Skip to main content

पटलं तर व्हय म्हणा ! !

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 24/12/2014 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कोल्हापूरकडे एक भारी म्हण आहे, ‘पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !’ कालचा प्रसंग. एका परिचितांच्या घरी गेले होते. मुलीच्या शाळेची वेळ. रिक्षावाला दारात थांबून हॉर्न वाजत होता. गृहपाठाचं पुस्तक सापडत नव्हतं. मुलगी युनिफॉर्म घालून पळापळ करतेय आणि बाबा आरडओरडा. आई गोंधळलेली. बाबा : असं कसं सापडत नाही ? सापडलंच पाहिजे. आई : अहो, शाळेला उशीर होतोय, जाऊदे तिला. उद्या दाखवेल गृहपाठ. बाबा : केलाय ना खपून काल ? मग न घेता का जायचं ? तूही शोध. सापडल्याशिवाय जायचं नाही ! आता आईपण शोधू लागली. मुलगी : ‘बाबा, राहूदे, ना, मी सांगते शाळेत, उद्या देईन म्हणून.’ पण बाबा ठाम.

अभिनंदन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 24/12/2014 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ आज महामहीम राष्ट्रपति प्रणव मुखर्जी ह्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय ह्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला . :) अटलजींच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या ... जगाचा विरोध धुडकावुन केलेली पोखरण अणु चाचणी , दिल्ली लाहोर साठी सुरु केलेली बस , पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसुन सुरु केलेले कारगिल युध्द , तिथे आपल्या सैन्याने परत एकदा त्यांना चारीमुंड्याचीत करुन मिळवलेला विजय ...

अफलातून धंदे

लेखक रमेश भिडे यांनी बुधवार, 24/12/2014 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच भारत भेटीमध्ये एका मित्राने काही किस्से सांगितले. मुंबईत लोक कायकाय धन्दे करतील याचा नेम नाही : १) काही लोक अमेरिकेत ट्रस्ट चालवतात आणि अमेरिकेतून वापरलेले कपडे हिंदुस्तानात गरीब लोकांना वाटण्यासाठी घेऊन येतात (विना मुल्य आणि विना इम्पोर्ट ड्युटी) आणि मुंबईत रस्त्यावर `स्वस्त कपडे' म्हणून विकतात. २) काल एक माणूस ऑफिस मध्ये आला होता. माझ्या गाडीचा एक्सिडेंट राजेस्थानला झाला, ड्रायवर पळून गेलाय. म्हणून दुसऱ्या एका ड्रायवरला राजेस्थानच्या एका गावात पोलिस स्टेशन मध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातोय, साला १०००० मागतोय, कारण १ दिवस जेल मध्ये बसावे लागेल.

मला मिपा का आवडते? उर्फ माझी पण नर्मदा परीक्रमा....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 24/12/2014 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
यानबूला येण्यापुर्वी, काहीतरी वाचायला हवे म्हणून, जगन्नाथ कुंटे ह्यांची पुस्तके आणली.ती वाचून मला पण नर्मदा परीक्रमा करण्याची इच्छा झाली.मुळात माझा पिंड अध्यात्मिक.पण वेगळा.आमची मुंज पण वेगळी आणि आमचे सत्यनारायण पण वेगळे. मुद्दाम नर्मदाच्या परीक्रमेला कदाचित जाईनही.पण माझ्यासाठी म्हणून देवाने काहीतरी वेगळी व्यवस्था केली असेलच की, विचार करता करता जाणवले की, यस्स्स्स्स्स...माझी नर्मदाच वेगळी. मुळातच माझा स्वभाव स्वच्छंदी आणि बहूदा त्यामुळेच एककल्ली.आंतरजालावर इकडे-तिकडे भटकट असतांना, मराठी संकेत-स्थळांचा शोध लागला.

अमिताभ व कबुलीजबाब

लेखक उडन खटोला यांनी बुधवार, 24/12/2014 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जुने जाणते सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात असे कबूल केले की सन २००० मध्ये त्याना टीबी रोग झाला होता ,परंतु उपचार घेवून त्यानंतर ते पूर्ण बरे झाले .तरी टीबी च्या पेशंट नी /परिवाराने हताश न होता पेशंटवर पूर्ण उपचार करून घ्यावेत . हे वाचल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले . \ अमिताभ यांनी ही गोष्ट इतके दिवस लपवून का ठेवली ?

सिकोया नॅशनल पार्क

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 23/12/2014 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, गेल्याच शनिवारी सिकोया नैशनल पार्क ला जाऊन आलो. सिकोया नैशनल पार्क हे नेवाडा राज्याच्या दक्षिणेला लागून आहे. या नैशनल पार्कची स्थापना २५ सप्टेंबर १८९० साली झाली. हे पार्क ४०४ ०६३ एकरावर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून ची उंची १४,५०५ फुट. किंग कैनियोन नैशनल पार्कला लागून असलेले हे पार्क मोठमोठाल्या प्राचीन वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे. शनिवारी सकाळी लवकर निघून संध्याकाळी लवकर परत येण्याचा बेत होता पण शुक्रवारी मजबूत पार्टी झाल्यामुळे सकाळी लवकर उठणे झाले नाही आणि निघू निघू म्हणता १० वाजले. हे जंगल अस्वलांसाठी प्रसिध्द आहे पण आम्हाला एकही दिसले नाही.

जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 23/12/2014 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

परवाना !

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 22/12/2014 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं नुसतं! काडेपेटी शोधून मेणबत्ती पेटविली. त्या प्रकाशात घर कसं अगदीच वेगळं भासायला लागलं. निरनिराळ्या वस्तूंच्या लंबुळक्या सावल्या भिंतीवर कशा दिमाखानं डौलू लागल्या.

कोणी अडवले ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 22/12/2014 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Azam-Khan-SP-Mukhtar-Abba… नुकतीच ही बातमी वाचली . आझम खान हे माझे अत्यंत आवडते नेते आहेत . अगदी अकबरुद्दीन ओवेसींच्या पाठोपाठ त्यांच्याच नंबर लागतो माझ्या आवडत्या नेत्यांच्या लिस्ट मध्ये :) त्याची विधानेही फार सुंदर असतात , मागे "मी ताजमहल पाडायचे ठरले असते तर नेतृत्व केले असते " असे विधानही त्यांनी केले होते .