Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 11/10/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१४ हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! ... पुढे चालू... =============== अगदी एक,दोन,तीन असे सावकाश गतीनी आकडे उच्चारले तरी सगळे मिळून एका मिनिटात पूर्ण होतात. तशी वधुला वराकडून झरं..झरं..झरं..झरं..चालवून एका मिनिटात शेवटच्या पावलाला आणावी लागते.

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई.

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 11/10/2014 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
कैलाश आणी मलाला,तुमचा अभिमान आहे, नव्हे त्यापेक्षाही वेगळ काही वाटत तुमच्याविषयी, कुठे तरी आशेचा किरण जाणवतोय्,की जगात सगळेच प्रश्न काही तलवारीच्या धारेवर आणी बंदुकीच्या गोळीने सुटत नाहीत्,तुमच्याकडे पाहुन पटतय मला की प्रेमानेही आणी अहिंसेने बरच काही शक्य होते,ज्या सिद्धार्थ गौतमाचे,महात्म्याचे,आणी दिनदुबळ्यांची आई मदर तेरेसाच्या तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या माझ्या भारतभुमीचा उर आज आनंदाने भरुन आला असेल.

गंडलेल्या वाघाची कहाणी

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 11/10/2014 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोमेजून थकलेल्या वाघा येते ग्लानी, मरमर मरे रोज, कोण विचारींना पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही, अफझलखानात रमले सम्राट, वाघा स्कोपच नाही सांगायाचे आहे, या कवितेतून मला, गंडलेल्या वाघाची कहाणी तुला, आटपाट बम्बैजंगली गर्दी झाली भारी, बाहेरच्या जनावरांनी केली घुसखोरी, रोजरोज सम्राट तेंव्हा त्वेषानिया बोले, पण कृतीतून दाखवायचे राहूनीया गेले, जमलेचं नाही त्यावेळी त्यांना जरी, म्हणे यावेळी न्याय ते देणारच खरी, ओरबाडलेल्या रस्त्यांवरून मारू मग फेरी, डेंगूवाल्या मच्छरांच्या त्यात सरीवर सरी विकेन तो सारे जंगल, लाडक्या कॉनट्राक्टरला गंडलेल्या वाघाची कहाणी तुला, असा कसा कागदी सेनाप

नथ..................भाग-४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/10/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भा-३ नथ............भाग-४ वलिखान बाम्झाई....... ‘आमच्या धमन्यातून या स्त्रीचे रक्त वाहतेय’ हे वाक्य इस्माईलने म्हटले मात्र तेथे एकच गडबड माजली.

आल्प्सच्या वळणांवर - भाग २ - लिंडरहॉफ पॅलेस आणि रेशन पास

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 10/10/2014 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण दुसरा दिवस उजाडला. तसा पहिलाच. कारण मुख्य प्रवासाला सुरुवात होत होती. संध्याकाळपर्यंत नियोजित हॉटेलला पोचायचं एवढंच या दिवसाचं ध्येय होतं. त्यामुळे निवांत आवरून निघालो. सूर्यदेवाने सकाळीच एकदा दर्शन दिलेले दिसले आणि एक ओझे उतरले. जर्मनीतून बाहेर पडण्यापुर्वी पेट्रोल भरणे आवश्यक होते म्हणून ते काम केले.

नथ..........भाग-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ..........भाग-३ सौ. इंदिरा माधव भानू (खाजगीवाले) दिवाळी काबूलला साजरी काढायची हे ऐकल्यावर मला थोडे दचकायलाच झाले कारण नुकतेच आर्य व ह्यांच्यात झालेल्या संभाषणात मी तेथे काय झाले ते ऐकले होते.

"काही नाही… "

लेखक योगी_१९८५ यांनी गुरुवार, 09/10/2014 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो… त्या पैकी काही खालीलप्रमाणे… कधी कधी… इशश्य… कधी कधी… काही तरीच काय हो… कधी कधी… आता शांत बसा… कधी कधी…खाऊ कि मारू आता… कधी कधी…अरे बापरे!!!

"उलटे "

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा एक कामगार होता तो "उलटे "बोलण्यात व गाणे म्हणण्यात माहिर होता लाईट {कामगार भाषेत "लायटी"} गेले कि काम थांबायचे व आम्हि त्याला गाणे म्हणायला सांगायचो.. तो असे म्हणायचा.. वर ओरिजिनल (वरिजनल) खाली उलटे परदेसी परदेसी जाना नही मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल ना जाना ...................................... रपसेदी रपसेदी नाजा हनी झुमे डोछ के झुमे डोछ के रपसेदी रेमे राया दावा भानिना झुमे दाय खरनाहकी लुभ ना नाजा रपसेदी रपसेदी नाजा हनी झुमे डोछ के झुमे डोछ के गाण म्हणताना चाल लय सांभाळुन तल्लिन होऊन म्हणायचा..त्या मुळे मजा यायची खुप धमाल यायची..मस्त कर

मला भावलेलं गाणं

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 09/10/2014 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्‍हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता.

तुम्ही काय करता ?

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 09/10/2014 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते