Skip to main content

Four ducks in a pond

लेखक शरद यांनी शुक्रवार, 28/11/2014 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
Four ducks in a pond आपल्या आयुष्यात, तसे बघावयास गेले तर अगदी किरकोळ म्हणावीत, अशा काही घटना घडतात, अशी काही वाक्ये कानावर पडतात / वाचनात येतात,, काही दृष्ये बघावयास मिळतात की, जी आपल्या संपूर्ण आयुष्यात खोलवर रुतून बसतात. किरकोळ का म्हणावयाचे तर त्यांचा आपल्या नेहमीच्या जगण्याशी तसा काही संबंध नसतो. (इतर कोणी ते सगळे विसरून जाण्याचीही शक्यता असते. त्यांचे सोडा.पण) भावनाशील व्यक्तीच्या बाबतीत असे घडणे नैसर्गिक असू शकते. इथे तर्काला, विवेकाला, विचाराला वाव नसतो. कशावरून निघाले ...... १९७७ च्या ललितच्या दिवाळी अंकात माधव मनोहर यांचा एक लेख होता "एका सामुदायिक काव्यानुदाची कहाणी".

उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती, असावी/नसावी ?

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 27/11/2014 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा फिल ह्यूजचा मृत्यूदिवस हा क्रिकेटसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. मिपाकरांतर्फे मी, 'ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो' अशी प्रार्थना करतो. सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले. अवघ्या २५ वर्षांचा ह्युज शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान मंगळवारी बाऊन्सर लागून व तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तो कोमात गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र आज त्याचे निधन झाल्याने ही झुंज अपयशी ठरली.

पुन्हा एकदा नळीची वाट - उत्तरार्ध

लेखक सह्यमित्र यांनी गुरुवार, 27/11/2014 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत निम्म्या पेक्षा जास्त अंतर पार झाले होते. सलग साधारण ६०-७० अंशातील खडी चढण गेले ३-४ तास चढत होतो. काही वेळात मी आणि प्रशांत नळीच्या वाटेतील प्रसिद्ध अशा उंबराच्या झाडाच्या patch पाशी आलो. अतिशय चिंचोळी होते गेलेली घसाऱ्या ची वाट, समोर आलेला dead end आणि उजवी कडे साधारण २० फुटांचा काहीसा कठीण rock patch आणि त्याच्या वरती ते बाहेर डोकावणारे छोटेसे उंबराचे झाड. ह्या खुणा बघून माझ्या आणि प्रशांत च्या २००६ मधील ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा ह्याच patch ने आमचा सगळ्यात जास्त वेळ घेतला होता.

क्विझ वगैरे

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 27/11/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

पाकिस्तान !

१. 'पाकिस्तान'चा जीना यांनी सांगितलेला अर्थ काय... २. ज्याची आई हिंदू होती अशा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे नाव सांगा ३. मदर ऑफ तालिबान, डॉटर ऑफ ईस्ट असे कुणाला म्हणतात ! ४. लारकाना मतदारसंघाशी कोण संबंधित आहे ५. राज्ये किती आहेत आणि सर्वात मोठे राज्य(सुभा) कोणते ६. या सर्वात मोठ्या राज्याने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे ७. हिंदू लोक तिथे आहेत का ८. हिंदूंचा बाप असे कोणाला म्हणतात ९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती १०.

हॅप्पी थॅन्क्स गिव्हिंग

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 27/11/2014 13:15 या दिवशी प्रकाशित केले.

हॅप्पी थॅन्क्सगिव्हिंग

|| ॐ दवणेय नमः || माझ्या मिपावरील सर्व मित्र मैत्रीणींना आज थॅन्क्स गिव्हिंगच्या निमित्ताने मी धन्यवाद देवु इच्छितो ! मिपावरील चर्चात , काथ्याकुट मधील कचकचीत वादात , कवितांमध्ये , लेखनांमध्ये , भटकंतीच्या धाग्यांमध्ये आपण ज्याप्रकारे प्रतेकाला सामावुन घेता त्याला तोड नाही . मिसळसळ्व्पाववर येवुन कधी मिसळलो झालो ते कळालेच नाही .

