अंधार क्षण भाग २ - अलाॅयस फाॅलर (लेख ६)
अंधार क्षण - अलाॅयस फाॅलर
१९३३ मध्ये नाझींच्या हातात जर्मनीची सत्ता आल्यावर पहिली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर ती म्हणजे सर्व विरोधी आवाज बंद करणं. हिटलरचा उजवा हात हर्मन गोअरिंग प्रशियाचा म्हणजे जर्मनीतल्या सर्वात मोठ्या राज्याचा गृहमंत्री होता. त्याने नाझी निमलष्करी संघटना आणि प्रशियन पोलिस यांचं एकीकरण घडवून आणलं. त्यामुळे नाझींच्या हातात पोलिसांचे अधिकार आले आणि ते त्यांनी विरोधकांच्या दडपशाहीसाठी सर्रास वापरले. त्यांना विरोध करणं म्हणजे स्वत:चा मृत्यू ओढवून घेणं होतं.
मिपादेवीची विनवणी?
अनेक शतकी धागे पाहुनि, नावे मजला ठेवू नका।
मीच विनविते हात जोडुनी उगाच मजला छळू नका।।
जिलब्यांचा अतिदिव्य वारसा मिसळपाविनो तुम्हा मिळे।
उणे कुणाचे दिसता किंचित दवंडी द्याया विसरू नका।|
व्हा ज्ञानाचे वाढपी तुम्ही, जिलबीमारा करीत रहा ।
कलम चालवा सालभर तरी सण शिमग्याचा आणु नका।|
जिलब्यांच्या उत्साहावरती कधीच विरजण घालू नका।
टीआरपीच्या धाग्यांवरती मागे कोणी राहू नका।|
जिलबी पाडा, काकू पाडा, जमले तर मग लेखही पाडा।
पण काकूचे काश्मीर करताना बर्फामध्ये पडू नका।|
मिपा आपुले करा नामांकित परी, इतरा नावे ठेवू नका।
डु आयडी ने लिहिता लिहिता वरिजनलला विसरू नका ।|
कंपू पेरा अपुल्या भवती, पिंक पिंकेने रंगतसे।
पंचप्राण
ती नसेल तर होईल आर्त एक कल्लोळ
झपाटलेल्या पिंपळावर विरहविजेचा लोळ
ती नसेल तर होईल विरक्त जीवनगाणे
बैराग्याच्या थाळीतले भकास पै-आणे
ती नसेल तर होतील प्रश्नच अंतर्धान
जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण
काव्यरस
पुण्यदेवीची विनवणी
अनेक शतकी उमर गाठली, नावे मजला ठेवू नका।
मीच विनविते हात जोडूनी, पुण्यावरती जळू नका।।
शिवसूर्यचा दिव्य वारसा शहरवासियो तुम्हा मिळे।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।|
व्हा ज्ञानाचे जोतीबा इथे तुम्ही, शेणमारा हा करू नका ।
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।|
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।
इथेच गर्दी, इथेच महागाई, असे शंखच, पोकळ फुंकू नका।|
निव्वळ रस्ते मॉल बिल्डिंगा, म्हणजे शहर मानू नका।
लाख लाख जन माझ्याअंतरी रमले वसले, हे कदापी विसरू नका।|
गावं आपुले करा नामांकित परी, करमणुकीच्या गटारगंगेत मला तुम्ही क्षाळु नका।
मजला देवी म्हणुनी भजू नका, पण दासी म्हनोणही पिटू
जम्मू- कश्मीर मदत कार्य अनुभव- १
सर्वप्रथम मिपा संस्कृतीला मन:पूर्वक अभिवादन! मिपा टीम आणि मिपावरील सर्व मान्यवर लेखक- वाचकांना मन:पूर्वक नमस्कार. आज मिपावर लिहायला सुरूवात करताना आदराची भावना मनात आहे. आजवर मिपावर असंख्य दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख वाचले. अशा मिपावर लेखन करताना सर्वांना पुनश्च अभिवादन करावसं वाटत आहे. हे लिहिण्याची सुविधा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद किंवा मिपा भाषेत धन्स! :)
पूरग्रस्त जम्मू- कश्मीरमध्ये मदत कार्यात थोडा सहभागा घेता आला; त्याबद्दल काही लिहू इच्छितो.
संभाषण
ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते.
ते वाक्य वा शब्द आल्याशिवाय त्यांचे संभाषण वा गप्पा पुर्ण होत नाहित..
एम.आय.डी सी. त असे अनेक नमुने होते..
एकाला बोलताना.." पण मी काय म्हणतो" असे म्हणायची सवय होति..
एकाला " मला एकच कळत" तर एकाच्या वाक्यात "च्यायला" शब्द आलाच पाहिजे असा नियम होता..
एक जण कायम "हरी हरी" म्हणत असे
काहिना "शिट यार" तर काहिन फ** इट" अशी ईंग्रजीत म्हणायची सवय असते
१ ना २ असे अनेक नमुने आपणास हि माहित असतिल..
एव्हढेच नव्हे तर आपणहि एखाद्या शब्दाचा वा वाक्याचा कायम उपयोग करत असतोच म्हणा...
काही असे लोका नावडे...पण मज गमते मनोहर...
आजची (पुण्यातली) सकाळ मस्त आहे. हवेत सुखद गारवा आहे; कोवळे-कोवळे ऊन थंडीची लज्जत आणखी वाढवतेय. आज कार्यालयात कामदेखील कमी आहे. सकाळी कंपनीच्या बसमधून कार्यालयात येतांना 'आशिकी'चे "मेरा दिल तेरे लिये, धडकता हैं..." ऐकले. मस्त वाटले. या गाण्याचा ठेका मला खूप आवडतो. एकदम शाळेतल्या वयात गेल्यासारखे वाटले. दिल बाग बाग हो गया. नंतर एकदम "तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..." वर उडी मारली. अल्ताफ राजाचा तो निराकार आवाज ऐकून कॉलेजचे दिवस आठवले. मध्येच मला बायकोचा फोन आला. मी असा गाण्यांमध्ये रममाण झालेला असतांना तिचा फोन हमखास येतो.
काही प्रसंग
काही प्रसंग.
वेळ: तुमच्या मनात येईल ती …
स्थळ: तुम्हाला वाटते तेच.
प्रसंग पहिला
सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात.
एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं
दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं.
कमल घर (एक वात्रटपणा)
कमल घर
चार एक वर्षांपूर्वी मी "उपक्रम"वर हायकूवर एक लेख लिहला होता.नेहमीच्या ५-७-५ या तंत्राची माहिती दिल्यावर कवी श्री. राजेश घासकडबी यांनी एक पृच्छा केली
कमल घर
बघ कमल घर
कमल बघ
ह्याला हायकू म्हणावयाचे का ? माझा यावरचा प्रतिसाद थोडा दीर्घ व अवांतर असल्याने प्रतिसाद म्हणून न देता एक नवीन चर्चा विषय म्हणून मांडला होता. चर्चा का हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल.
फारा वर्षांपूर्वी सत्यकथेत एका लेखिकेची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी कवीमंडळात ही एक फार मानाची गोष्ट होती. आता आम्हाला कळली नाही, पण हे काही नवीन नव्हते. नेहमीचीच ओरड. खरी गंमत पुढील अंकात. त्या लेखिकेने पत्रच लिहले.
मिसळपाव