Skip to main content

नव्या वर्षाचे संकल्प

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 01/01/2015 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मिपाकरांना २०१५ च्या पहिल्या दिवशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आमचे नवे वर्ष गुडीपाडव्याला सुरु होते किंवा दिवाळीला सुरु होते इ. इ. चर्चा नको. :) तर सांगण्याचा मुद्दा असा की दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी तुम्ही नवीन वर्षाचे तडीस (न) जाणारे संकल्प केले असतीलच. मागच्या वर्षी एखादा संकल्प केला आणि तो पुर्ण केला असेही काही घडले असेल. तर मंडळी येउद्या तुमचे अपडेटस. मी अजून काही संकल्प केला नाही. हजारो संकल्प ऐसे की हर संकल्प पे दम निकले. पण बघूया, मिपाकरांच्या सुचनेतून काही आवडले तर नक्कीच अनुकरण केले (मिपाच्या भाषेत केल्या जाईल) जाईल.

सहज..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 01/01/2015 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
https://lh4.googleusercontent.com/-SlYwf_I5qkM/VKKOxOhFBGI/AAAAAAAAGoo/bWGXNKJWhdU/w326-h580-no/https%253A%252F%252Flh6.googleusercontent.com%252F3Il92l88Ww_O5tbjFoNYzLAkiCz4u-_2HvN22m-XOe0%253Ds0-d जाळ्यावर विणले जाळे शब्दांनी कसंरतं केली. मी काहि केले नाही अन्,सहजी कविता झाली. ना शब्द रंग रस गंध ना प्रतिकांचे प्रतिबंध. तालातून जुळता सांधा
काव्यरस

आर्ट ऑफ द स्टेट

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 01/01/2015 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती. मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो. एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं आमच्या आयुष्

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ - व्यक्तिचित्रण

लेखक एस यांनी गुरुवार, 01/01/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो. मिपा छायाचित्रणकला स्पर्धेला लाभणारा वाढता प्रतिसाद पाहून ह्यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल घडवून आणत आहोत. आम्ही ह्या स्पर्धेसाठी विशेष परिक्षक म्हणून काम पाहण्यासाठी मिपासदस्य स्वॅप्स यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
ह्या स्पर्धेचा विषय श्री. स्वॅप्स हेच सुचवणार असून स्पर्धेसाठी उपलब्ध प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवडही तेच करणार आहेत.

मिसळपाव वर टंकलेखन करण्याच्या काही विशेष सुचना

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 31/12/2014 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? इथे नविन सभासदांना मराठीत टाइप करायला बर्‍याच अडचणी येतात. सुरुवातीला मला पण थोडा त्रास झाला. त्यामुळे, मराठीत कसे टाइप करावे? ह्यासाठी हा धागा काढत आहे. सुरुवातीला आपण बाराखडी बघु या. पहिली महत्वाची गोष्ट ----- तुमच्या कळफलकाचे "Caps lock" नॉर्मल ठेवा.थोडक्यात अक्षरे छोट्या लिपीत यायला पाहिजेत.

कथा-कॉलेज कट्टा भाग २

लेखक चेतन677 यांनी बुधवार, 31/12/2014 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!!!!!! मागील भाग कथा-कॉलेज कट्टा भाग १ या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे. तो दिवस होता २६ ऑगस्ट २०१२.डी.वाय पाटील कॉलेजच्या ऑफीसच्या बाहेर अॅडमिशनसाठी भली मोठी रांग होती. "यार,ज्ञानेश्वर आपण उद्या येउयात का?" अभिनवने सवाल केला. अभिनव दहा दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता.मुळचा अहमदनगर मधील अभिनवचा मेकॅनिकल इंजिनीअरींगमध्ये डिप्लोमा पूर्ण झाला होता.

तो.....

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 31/12/2014 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्या लीलाधराची मापी मागून :) पेर्णा - http://www.misalpav.com/node/19709 ------------------------------------------------------------------------- तो..... तो आहे नाना, तो आहे स्टिंकर, तो ना"ही" तैश अन् तो नाही माइ, पण तरीही त्याची मिपावर असते मात्र जिल्बी.....

'लेखन' नावाचा टॅब ऑप्शन

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 31/12/2014 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव प्रशासकांना विनंती - मिसळपाववर सदस्याच्या प्रोफाईलमध्ये सध्या दृश्य, वाचनखुणा, संपादन, Track, खरडवही असे पाच ऑप्शन्स दिसतात. याच्या जोडीला लेखन हा ऑप्शन पण देता येईल काय? त्या सद्स्याने केलेले सर्व लेखनाचे धागे या एका टॅबमध्ये सापडू शकतील. अन्यथा Track चा वापर करुन शोधावे लागते. त्यात लेखकाचे स्वतःचे लेखन असले तरी इतर धाग्यांवर दिलेल्या प्रतिक्रीयाही असल्याने थोडे कठीण जाते. नवे लेखन मध्ये शोधणे तर अधिकच कठीण. विशेषतः जुने लेखन असेल तर. टेक्नीकली हे कितपत कठीण आहे याची कल्पना नाही, पण इतर अनेक मराठी साईट्सवर (उदा. मायबोली, ऐसी अक्षरे) ही सुविधा उपलब्ध आहे.

व्हा पुढं … २०१५ साठी

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 31/12/2014 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या उत्तरार्धात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू चारोळी कवितेला वारेमाप प्रसिध्दी मिळवून द्यायची असेल असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली फक्त लिहायचे कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ. बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ? (हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये ) तर असो मला काय म्हणायचे आहे की ….