Skip to main content

चिनू ची गोष्ट !!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 07/11/2014 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
चिनू ची गोष्ट !! मे महिन्याचे दिवस होते.यंदाची मे ची सुट्टी काकांच्या गावाला साताऱ्याला घालवायची असे समस्त बच्चे कंपनी चे ठरले होते. मला ते साताऱ्याचे घर फार काही आवडायचे नाही. तसा वाडा मोठा होता, पण जुनाट वाटायचा. रात्रीच्या वेळी तर भयंकर शांततेचा आणि भकास वाटायचा. कधी मुक्काम केलाच तर कधी एकदा उजाड़ते आणि सगळे उठतात ....अस होऊन जायचं मला. आईला मी म्हणायचेही नेहमी... की मला नाही आवडत इथे.... पण काय ...आई काहीतरी सांगुन विषय टाळायची.....उगीच काका काकूंना काय वाटेल असे त्यांनी ऐकले तर...... काकांची आर्थिक परिस्थिति तशी बेताचीच.

पांढरा रस्सा

लेखक जागु यांनी गुरुवार, 06/11/2014 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर पांढरा रस्सा म्हटल की कोल्हापूर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरी स्पेशल मेनू मध्ये गणला जाणारा हा पांढरा रस्सा आणि सोबत असणारा तांबडा रस्साही नाव काढल्याबरोबर अगदी तोपासु होत. कोल्हापूरात ह्यासाठी लागणारे मसाले खास गिरणीत दळून आणतात असे ऐकले आहे. कोल्हापूरकर ह्यावर अजून माहीती देतीलच. माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि ती करून मी करून पाहीली. फारच झ्याक (टेस्टी) लागला हो. पारंपारीक पद्धत अजून वेगळी असू शकते ती जाणून घ्यायची इच्छा आहे कोल्हापूरवासियांकडून.

दिवाळी पोस्त.

लेखक हरकाम्या यांनी गुरुवार, 06/11/2014 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना दिवाळी " पोस्त " हा प्रकार माहिती असेल. माझ्या बालपणी मला दिवाळी पोस्त हा प्रकार माहिती होता. त्यावेळी हक्काने पोस्त मागणारी एकच असामी अस्तित्वात होती ती म्हणजे " पोस्टमन " लोक त्याला न मागताही पोस्त देत असत त्याबद्दल काही वावगे वाटात नसे. हा सगळा देणारा आणि घेणारा यांच्या राजीखुशीचा मामला असे. या दिवाळीत मला दोन वेगळे अनुभव आले. सकाळी " Morning Walk " ला गेलो असताना " Gas Cylinder" घरी पोचवणारा माणुस भेटला त्याने मला थांबवुन " काय साहेब दिवाळी पोस्त " विसरलात काय.

मदत हवी आहे - मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 06/11/2014 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी खरंच ब्लँक झाले आहे... काही महिन्यांपुर्वी टेचात एक जवाबदारी घेतली होती... मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण शिकण्यास मदत व्हावी म्हणुन काही प्रेझेन्टेशन बनवायचे आहे.. त्यात चित्र / हलती चित्र (अ‍ॅनिमेशन) वगैरे वापरुन मुलांना "बघुन / वाचुन" समजेल अशा स्वरुपात हे काम करायचे आहे. ह्यात नाम, सर्वनाम, क्रियापदे, प्रत्यय, अव्यय इ सगळंच आलं.. मला क्रियापदे आणि प्रत्यय हे काम दिलं गेलं... मुलं पहिली - चौथी ह्या वयोगटातली असावीत.. मी शाळेला भेट देऊ शकले नाही पण हे काम ज्याने सुरु केले त्याच्या कडुन कळालं की साधारण ४ पायर्‍या आहेत.. त्याला आपण पहिली ते चौथी म्हणु..

<< पंगत- नवमीपाकरांची - भाग १>>>

लेखक जेपी यांनी गुरुवार, 06/11/2014 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ प्रेरणा :- पिवळा डाबिंस यांचे हे दोन लेख.भाग १ आणी भाग २ डिसक्लेमियरः- १) सदरिल लेखातिल पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहे. भविष्यात आसे काहि घडल्यास जबाबदारी माझी नाहि. २) सर्वानीं हलके घ्यावे.

अंधार क्षण भाग २ - व्लादिमीर कँटोव्हस्की (लेख ८)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 06/11/2014 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - व्लादिमीर कँटोव्हस्की साल १९४३. कडक रशियन हिवाळा. व्लादिमीर कँटोव्हस्की नावाचा २० वर्षांचा रेड आर्मीतला सैनिक सोविएत तटबंदीच्या मागे उभा होता आणि समोरच्या दाट झाडीकडे पाहात होता. झाडीत काही जर्मन सैनिक होते पण नक्की किती ते रशियनांना  माहित नव्हतं. कँटोव्हस्की ५४ व्या गुन्हेगार तुकडीत होता. त्याला माहीत होतं की आता कुठल्याही क्षणी आपल्याला त्या झाडीच्या दिशेने जायचा आदेश मिळेल आणि लढाईद्वारे टेहळणी करावी लागेल. तो आणि त्याचे सहकारी  जर्मन सैन्यरेषेच्या दिशेने जातील आणि जर्मन सैनिकांचं लक्ष वेधून घेतील.

दर्शनता!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/11/2014 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी. सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे, काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे. विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको. कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही, कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही! काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे! भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!! काव्याच्या या शाळेमधला कायमचा मी विद्यार्थी, कळले इतुके जितुकी झाली शाळा माझी त्या अर्थी. धडा कधी हा संपत नाही कैसे
काव्यरस

झिरना गेट......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 05/11/2014 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
झिरना गेट...... हवालदाराची जबानी..... ‘हो साहेब मलाच सापडले ते प्रेत. मी नेहमीप्रमाणे लाकूडफाटा गोळा करण्यासाठी सकाळी बाहेर पडलो होतो. टेकडीच्या माथ्याआधी एक देवराई व बांबूचे बन लागते तेथेच दिसले मला ते. ही टेकडी कुठे आहे ? आपल्या या फरासखान्यापासून जो रस्ता रामपूरकडे जातो त्या रस्त्यावर आर्धा मैल आत ! ती देवराई जरा एकांतातच आहे.’ ‘जरा सविस्तर सांग ’ गोरा साहेब म्हणाला. ‘तो माणूस पाठीवर उताणा पडला होता. त्याच्या अंगात निळी बाराबंदी व डोक्यावर भरजरी मुंडासे होते. छातीवर आरपार गेलेला घाव स्पष्ट दिसत होता.

बरळप्रहरी..

लेखक गवि यांनी बुधवार, 05/11/2014 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/11/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या बोलण्यातले शब्द तोंडून बाहेर पडताच गोठून गेले... माझ्या कानात अजून ते गुंजतात अगदी झाडावरल्या ताज्या गुलाबासारखे... मला नकळत माझा त्यांना स्पर्श होतो तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा