ ३ सप्टेंबर १९३९, जेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स यांनी पोलंडवर जर्मनीने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं; किंवा ७ डिसेंबर १९४१, जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर आकस्मिक रीत्या बाँबहल्ला करुन युद्धाला ख-या अर्थाने जागतिक बनवलं; किंवा २२ जून १९४१, जेव्हा जर्मनीने सोविएत रशियावर जगातला सर्वात मोठा आक्रमक हल्ला चढवला - निवडणार नाही.

इनवेस्टमेंट

लेखक चित्रार्जुन यांनी सोमवार, 12/01/2015 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो. मला इनवेस्टमेंट .संदर्भात माहिती हवी आहे ती पण मराठीत कारणकी माझया मते सर्व साधारण मराठी कुटुंबात या बद्दल खूप कमी माहिती आहे ती सर्व सामान्य माणसाना कलावी या साठी हा धागा उघडला आहे म्हणून यावर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती. गुंतवणूक हा एक अतिशय संवेदनशील विषय असल्याने यावर नकीच मिसळ पाव वर चर्चा होणे आपेखित आहे. यात गुंतवणुकीचे प्रकार, त्यातील वैविध्या उदा. लिक्विड फंड, शेर मार्केट, डेट फंड, कॅपिटल फंड, बॉन्ड्स, म्यूचुयल फंड, एट्सेटरा.

पूर्वेच्या समुद्रात-४

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 12/01/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात-४ बेयपूर या ठाण्याकडून आम्ही निघालो आणि कोचीकडे कूच केले. समुद्र खवळलेला होताच. पण रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने सर्व जण त्याकडे दुर्लक्ष करत होते. हे म्हणजे एखादे आक्रस्ताळे दुसर्याचे मुल रडून तुम्हाला त्रास देत असेल तरी तुम्ही काहीही करू शकत नाही तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष करायला शिकता तसे. काही काळाने कोचीचे बंदर दिसू लागले. तेथे समुद्र कायमच अतिशय खवळलेला असतो. तेंव्हा त्या डचमळणार्या समुद्रातून कोचीच्या संथ पाणी असलेल्या कालव्यात (बैक वाटर) शिरली तेंव्हा जोराच्या पावसात आपली गाडी एकदम बोगद्यात शिरते तेंव्हा कसे एकदम आवाज बंद होऊन शांत वाटते तसे वाटू लागले.

स्पर्श आंधळे ,गंध आंधळे भोवताली वनराई ग............

लेखक झंडुबाम यांनी रविवार, 11/01/2015 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
काल office मध्ये बसलो होतो ,अचानक whatsapp आला . requirement of writer tomorrow for visually challenged student . मी reply केला ,आवश्यक माहिती घेतली आणि confirmation देऊन टाकल थोडी धाकधूक होती कि जमेल काय म्हणून . एकतर बरीच वर्ष झाली होती, लिहायची अशी सवय राहिली नव्हती . whatsapp वर notification आले मी check केलं ,ज्याची exam द्यायची त्याचा contact number आला होता .तन्मय नाव त्याच मी number डायल केला स्वतःची ओळख करून दिली , विचारलं कि कुठे भेटायचं ? तन्मय :- तुला कॉलेज माहित आहे . मी :- नाही कधी गेलो नाही तिथे तन्मय :- ok . तू घाबरू नकोस ,मी guide करेन तुला ,तू स्टेशनला भेट .