आजोळच्या गोष्टी – ३
आजोळच्या गोष्टी – ३
औदुंबरला दत्त मंदिराशेजारूनच संथ वाहते कृष्णामाई. नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. काठाला नारळाची जांभळाची झाडे एका रांगेत होती. एकदा आईने माझ्या मामाला मला पोहायला शिकवायची जबाबदारी दिली आणि माझा पोहणे शिकण्याचा उपक्रम पुढे अनेक वर्षे चालला. माझा एक मामा अगदी पट्टीचा पोहणारा. पुरात उडी टाकून भोवरा हाताने फोडणे वगेरे धाडसी प्रकार सहज करी. मी त्याला घाबरून असायचो अगदी. मी २-३ वर्षाचा असताना माझे बुडता बुडता वाचण्याचे सोपस्कार झाले होते. मामाने अगदी मजेत सांगून टाकले आईला कि "छाया, काळजी नको. आता हे काम माझ्याकडे लागले".
मिसळपाव