Skip to main content

मी आणि ते

लेखक स्पा यांनी बुधवार, 14/01/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.मग कधीही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्य्याला लागतात,तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो,जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते.साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबिले जातात.या मध्ये काही मध्यस्त आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात,कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात,लपायचा काहीच चान्स नाही अस्मादिक हि याला क

सांज

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 14/01/2015 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
saanj सांज बावरी, सांजेला कळते ना काही शांत बाह्यतः, आतुन ही घोंगावत राही सांज बोचरी, काळोखाची पूर्वकल्पना वर केशरिया, अंतरात दडल्यात वेदना सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी नेत्र पश्चिमी, मन पूर्वेच्या क्षितिजापाशी सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी... अदिती जोशी

जिजामाता समाधी पूजन-मातृशक्ती पूजन

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 13/01/2015 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवरायांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत कायम पेटती ठेवणा-या राजमाता जिजाऊंचे पाचाड येथील समाधीस्थळ आजही दुर्लक्षितच आहे. या समाधीस्थळाचे पूजन व्हावे , राजमातांच्या समाधीस्थळी दिवा लावला जावा या उद्देशाने महाड येथील विष्णू केंजळे यांनी जिजामाता समाधी पूजन-मातृशक्ती पूजन हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक कुटुंबांने अथवा दाम्पत्याने येथे येऊन मनोभावे पूजा करावी हा या मागील उद्देश आहे. यामुळे ३६५ हून अधिक कुटुंबांनी या ठिकाणी येऊन समाधीस्थळाचे पूजन केले आहे. शिवप्रमी विष्णू केंजळे यांनी सुरू केलेला उपक्रम सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

माझा गाव ......(भाग-2)

लेखक मॅक यांनी मंगळवार, 13/01/2015 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागास भरभरून प्रतिसाद दिल्या बाबत सर्वांचे खूप-खूप आभार... माझा गाव ...(भाग-०१):-http://www.misalpav.com/node/29941 हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गावीसुध्दा बरीच हिरवल आहे....शेतं ब-याच प्रमाणात हिरवी आहेत, आणि ज्या ठिकाणी खाण्यासाठी मिळते त्या ठिकाणी पक्षी हे असतातच... शेतातील झाडावर.....घराच्या समोरच्या झाडावर असे बरेच पक्षी दिसतात हिवाळ्यात गावी....

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 13/01/2015 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
(या मागिल भागापासून सांधा जरा बदलला गेला असल्यामुळेच ,नविन भाग लिहायला हा बराच वेळ-गेलेला आहे.त्याबद्दल प्रथमच क्षमा मागतो.. आणि पुढे वाचायची अगत्यपूर्वक विनंती करतो. :) ) मागिल भाग- १८
याला कारण असं की आमच्या काकाचा "माणूस चुकतो" ह्या घटनेवर जबरदस्त विश्वास होता. वास्तविक कोकणातल्या एका छोट्या खेड्यात कुठल्याच प्रकारचं फारसं शिक्षण न झालेला हा माणूस.

The most dangerous eight seconds of the sports !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 13/01/2015 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्‍या आमच्या वार्षिक सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ 'नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो' साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. 'वेस्टर्न' हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर 'कल्चर' आठवते नाहीतर 'म्युझिक'. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली... इट्स रोडीओज विशाल.... ! दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली 'वेस्टर्न म्युझिक' ही संकल्पना अजुन पक्की झाली. Wow, exciting. Is there any concert or what?

महालक्ष्मी सरस २०१५.

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 12/01/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा अनाहीताचा महालक्ष्मी सरस कट्टा मिसला आणि नंतर सविताचा कट्ट्याचा वृतांत वाचल्यापासुन कट्टा मिसल्याची हुरहुर लागली. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता अजयाने महालक्ष्मी सरस ला रविवारी येणार का विचारल्यावर लगेचच होकार देउन टाकला. रात्री आरोहीने सांगितले ती ही येणारे मग तर तिला भेटायची उत्सुकता लागुन राहीली.

e-learning कोर्सेस आयआयटी

लेखक मोहनराव यांनी सोमवार, 12/01/2015 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील अग्रगण्य आयआयटी संस्थांनी मिळून आंतरजालावर मोफत कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. आपल्यामधील खुप जणांना याची माहिती असेलच. यामधील काही कोर्स विडियो स्वरुपात सुद्धा उपलब्ध आहेत. येथे आपल्याला अनेक मान्यवर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू शकेल. जगभरातील कुणीही त्यांचा लाभ मोफत घेऊ शकतो. जिथे अनुभवी शिक्षकांची कमतरता आहे अश्या ठिकाणी या उपक्रमाचा फायदा करून घेत येईल. तसेच ज्यांना आपला अभ्यास वाढवायचा असेल त्यांच्यासाठीही उपयुक्त. http://nptel.ac.in/ सध्या काही कोर्सेस ऑनलाईन प्रमाणपत्रक साठी उपलब्ध केलेले आहेत. तुम्ही gmail account वरून नोंदणी करू शकता.