कृष्णमयी
कातरवेळ झाली अन सकाळपासून तिच्या मनी दाटलेल्या हुरहुरीने आणखीनच उग्र रूप धारण केले. आज दिवसभर त्याचे दर्शन नाही. नित्यकर्मे करताना मनाची तहान वाढतच गेली. अन आता संध्याकाळी त्या व्याकुळतेने पुरते पिसे लावले.
अंधार दाटला, तसे राधेला काही सुचेना. शामसुंदर, श्रीहरी, कृष्ण काळा, कान्हा, मुरारी, मुकुंद, गोविंद, माधव, मिलिंद सगळी नावे आलटून पालटून घेऊन झाली. त्याची लोभस रूपे मन:चक्षुंनी हजार वेळा न्याहाळली.विशेष
मिसळपाव