Skip to main content

मवाली भट नी पै

लेखक विअर्ड विक्स यांनी रविवार, 28/12/2014 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून धागा उघडल्याबद्दल स्वताची पाठ थोपटून घेतो. स्वतःच्या लेखनाचा दर्जा ओळखून असल्याने अशी रोचक शीर्षके देऊन वाचक मिळवण्याचा क्षीण प्रयत्न.... असो आता मुद्द्याकडे वळूया. तसा आमचा प्रांत भटकंती या सदरातला , परंतु गेले २-३ महिने बंगळुरुला वास्तव्य असल्याने दुर्ग भ्रमंती होत नव्हती. त्यामुळे लेखन होत नव्हते, परंतु बंगुळूरुतील अनुभवांवर लेख लिहायचा विचार होता. तसे आम्ही पडलो अभियंता वर्गातले त्यामुळे ते अनुभव सर्वांस रुचातातच असे नव्हे. त्यामुळे आपल्या खाद्य्भ्रमंतीवर लेख लिहिण्याचा एक प्रयत्न!

"दि इन्टरव्ह्यू"

लेखक विकास यांनी रविवार, 28/12/2014 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
​ ​भारतात "पीके"च्या निमित्ताने तुरळक टिका चालू आहे. तो चित्रपट अजून पाहीलेला नसल्याने त्यावर भाष्य करण्याचा प्रश्न नाही. पण जे काही संतुलीत व्यक्तींकडून ऐकले त्यावरून असे दिसते की (हिंदूंच्या विरोधात आहे वगैरे) टिका अनाठायी असावी. ती असोत अथवा नसोत, एक स्वागतार्ह दिसले ते म्हणजे नुसतेच ओरडणे चालू आहे. कोणी या चित्रपटावर बंदी घाला असे म्हणल्याचे वाचनात तरी आले नाही. हे नक्कीच पुढचे पाऊल आहे. असो. मात्र पिकेच्या आधी काही काळ "दि इंटरव्ह्यू" या विनोदी / विडंबन चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळेच वादळ उठले होते.

बंदुकीची गोळी आणि ती

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/12/2014 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक जागा मिळाली. समोरच्या सीट वर एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थात केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती. कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे.

अंग माझे

लेखक भीडस्त यांनी शुक्रवार, 26/12/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
वर्जिनल(टवाळ कार्टा) आनिक वर्जिनली वर्जिनल(सार्थबोध) कवी आश्या दोघाचिय्बी स्वारी मागूनसनी एक नमुना सादर क्येलेला हये....... घेता जरा 'धुवायला', घंगाळातले पाणी इथे साबु लावण्या अंगाला काय सांगू जाते माझे ।।१।। अट्टल पारोसे लाजतील,ओतता (शाम्पू) माझ्या डोईवरी अंगावरल्या समस्त रंध्रांत,घासणे जाऊ दे टोक तुझे ।।२।। या ऊरा-पोटावरील दिसती, जरी सार्या वळ्या ती तनु गबदुल असता,पाठीवरती मळ साचे ।।३।। पाठी ग धूऊ जाता तुला,पडतो लोटा भुईवरी पुन्हा करेल यत्न तोवरी,मळ राहिल (तैसाच) काय होते।।४।।

..का आज सारे गप्प

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 26/12/2014 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
..का आज सारे गप्प आपल्यांची हाक आली! कुंपणापार ती निरागस अन् आसामी का निराळी? तेव्हा पेटले गहिवर वन्हि झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली आज आपुलेच वाहता रक्त का वाटे व्यथा निराळी? तुम्हा न गोड लागे तेव्हा अन्न अन् पाणी गात्रे आज ती थिजली अन् बसली दातखीळ साली! ना शब्द करुणा ल्याले ना ओल डोळा आली आज पुन्हा का तुमची विवेकबुद्धी नग्न झाली? ना निषेध दिसला कोठे ना दिसल्या षंढ चर्चा का आज शब्द रुसले अन् मने रिकामी झाली? माणुसकीचा य
काव्यरस

न झालेला पुरुषांचा कट्टा- औरंगाबाद.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 26/12/2014 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांपासुन नुसत्या पुरुषांचा कट्टा करायचे ठरले होते. सर्वांनी जवळ जवळ पंचवीस डिसेंबरच्या कट्ट्याला होकार कळवला होता. पुरुष म्हणजे या भुतलावर अवतरलेला पहिला सजीव. काही अदिमानव पुण्याहुन, काही ठाणे, आणि काही मुंबैवरुन येणार होते. जगप्रसिद्ध बीबीका मकब-याला ठीक अकरा वाजता यायचं आमचं सर्वांचं ठरलं होतं. पुण्याहुन धन्या, सुड, वल्ली, प्रशांत, बॅटमन, आणि इस्पिक एक्का. ठाण्यातून मुवि, डॉ.सुबोध खरे, किसन शिंदे, आणि गवि, मुंबैतुन आणि दुबैवरुन थेट कुंदन येणार होता. सध्या मुंबैत आलो तर येतोच बोलला. जेपी आणि टवाळ कार्टा यांना मिपावर मिपा मिपा खेळायला मिळणार होतं म्हणुन ते येणार नव्हते.

व्हेज बिर्याणी

लेखक अनन्त अवधुत यांनी शुक्रवार, 26/12/2014 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर भाताच्या या प्रकाराला व्हेज बिर्याणी म्हटले पाहिजे असे काहि नाहि. रेसिपी बिर्याणीची आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्यात थोडे फ़ेरफ़ार केले आहेत. मिपावर हे माझे पहिलेच लेखन.हीच रेसिपी मी माझ्या ब्लोग वर पण लिहिली आहे. मुविंनी दिलेल्या प्रोत्साहनाने मी हि रेसिपी मिपावर टाकतोय. मुवि, प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. फोटो काढायचे लक्षात न आल्याने , फोटो नाहीत :( रेसिपीचे फोटो इतके सुंदर येऊ शकतात हे मला मिपावरच कळले. (ह्या वाक्यात अज्जिब्बात अतिशयोक्ती नाहीय) फोटो नसल्याची चूक माझ्याकडे. त्याबद्दल नावे ठेवा, अर्थात त्यासाठी मिपाकरांना माझ्या परवानगीची गरज नाही पुढच्या वेळेस माझी रेसिपी आठवणीने फोटोसह लिहून ठेवीन.

गंध माझे

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 26/12/2014 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29834 वर्जीनल कवीची मापी मागून :) ------------------------------------------------------------------------ ये जरा "बसायला", घे बाटलीतले तीर्थ इथे गाठी शेवया मागाया, काय सांग जाते तुझे ll १ ll अट्टल पिणारे लाजतील, येता (बाटली) तुझ्या हातावरी अंगावरल्या समस्त वस्त्रांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll या शर्ट-प्यांटवरील, पुसती जरी साऱ्या खुणा ती अशी खमकी असता, गालावरचा रंग सजे ll ३ ll सखे ग सहवास तुझा, रंगतो लाल गालांवरी पुन्हा होईल भेट तोवरी, ग्लास वाहील काय ओझे ll ४ ll - पीकेबोध

गंध तुझे

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 26/12/2014 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
ये जरा भेटायला, घे ओंजळीतले फुल माझे गंध सेवण्या तयाचा, काय सांग जाते तुझे ll १ ll कळ्या पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी मृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll या किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा तू अशी साथ असता, पौर्णिमेचा रंग सजे ll ३ ll सखे ग सहवास तुझा, रंगतो निळया लाटांपरी पुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे ll ४ ll - सार्थबोध http://www.saarthbodh.com/2014/08/blog-post.html