दूरस्थ
प्रवासाला निघायचं म्हटलं की मन कसं हलकं-फुलकं होतं. तसं तर नेहमीच्या त्या रामरगाडयातून बाहेर पडायला मन सदैव उत्सुकच असतं. मनाच्या या उत्सुकतेचं निरीक्षण करताना जाणीव होते ती आदिमानवाची! आपल्या त्या पूर्वजाची! त्याच्यामधली ती भटकी प्रवृत्ती अजूनही आपल्यात जागी आहे अन् संधी मिळताच ती डोकं वर काढते याची जाणीव तीव्रतेने होते. ही संधी मग धंदा-व्यवसायासाठी करण्याच्या प्रवासाची असो की घरगुती भेटीगाठी किंवा कौटुंबिक सोहळे यांच्यासाठी असो! क्वचित प्रसंगी त्या विशिष्ट ठिकाणी पोचल्यावर या चार भिंतीतून त्या चार भिंतींमध्ये येऊन पडल्याची भावनाही निर्माण होईल. ते पुढचं पुढे!
विशेष
बेबी 3
या आठवडी बेबीच्या मनावरील बराच ताण हालका झाला होता, ती नेहमी प्रमाणे कामावर जात होती.
भविष्य......
"अरे, मी काय म्हणतो.उद्या मला यायला काही जमणार नाही"
"कारे"
"उद्या, काही मंडळी, भविष्य जाणून घ्यायला येणार आहेत.आता आपण म्हणजे काय? एक नंबरचे ज्योतिषी."
"बरं ठीक आहे.ती तर रात्री येणार नाहीत ना?मग आपल्या कार्यक्रमांत खंड नको.मी असेनच इथे."
"तरी पण जमणार नाही.कारण उद्या आपले आय.पी.एल. नाही का? उद्या आपले महाराज खेळणार बघ.आपले भविष्य काय वाया जाणार नाही.बेट लावतो का?"
"ओ.के. तू बघ आय.पी.एल. मी आपला एल.पी. झिंदाबाद."
--------
"काय रे!
प्रमोशन
आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता.
समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!"
त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच.
व्यक्त : कारण आणि परिणाम
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का?
टाकाऊ म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची उत्पादनं असतात ही?
आदि कैलास,ओमपर्वतदर्शन आणि पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-७
सहावा दिवस.
गालागढ ते बुधी. २२ किमी. उंची १०६०० फूट.
आजही कालच्याप्रमाणेच नाश्त्याचे पार्सल घेऊन प्रस्थान ठेवले. आज हवा कुंद होती, ढगाळ वातावरण होते. पण निसर्ग इतका सुंदर की त्रास अजिबात वाटत नव्हता. थोड्याच वेळात त्या सुप्रसिद्ध ४४४४ खडांज्या समोर ठाकल्या. सुरुवातीला छोट्या टेकडीवर एक सुबकसे मंदिर होते. दर्शन घेतले. तिथे एक गंमत दिसली. देवळाच्या मागच्या बाजूला एका उंचवट्यावर दोन खांबांना एक आडवी तुळई बांधलेली होती आणि तिला मोठी घंटा टांगली होती. तिचे प्रयोजन समजले नाही. कदाचित गावकर्यांशी संपर्क साधण्यासाठी ती योजना असावी.
खडांज्या उतरायला सुरुवात केली. मोठे कठीण होते ते उतरणे!
भविष्य (शतशब्दकथा)
''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत.
अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच !
पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच.
आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.''
''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . ''
''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते!
म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.''
''नको. . . हिंदीत नको. ''
''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?''
''छेछे , भलतंच काय?''
''ठीकाय तुमची इच्छा!
केमिकल लोच्या
कोण रे तू?
मासाच्या गोळ्यात अडकलेला तू ,
त्या मांसाच्या फ्रेशनेस वर अवलंबून आहेत तुझी इथली वर्ष ,
बाकी नियती वगैरे सगळेच खेळ मासातल्या काही सूक्ष्म तंतूंचे
अशाच दोन मांसाच्या गोळ्यांच्या असंख्य अदृश्य शक्तीपैकी एक सूक्ष्म अंश तू ,
कसल्या भ्रमाचे ,कल्पनांचे मनोरे नाचवायला निघालाहेस??
विश्व वगैरे अस काही नसत तुझ्या कवटीच्या बाहेर....
येडा कुठला ....
नाही देखिले पंचानना
हि गोष्ट मी गोव्यात असतानाची आहे. गोव्याच्या वास्को येथील नौदलाच्या रुग्णालयात काम करीत होतो. मी तेथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत राहत असे. दाबोळी विमानतळाच्या अगदी जवळ असलेली हि वसाहत अतिशय सुंदर आहे. दोन मजली इमारतीत चार घरे. खालच्या घरांना पुढे आणि मागे अंगण आहे. बाजूला मोटारीसाठी गैरेज आणि वरच्या मजल्यावर राहणार्यांना गैरेजच्यावर एक गच्ची. घरे सुद्धा सुटी सुटी आहेत. वसाहतीत रहदारी अशी नाहीच. त्यामुळे मुले फार सुखात आपल्या छोट्या सायकलींवर फिरत असत. त्यांची शाळा पण त्याच वसाहतीत आहे. त्यामुळे मुले दोन मिनिटात शाळेत पोहोचत.
विशेष
मिसळपाव