एका नव्या इतिहासाची सुरुवात -३

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 27/11/2014 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१ एका नव्या इतिहासाची सुरुवात -२ अपयशाची काळी झाक अवकाशाच्या करड्या अंतरंगातून ठळक झाली. .. ‘वृत्तार -४ पण परत आला ?’ ‘होय महाराज.’ ‘तिला इथे यायला प्रवृत्त करण्यात त्या सर्वांना अपयश यावे हे अनिष्ट आहे..’ ‘...’ ‘सापेक्ष कालगतींचा आलेख घे पाहू...’ करड्या गाभ्याच्या अंतरंगात काही त्रिमित प्रकाशमान रेषा अवतीर्ण झाल्या. त्यांच्या छेदबिंदूंवर प्रकाशवलये लवलवत होती. आलेखाच्या एका एका भागाचे परीक्षण केले जाऊ लागले.

अंधार क्षण (लेख १४): भाग ४ - कैद

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 27/11/2014 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ४ - कैद मानवी समूहांनी जेव्हा एकमेकांशी लढायला सुरूवात केली तेव्हापासून युद्धकैदी ही संकल्पना आहे. दुस-या महायुद्धाआधी युद्धकैदी हे शत्रूचे सैनिक असायचे. शत्रूच्या नागरिकांना कैद  करणं हे दुस-या महायुद्धातच सुरू झालं. . याआधीच्या किंवा नंतरच्या दुसऱ्या कुठल्याही संघर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांना  कैद केलं गेलं नाही. एवढंच नाही तर या लोकांना ज्या प्रकारे कैद केलं गेलं त्यातही पराकोटीची विविधता आपल्याला दिसून येते. या भागात ज्या ९ कथा आहेत त्यांत हा मुद्दा आला आहेच.

छावणी - ७

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 27/11/2014 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरानवाला इथल्या निर्वासितांच्या छावणीतील पंधरा हजार निर्वासितांपैकी तीन हजारांचा पहिला जथा हिंदुस्तानच्या वाटेला लागला होता! हा जथा हिंदुस्तानात पोहोचवून हिंदुस्तानी लष्कर गुजरानवाला इथे परतलं की दुस्ररा जथा निघणार होता! जास्तीत जास्त पंधरा दिवसात निर्वासितांच्या या जथ्याला हिंदुस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी होऊ असा मेजर चौहानांना विश्वास होता. नियतीच्या मनात काय होतं? सुरवातीला प्रत्येक जण उत्साहात वाटचाल करत होता. आजपर्यंतचं आयुष्य ज्या देशात, ज्या मातीत घालवलं ती सोडून निघावं लागलं होतं याची खंत असली तरी प्रत्येकाला आता आस होती ती एका नवीन भविष्याची, आपल्या देशाची!

Our Undoing ,शेवटचा दिवस.

लेखक Targat Porga यांनी बुधवार, 26/11/2014 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
'शॉर्ट फिल्मच्या'शूटिंगचा शेवटचा दिवस..., नेब्याने (दिग्दर्शक) सर्वांना संध्याकाळी ७:३० पर्यंत शाम्याच्या घरी(शुटींग च ठीकाण) हजर राहण्याची आधीच ताकीद दिली होती. त्या नेमाने मी ७:१५ लाच शाम्याच्या घरी धडकलो. खरेतर शाम्या आणि कंपनी नेब्याच्या घरी सुट्याची वाट पाहत बसलेले होते. तिकडून ते सर्व लोक मिळून शाम्याच्या घरी येणार होते. मी(स्क्रीनप्ले रायटर) एकटाच माझ्या गाडीवर बुड टेकवून शांतपणे शाम्याच्या घराबाहेर कानात हेडफोन टोचून सगळ्यांची वाट पाहत उभा होतो. खरेतर हा शांतपणा थोडाच वेळ टिकाव धरून राहिला. त्याची जागा एव्हाना प्रचंड राग आणि व्देषाने घेतली. कारण,अर्थातच सुट्या!

२६/११

लेखक _मनश्री_ यांनी बुधवार, 26/11/2014 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
1 2 3 आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला झालेल्या घटनेस सहा वर्षे पूर्ण झाली , या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व शहीद जवान ,पोलिस आणि निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली