आठवणी
असाच एका संध्याकाळी आपल्या गच्चीवर बसलो होतो. सूर्याचं बहुतेक उत्तरायण सुरु होतं. मी इथे दीड वर्ष होतो. दिवस कसे झपकन निघून गेले समजलंच नाही अगदी त्या बुलेट ट्रेनसारखे. कितीतरी आठवणी आहेत ज्या मनावर कायमच्या कोरल्यात.
७.११.११ सकाळी माझा interview होता. जरासा उशीरच झाला. भरपूर कसरत करून हिंजवडीला पोहचलो. सरांना भेटायचं होतं. समोरच कंपनी दिसत होती. एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता. पहिला राउंड सरांनी घेतला, नंतर कंपनी मालकांनी बोलावलं आणि म्हणाले " आमच्याकडे दोन काम आहेत एक म्हणजे project आणि दुसरं म्हणजे panel manufacturing.
सरडा- काही क्षणिका काही म्हणी
महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे.
(१)
जेंव्हा त्यांच्या झाडावर होता
तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता.
जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला
आमच्याच सारखा इमानदार झाला.
(२)
जिभेच्या स्वाद पायी
मधुर फळांची मैत्री जोडी.
अहंता स्वताची त्यागुनी
सरडा झाला रंगनिरपेक्षी.
काही म्हणी:
- जिथे सरडा, तिथे सत्ता
- उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
- सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
- सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.
काव्यरस
तंत्रदर्शन-- १
तंत्र (भाग १)
जगातील सर्वांत जास्त पुरातन, आजही जगभर, सर्व धर्मातील लोकांचा ज्यावर विश्वास आहे असे तत्वज्ञान कोणते असे विचारले तर याचे उत्तर आहे "तंत्र".
विश्वात एक विशिष्ठ शक्ती आहे. काही तांत्रिक प्रक्रियांच्या (उदा. मंत्र, यंत्र, मुद्रा इ.) सहाय्याने या शक्तीस वश करता येते. ही वश झालेली शक्ती तुम्हास पंचमहाभूतांवर ताबा मिळवून देवू शकते व तुम्ही असाधारण कृत्ये करून दाखवू शकता असे हे तत्वज्ञान मानते. ही एक "यातु" विद्या आहे. यातु म्हणजे जादू. थोडक्यात तंत्र म्हणजे जादूटोणा. आता तुम्हाला पहिले वाक्य हास्यास्पद वाटेल. पण थोडे थांबा.
क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्या व्यापारी कंपन्या
क्रांतिकारी जगपालट घडवून आणणाऱ्या व्यापारी कंपन्या
माणूस भटकी जीवनावस्था सोडून एका जागी राहू लागला, शेती करू लागला. शेतीतून मिळवलेल्या अन्नाची साठवण केल्याने रोजची पोटासाठीची वणवण थांबली. मोकळा वेळ आणि साठवलेल्या अन्नामुळे सौदा करण्यासाठी आलेली ताकद कशी वापरावी याबाबत मानवाच्या सुपीक मेंदूने विचार सुरू केला नसेल तरच नवल. किंवा तसा विचार अगोदर केला म्हणून अन्नाची शेती आणि साठवण करण्याची गरज त्याला पडली असेल. कारण प्राचीन मानवांत प्रथम शेती आणि त्यामुळे एका जागेवर वस्ती असाच क्रम दर ठिकाणी होता असे दिसत नाही.विशेष
थोडे अद्धुत थोडे गूढ - ६
१८५२ सालची गोष्ट..
लंडन शहरातील हाईड पार्क चांगलेच गजबजलेले होते. विविध प्रकारच्या इमारतींचे आणि बांधकामक्षेत्रातील तत्कालीन चमत्कारांचे मोठे प्रदर्शन तिथे भरले होते. अनेक प्रकारच्या बांधकामाचे लहान-मोठ्या आकारातील नमुने तिथे ठेवण्यात आलेले होते. चोखंदळ ब्रिटीश नागरीक प्रत्येक बांधकामाचं चिकीत्सकपणे निरीक्षण करत होते. मात्रं सर्वांची राहून राहून नजर जात होती ती मधोमध करण्यात आलेल्या एक मोठ्या बांधकामावर...
१५२ फूट उंचीचा एक लोखंडी टॉवर!
प्रदर्शनाला आलेले सर्वजण उत्सुकतेने त्या टॉवरचं निरीक्षण करत होते.
गव्हाची पोती
एक वकील मित्र आहे त्याने सांगितलेला एक किस्सा
एक न्यायाधीश महाराज असतात,,खादाड असतात पण फार चतुर..
त्यांचा एक विश्वासू किराणा दुकानदार होता मारवाडी समाजांतला.
काम व्हावे म्हणून जी रक्कम ठरायची ति मारवाड्या कडे पोहोचती झाली की काम व्हायचे..
न्यायाधीश महाराज पण किराणा ध्यायच्या निमित्ताने दुकानात गेले की सांकेतिक भाषेत गप्पा चालायच्या..
नवीनं गहू आला की नाही दुकानात???
हो आला आहे ना ..
कविता समजुन घेतांना- भाग १
वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत.
आदिकैलास,ओमपर्वतदर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा भाग-१०
दहावा दिवस, अर्धी यात्रा संपन्न झाली. आता यात्रेच्या दुसर्या धेय्याकडे वाटचाल आज वीस कि.मि. चालुन एकदम गुंजी गाठायचे होते. मध्ये कालापानीमध्ये फक्त दुपारचे भोजन घ्यायचे होते. सकाळी दहा वाजता कालापानी मध्ये पोहोचलो. नबिढांग येथुन निघालो तरी सारखे मागे वळून बघत ॐ चे दर्शन घेत होतो, पाय निघतचे नव्हते. पण सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुते तुवा कधी फिरायचे हेच खरे, पुढे जाणेच होते. स्वयंपाक तयार होत होता म्हणून स्नाने उरकुन घेतली. भोजना नंतर निसर्गाचा पुनःप्रत्यय घेत तीन वाजता गुंजीला पोहोचलो.
अकरावा आदिकैलासपतीच्या दर्शनासाठी प्रस्थानाचा दिवस.
देव पूजा
एका गावात एक सधन श्रद्धाळू ब्राह्मण राहतं होता..
त्याला मुलगा व सून असते पण मुलगा आळशी अन वाया गेलेला असतो..
वडील म्हातारे झाल्याने देवपूजा कर असे ते त्याला कानी कपाळी ओरडून सांगत असायचे पण हा आळशी असल्याने त्याला त्याचा कंटाळा यायचा व तो वडिलांचे ऐकत नसे.
एके दिवशी वडीलांना कामानिमित्त आठवडा भर बाहेर गावी जायचे असल्याने निदान हा आठवडा तरी तू देव पुजा कर असे वडील बजावतात व कामासाठी बाहेर जातात..
मुलगा वैतागतो अन पुजा टाळण्यासाठी सासुरवाडीला जातो.
चहा पाणी होते व तो विचारतो की सासरे बुवा दिसत नाहीत?
यावर सासूबाई म्हणतात काम असल्याने ते सकाळीच बाहेर गावी गेले आहेत २-३ दिवसात परत येतीलच..
व म्हणत
मिसळपाव