Skip to main content

पुन्हा एकदा नळीची वाट - पूर्वार्ध

लेखक सह्यमित्र यांनी मंगळवार, 25/11/2014 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
हरीश्चंद्रगड हा ट्रेकर्स आणि नॉन-ट्रेकर्स दोन्हीकडे प्रसिद्ध असलेला किल्ला आहे. बहुतेकांना तो परिचित आहे ते निसर्गाचा अविष्कार असलेल्या रौद्रभीषण कोकणकड्यामुळे, त्याच्या लांबच लांब न संपणारया खिरेश्वर / टोलार खिंडीच्या वाटेमुळे, किंवा अतिप्राचीन आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असणाऱ्या तेथील शिवमंदिरा मुळे. ह्या किल्ल्याचा विस्तार बघता त्याला एक किल्ला न म्हणता अनेक डोंगरांचा समूह म्हणणे जास्त योग्य राहील. विस्तार आणि उंची दोन्ही बाबतीत हा किल्ला भव्य म्हणावा असाच आहे.

तिची साधीशी कविता

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 25/11/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
तिची साधीशी कविता माझा अर्थाचा गोंधळ काळेसावळे ते ढग तिचा सखा घननीळ | तिची साधीशी कविता शोध अंतरीचा घेई खोल विरहाचे दु:ख अलगद वर येई | तिची साधीशी कविता म्हणे तुझी माझी भेट आज वसंत बहर पुढे वैशाखाची वाट | तिची साधीशी कविता थोडे डोळे पाणावती दोन मोतियांचे अश्रु तिच्या गाली ओघळती | तिची साधीशी कविता माझ्या गळा एक मिठी शब्द विरुनिया गेले अर्थ एक दोघा ओठी !! ( पुर्वप्रकाशित )

गुढ (एक रहस्य कथा-भाग १)

लेखक चेतन677 यांनी मंगळवार, 25/11/2014 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
गुढ इयत्ता सातवीचा निकाल लागला होता. अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहात उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकु आले आणि तो थेट पळाला ते शिवमच्या घरी..... "शिवम....ए शिवम...लवकर बाहेर ये..." तो ओरडला. " व्वा,मित्रा आलास तु!!

सोनसाखळी

लेखक मारवा यांनी मंगळवार, 25/11/2014 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
तो तसा खानदानी सर्टीफ़ाइड, म्हणजे –वडिल-आजा-पणजा माहित असलेला, फ़ॅमिली ट्री असलेला, ब्लु ब्लडेड ! साहेबांनी जास्त किंमत मोजुन आणलेला, शिवाय सॉलीड ट्रेन्ड ! शॉक्स- स्टीक्स –हंगर- रीपीटेशन ( दिडशे मिनीमम पर डे एका अचुक विधीने टांग उचलण्यासाठी ) देउन केलेला ट्रेन्ड सॅल्युट ! म्हणताच विशिष्ट पोज देणारा, दिल जीतने वाला कुत्ता ! माणसांहुन जास्त वफ़ादार ! साहेब प्रेमळ ,पट्टा क्लासी लेदरचा, आणि गोल्ड प्लेटेड सोनसाखळी. साहेब नियमीत सकाळचा फ़ेरफ़टका मारतांना त्याला बरोबर नेतात, बरोबर ताफ़ाच असतो.साहेबांच्या. साहेब मात्र सोनसाखळी घट्ट धरुन ठेवतात फ़ारच नाईलाज झाला तरच गार्ड ला देतात.

कोकणात रबर लागवडीचा विचार आहे

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 25/11/2014 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आजच सुरू करण्यात आलेला 'तिसरी मुंबई' हा धागा पाहून मनात विचार आला की वर लिहिलेल्या (रबर लागवड) विषयावर मिपाकरांची मते घ्यावीत. ("गुंतवणूक" आणि "जमीन खरेदी" यापलिकडे या दोन विषयात काहीही समानता नाही हे आधीच नमूद करतो). पार्श्वभूमी अशी: नुकत्याच एका केरळीय मित्राकडून विचारणा झाली, "तुमच्या महाराष्ट्रात, कोकणात कुठेतरी रबर लागवड होत आहे असे ऐकले. खरे काय?" मी कोकणातला असूनही मला याबद्दल केवळ ऐकीव माहिती होती. त्याचा या विषयातील रस पाहून उत्सुकता मात्र वाढली. मग असे ठरले की दोघानी यासंदर्भात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करायची.

छावणी - ५

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 25/11/2014 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्झा सिकंदरअली खान दर दोन - तीन दिवसांनी आपल्या मित्राची चौकशी करण्यासाठी छावणीत येत असत. येताना शहरातून काही आवश्यक वस्तूही आणत असत. प्रताप आणि उमा यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांनाही खूप वाईट वाटलं. महेंद्रनाथ आणि कमलादेवींचं सांत्वन करताना ते म्हणाले, "आपल्या तकदीरमध्ये जे असेल ते भोगल्यावाचून आपल्या हाती काही नसतं महेंदर! अल्लाको जो बच्चे सबसे प्यारे होते है, अल्ला उन्हें अपने पास बुला लेता है! प्रताप और उमाबेटीके साथ जो बी हुआ उसका मुझे बहोत अफसोस है! मेरे मजहबके लोग जो कुछ भी कर रहे है, वो देखकर उन्हें मुसलमानतो क्या इन्सान कहनाभी गलत होगा! इन्सानियत के नामपर कलंक है ये लोग!

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

लेखक hitesh यांनी मंगळवार, 25/11/2014 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे. सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते. पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत.. सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल. सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल. बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग नवे अएर्पोर्ट सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल. फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

बळी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 24/11/2014 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
(कथा काल्पनिक आहे) काही वर्षांपुर्वी देशात खाद्य तेलांची कमी दूर करण्यासाठी सोयाबीन तेलाचे उत्पादन वाढविण्याचे धोरण सरकारने राबवायला सुरवात केली, अल्प दरात बँके कडून कर्ज, सुरवातीच्या काही वर्ष व्याज माफी इत्यादी सुविधा सरकारने सोयाबीन तेल उत्पादकांना देऊ केल्या. या सरकारी धोरणांचा कृषी विज्ञानी श्रीयुत वाघमारे यांनी वीआरएस घेऊन विदर्भात त्यांच्या राहत्या गावी, सोयाबीन ऑयल मिल टाकली. सुरवातीच्या दोन-तीन वर्षानंतर गाडी रूळावर येऊ लागली, पण नफा काही त्यांच्या हातात आला नव्हता. त्यासाठी मिलची उत्पादन क्षमता किमान ७०% तरी गाठणे आवश्यक होते.

पाण्यासारखी...

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 24/11/2014 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा मी तुला म्हटलं, तू आहेस पाण्यासारखी... जो रंग टाकावा, तो सामावून घेणारी, रंगाच्याही नकळत रंगासारखी रंगणारी... आज पुन्हा आठवतंय, आज पुन्हा ते पटतंय पण संदर्भ किती वेगळा... पाणीसुद्धा काही वेळा किती कोरडं असतं मिसळू पाहणारं बरंच काही त्याच्यासाठी उपरं असतं... खरंच तू पाण्यासारखी आहेस खरंच, आज पुन्हा पटलं नकळत किती खरं सांगितलं मी नवल? दु:ख मनात दाटलं...