Skip to main content

कसं जमतं तुला

लेखक सुचेता यांनी सोमवार, 29/12/2014 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
कसं जमतं तुला, मनाला आवरणं? किती सहज, हे तुझ असं विचारणं? उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला? की सगळचं हे सहज शक्य होतय मला? थोपवताना भावना घामाघूम जीव आपला तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला? फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ लपवताना थरथर, मन उघडं पडावं जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
काव्यरस

लग्नाचे अमिष दाखवून

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 29/12/2014 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
खर्‍याचा जमाना आता राहीला नाही. पावलोपावली अबला स्त्रीची फसवणूक होताना दिसते आहे. आजचा स्वार्थी पुरुष एखाद्या विवाहीत वा अविवाहीत स्त्रीच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला लग्नाचे अमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतो आणि अत्याचार करतो. काय चाललंय हे... कुठे नेऊन ठेवला... काश्मीरातला एक कॉलेज युवक, तिथलीच एक कॉलेज युवती. युवतीला त्या युवकाकडे पाहून 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट' झाले. ती प्रेमात पडली. प्रकरण घरच्यांपर्यंत गेले. घरच्यांचा विरोध नव्हता. मात्र त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे दोघेही पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यावरही प्रेम टिकून होते.

म्हमद्या .

लेखक अद्द्या यांनी सोमवार, 29/12/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
" कळश्या भोसडीच्या खेळायला का येन्नास . लगीन बिगिन केल्यास कि काय . च्यायला पोरगी घावली तुला . दोस्ताबरोबर खेळूस लाज वाटते स्हाय्बास . . " शनिवारी संध्याकाळच्या अगदी Peak Hours च्या गर्दीत . सिग्नल सुटताना गाडीला किक मारली . गियर टाकून पुढे जाणार तेवढ्यात हे वाक्य पडलं आलं . आलं म्हणण्यापेक्षा . आदळलं म्हणू शकतो . . आता यावर नॉर्मली मी भ , फ ची बाराखडी सुरु करतो . पण . . पण . खूप खूप प्रयत्नानंतर मागची सीट योग्य त्या कामी उपयोग होईल अशी व्यवस्था केली होती . डावीकडचा आरसा थोडासा वाकवून . . डायरेक बघता येईल अशी सोय केली होती .

भीतीच्या भिंती:३ इस्लामिक रिपब्लिक

लेखक आतिवास यांनी सोमवार, 29/12/2014 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग (नोंद: स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चा, विकिपीडिया आणि तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे.) मी काबूलमध्ये शनिवारी पोचले होते. रविवार निवांत असायला हवा आजवरच्या अनुभवानुसार. पण नाही! रविवार हा कामाचा दिवस. ‘साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार’ ही इस्लामिक राजवटीची प्रमुख खूण. ज्यांना आठवड्यात पाच दिवस काम असतं त्यांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टीचे.

बाइक्स घेताना - भाग ३

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 29/12/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - १ भाग - २ …तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत १२५ cc "jack of all trades master of none" segment १. दमड्या - १००-११० cc पेक्षा कमी पण १५० cc पेक्षा जास्त २. मायलेज … "कितना देती है" - १००-११० cc पेक्षा कमी पण १५० cc पेक्षा जास्त ३.

अंधार क्षण भाग ४ - ल्युसिल आयशेनग्रीन (लेख २३)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 29/12/2014 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - ल्युसिल आयशेनग्रीन पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आणि त्यामुळे होणारा शारीरिक आणि मानसिक हिंसाचार हा फक्त नाझीच करत होते असं अजिबात नाही. त्याचप्रमाणे अडचणीत सापडलेल्या लोकांचा गैरफायदा घेणं यावरही फक्त नाझींची मक्तेदारी नव्हती. ल्युसिल आयशेनग्रीनला या दोन्ही गोष्टींचा जो अनुभव आला त्यावरून मी म्हणेन की जे तिला सहन करावं लागलं तशी वेळ फार कमी लोकांवर आली असेल आणि सर्वात भयावह म्हणजे जेव्हा तिला हे सगळं पहावं लागलं तेव्हा ती फारच लहान होती - ती ८ वर्षांची असताना या गोष्टींची सुरूवात झाली आणि जेव्हा त्यांचा अंत झाला तेव्हा ती फक्त २० वर्षांची होती.

मराठी कविता

लेखक पुस्तकमित्र यांनी रविवार, 28/12/2014 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! थोड्याच शब्दात मोठा आशय सांगण्याची किमया फक्त कवितेत असते. मराठी भाषेला काव्याची अतिशय सुंदर परंपरा आहे. अमृतानुभव असू दे, तुकारामाची संतवाणी, अभंग पंत तंत काव्य ते केशवसुत, रे. टिळकांचा जमाना. त्या नंतरचा सावरकर, पुढे कुसुमाग्रज, बोरकर, बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे ते ढसाळ, नायगावकर, म्हात्रे, संदिप खरे अश्या अनेक प्रकारच्या कवींनी मराठी वाङमय समृध्द केलंय. त्यातल्या तुम्हाला आवडणार्‍या कविता कोणत्या ते या भागात सांगायचंय. जमलं तर का आवडली कविता हे पण. आणि हो, नुसतेच कवितेचे नाव न देता थोड्या ओळी लिहु शकलात तर उत्तम! चला तर मग काव्यास्वाद घेऊ या.

बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 28/12/2014 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते मिपावरील ऑनलाईन बुद्धीबळाचा खेळ पाहण्यासाठी: "ऑनलाईन बुद्धीबळ" या धाग्यात प्रवेश करा. तिथे प्रेक्षकांनी खालीलप्रमाणे log in करायचं आहे: Name: (MiPa3); Password: (Watch) 'Go' वर क्लिक करा. त्यानंतर खालील खिडकी उघडेल, त्यात दर्शविल्याप्रमाणे कृती करा: -- बुद्धीबळाच्या खेळातील खेळींच्या चर्चेचा आणि विश्लेषणाचा आनंद तुम्ही या धाग्यात घेऊ शकाल.

निरंजनाची कविता

लेखक यशोधरा यांनी रविवार, 28/12/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
झोप येईना येईना, कविता सुचली निरंजना | शब्दापुढे रचणे शब्द, हाचि लागला तया नाद| निरंजनाचा कपडा भगवा, आत निरंजन रे नागवा || कौतुक, स्तुती, वाद- विवाद, उपेक्षा आणि अपेक्षा ह्याहीपलिकडे जाणार्‍या शाश्वत परिमाणाशी नातं जोडू शकणारी रॉय किणीकरांची कविता. गहिर्‍या चिंतनशीलतेशी नातं सांगणारी, अचूक मोजक्या शब्दांच्या सहाय्याने विलक्षण असा कायमस्वरुपी असर मनावर टाकणारी आणि मनाला चुटपूट लावणारी. काही उमजलं आहे, समजलं आहे ही जाणीव होता होता, पार्‍यासारखा निसटून गेला, अशा अर्थांची काहीशी अनुभूती देणारी. गूढ आणि तितकीच मोहिनी घालणारी समर्थ शब्दकळा ल्यायलेली, पण काहीशी अस्थिर वाटणारी.