Skip to main content

रन राहुल रन...!!

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 26/10/2014 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
.................................................................. सुरुवातीच्या काळातील लिखाण, थोडेफार सत्यघटनेवर आधारीत. .................................................................. रन राहुल रन...!! धापा टाकतच राहुल उठला. त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते. छातीतील धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. एका हाताने ती धडधड रोखायचा प्रयत्न करत दुसर्‍या हाताने बिछान्याचा आधार घेत तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. आपण आपल्या घरातच, स्वत:च्याच बेडवर आहोत याची खात्री पटू लागली तसे हळूहळू नॉर्मल होऊ लागला. पण मन अजूनही साशंक होते.

चेतन भगत आणि त्याची पुस्तकं

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 25/10/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हा एक वेगळाच प्रकार आहे. नेहमीची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांशिवाय इतरही बरीच ' इंटरेस्टिंग ' पुस्तकं तिथे दिसतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं; काॅमिक्स; ' हाऊ टू ' प्रकारातली पुस्तकं; वशीकरण, इंद्रजाल, लाल किताब असले डोक्याला शाॅट असणारे प्रकार; पाककृती; चाणक्यनीती; अकबर-बिरबल वगैरे भरपूर मालमसाला या स्टाॅल्सवर बघायला मिळतो. एकाच ठिकाणी मुन्शी प्रेमचंद आणि सुरेंद्र मोहन पाठक सारख्या दोन टोकाच्या लेखकांच्या कादंब-या तुम्हाला रेल्वे स्टेशन स्टाॅलवरच सापडतील. ज्याला टाईमपास लिटरेचर म्हणून अभिजनवादी नाकं मुरडतात, त्यातलं बहुतांशी वाङ्मय इथे मिळतं.

पिंपळ (रहस्य कथा) - भाग १

लेखक खोंड यांनी शनिवार, 25/10/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
करकर आवाज करीत आणि कच्च्या रसत्यावरील पांढरा धुरळा उडवीत एस टी थांबली. रसत्याच्या कडला बसलेले दोघं तिघं उठून एस टी च्या मागच्या बाजू जवळ आली. "आली बाबा शेवटली बस " ९.३० झाले म्हणलं आता काय येत नाय वाटतं " एक म्हातारा बाबा खाट करून खटक्याचा आवाज झाला आणि एखाद्या पुराणी हवेलीचा दरवाजा उघडावा तसा आवाज करीत वाहकान दरवाजा ढकलला. २ बाया उतरल्या त्यांच्या पाठोपाठ एक इसम उतरला. हातातली हिरव्या रंगाची लोखंडी ट्रंक सांभाळत तो उतरला. काखेत एक कवी लोक वागवतात तशी पिशवी. गाडीन यु टर्न घेतला. ३-४ जन एस टी मध्ये चढले आणि गाडी परत धुराळा उडवीत करकर आवाज करीत निघाली. तो इसम तसाच रसत्या च्या बाजूला थबकला.

फटाक्याचा आनंद (लघु कथा)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 25/10/2014 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी, महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडीत राहत होता. एका लहान मुलाप्रमाणे त्याच्या मनात ही राकेट, अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. पण त्याच्या बाबांनी एक छोटे से पिस्तुल दिवाळी निमित्त त्याला आणून दिले होते. दिवस भर टिकली सारख्या गोळ्या उडवून तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी आणू शकत नाही, आपण गरीब आहोत, ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला.

कारुण्य टंकन

लेखक निराकार गाढव यांनी शनिवार, 25/10/2014 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
व्रण जीर्ण बंधनांचे भयगच्च कंपनांचे दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे क्षण क्षीण रासभाचे समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी | जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी || रण अंगणी धुळीचे मतिशून्य गोंधळीचे विषदग्ध चित्त साचे क्षण क्षीण रासभाचे घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके | चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर, करि हन्त हन्त श्री अंबिके || लय स्तब्ध बद्ध गुरूचे जय शुष्क रुक्ष तरूचे हत रिक्त आर्ततेचे क्षण क्षीण रासभाचे अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या, सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या | चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या, वसुधैव गगनी दिशा लु

"डोब्रा"

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 25/10/2014 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
(हि कथा "अती काल्पनिक" आहे याची कृपया नोंद घ्यावी") डॉक्टर शेणोय हे मानव वंश शास्त्राचे गाढे अभ्यासक व तज्ञ. जगभरातील आणि भारतातील मानव वंशा बद्दल त्यांचा दांडगा व्यासंग होता. आपल्या सारख्या सामान्य लोकांना फक्त युरोपियन, आफ्रिकन, चीनी आणि आशियायी असे मूळ मानव वंश माहित आहेत कारण ते बघताचक्षणी आपल्याला लक्षात येतात. पण आपण जसे भारतीयांमध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांना ओळखू शकतो तसे युरोपियन लोक आपल्याला ओळखू शकत नाहीत त्यांना सारे भारतीय सारखेच. तसेच आपल्या दृष्टीने डच, फ्रेंच, ब्रिटीश, स्पेनिश हे सगळे युरोपियनच.

एक पोएटीक कन्फ़्युजन झालय

लेखक मारवा यांनी शुक्रवार, 24/10/2014 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेक वर्षांपुर्वी एक सुंदर गझल जगजित सिंग च्या आवाजात ऐकली होती. ती प्रचंड आवडली होती. तीच्या मधुर चालीमुळे ती डोक्यात अधुनमधुन घुमत राहयची. नंतर ती कॅसेट (ती काळ्या फ़िल्म वाली) हरवली मात्र गझल डोक्यात रुतुन बसली. तिचे शब्द व त्यांचा एक मनात लागलेला अर्थ देखील तसाच फ़ीट्ट झाला. आपले गैरसमज जसे घट्ट होउन जातात तसाच. मी ती बेहोश गुणगुणत असे व मोठा आनंद मला ती गझल गुणगुणतांना व्हायचा. तिचा अर्थ त्यातले शब्द व सर्वात महत्वाच म्हणजे जगजित चित्रा चा आवाज तर खुपच पागल करायचा, प्रचंड आवडायचा.

चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

लेखक खोंड यांनी शुक्रवार, 24/10/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
"५ कटिंग दे रे…. " माझ्या कडून ऑर्डर गेली … "जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं … दोघे सिगरेटी घेऊन आले…. "च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता "काय झालं रे " मी सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला सगळे सावंत कडे डोळे लाऊन "सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … " "अर्रर्र ….

चहा व कोंबडीच्या अंड्या पासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ?

लेखक मारवा यांनी शुक्रवार, 24/10/2014 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
चहा व अंड (कोंबडीच यापुढे कों.च हे शार्टफ़ार्मात वाचावे) हे विधात्याने दिलेले मर्त्य मानवाच्या जीवनाच्या कठोर संघर्षात त्याच्या थकलेल्या मना-शरीराला दिलासा व विलक्षण आनंद देणारे दोन वरदान आहेत. या दोन वरदानाच्या सेवनाने मनुष्य भौतिक च नव्हे तर आध्यात्मिक जीवनातील अडथळे देखील सहज पार करु शकतो. म्हणजे ते इटसेल्फ़ अडथळे पार पाडत नाही मात्र यांचे सेवन मनुष्याला एनर्जाइझ करते व थकवा घालवुन तरतरी प्रदान करते. त्या तरतरी च्या तरफ़ेवर स्वार होउन मनुष्य भवसागर पार करु शकतो. वरचा आध्यात्मिक उल्लेख सीरीयस आहे.