उड उड रे
उड उड रे, उड उड रे, म्हारा काला रे कागला
माझ्या एका राजस्थानी मित्राच्या घरी गेलो असतांना त्याने एक राजस्थानी लोकगीत लावले होते. अस्सल ग्रामीण ढंगाचा ठेका वगेरेमुळे लक्ष वेधले गेले. भाषा माहित नसल्याने अर्थ कळेल असे वाटत नव्हते पण एकदम वाटावयास लागले की, "अरे, हे गाणे आपल्या परिचयाचे आहे," मित्राच्या मुलीला सांगितल्यावर तिने ते लिहून दिले व वाचल्यावर लगेच लक्षात आले कीं असे कां वाटत होते !
मिसळपाव
प्रवास: मुंबईहून तिकोना
वाहन: खासगी
दोन एक वर्षांच्या अंतराने वार्मिंग अप करण्यासाठी कुठला ट्रेक निवडावा याचा विचार करत असताना २७ ला संध्याकाळी तिकोना वर शिक्कामोर्तब झाले.
आतिश नाईक आणि सिद्धेश कदम (५-६ वर्षाच्या अंतराने ट्रेक) २७ला रात्री साडे अकरा वाजता माझ्या कामोठे इथल्या घरी पोहोचले. दोघे दिवसभर काम करून आल्याने मध्यरात्री प्रवास करण्याऐवजी थोडी विश्रांती घेऊन पहाटे लवकर निघावं असं ठरलं.