Skip to main content

तो आणि आम्ही

लेखक अभिदेश यांनी शुक्रवार, 26/12/2014 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
Virat ची Adelaide ची innings बघितली .... १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी झाली. आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या . साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो. ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा .

सपान

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 26/12/2014 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
साळंला सुट्टी पडली की दादा येतो. न्हायतर तो तिकडं शेरात पोरांच्या संगट -हातोय. आई, अण्णा, आज्जी त्याच्याच मागं असत्येत. लाड करायला. दादाची माज्यावर लई माया. माजं तो आईकणार म्हन्जे धापैकी धा. आज्जी म्हन्ली, "उठा आन्जाक्का”. "दादा कुठंय?” म्या इचारलं. “अण्णा गेलेत त्याला आणायला,” आज्जीबाई म्हन्ली. "कायबी बोलू नग. राती दादाच्याच कुशीत झोपली व्हती,” म्या बोल्ली. "दादा, दादू, दाद्या...” म्या बोलावलं. यीना तो. आई आली. “रडू नकोस. दादा येतोय संध्याकाळी.” "काल आला की” म्या पुन्ना बोल्ले. “स्वप्न पडलं तुला दादा आल्याचं. खोटं असतं ते”, आई म्हन्ली. खोटं? मंग हेच सपान.

"ती" दोघं

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 26/12/2014 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
.. महाबळेश्वर प्राईड हॉटेलच्या काऊंटरपाशी घुटमळताना ती मला पहिल्यांदा दिसली. तेव्हा तिचा "तो" तिच्या बरोबर नव्हता. जर हि आमची पहिलीच भेट नसती तर मला नक्कीच आश्चर्य वाटले असते की तिला एकटीला सोडून तो गेलाच कसा. पण त्या क्षणी तरी ती एकटीच तिथे चुळबुळ करत उभी होती. हो, शब्दश: चुळबूळ. खाद्यांवरून आलेल्या ओढणीशी चुळबूळ. पाठीमागून कंबरेपर्यंत आलेल्या केसांशी चुळबूळ. कधी कानाला लटकलेल्या झुंबराशी चाळा, तर कधी हातामधल्या पर्सची उघडझाप. तिथे काहीच न करता उभे राहताना येणारा बावरलेपणा सावरण्याच्या नादात तिची ही धांदल उडत होती. पर्स हाताळण्याची पद्धतही अशी की जणू पहिल्यांदाच पर्स वापरत असावी.

अमृतसर २ - सुवर्णमंदीर

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 25/12/2014 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
घंटाघर चौक प्रवेशद्वार. जालियांवाला बागेपासुन या मार्गाने अगदी ५ मिनिटात आपण या द्वाराशी येउन ठेपतो. डाव्या अंगाला पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आहे तर पुढे प्रवेशद्वारजवळ सामान सुमान ठेवायचा कक्ष आहे. प्रवेशद्वारासमोरचा परिसर विस्तिर्ण आहे. प्रवेशद्वारासमोरच अगदी उथळ म्हणजे केवळ पाऊल बुडेल अशी कुंडे आहेत. त्यात पाय धुवायचे आणि मग मंदिरात प्रवेश करायचा. प्रवेशद्वाराचे रक्षक हे येणार्‍या प्रत्येकावर दोन गोष्टींसाठी नजर ठेवुन असतात - मस्तक झाकलेले असणे आणि पाय धुवुन मगच प्रवेश करणे.

बजेटनुसार चांगले कॅमेरे

लेखक नांदेडीअन यांनी गुरुवार, 25/12/2014 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेर्‍याचे ‘साधारणतः’ तीन प्रकार असतात. (साधारणतः यासाठी की सध्या तरी बाजारात या तीन कॅमेर्‍यांचाच खप जास्त आहे.)

नमस्कार मित्रांनो एक सल्ला हवा होता..........

लेखक चेतन677 यांनी गुरुवार, 25/12/2014 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.त्यानंतर मी एक वर्ष एका कंपनीत काम केले. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला प्रत्येक कामाची भिती वाटते.सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यंत.....जेव्हा मी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा आज आपल्याला काय काम सांगतील?

ओळखा पाहू ?

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 25/12/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
टक्कल डोक्याला चष्मा डोळ्यांना बाळ माझा होईना मोठा. जिथे जातो तिथे पडतो आधार ताईचा वाटतो घ्यावा. मी कोण?

वाहनविश्व: भाग ३ संरचना आणि विभागणी

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 25/12/2014 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग : वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना वाहनविश्व : भाग २ इतिहास
सर्वात आधी पुढचा भाग टाकावयास एवढा उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी. कार्य बाहुल्यामुळे टंकायला वेळ झाला नाही.