सायकलींग... (भाग १)
उत्तरायण साठी झालेली पुणे ते बडोदा ट्रीप मनाप्रमाणे पार पडल्यामुळे २०१४ सालाची सुरूवात झकास झाली होती.
ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१३ पासूनच माझी गुजरात ट्रीपची तयारी सुरू होती तेथून परत येतानाच "आता पुढे काय..?" असा प्रश्नही डोकावत होता. त्या ट्रीपचा हँगओव्हर उतरण्यात दोनेक आठवडे गेले दरम्यान भीमाशंकर / गिरवली वगैरे भटकंती झाली.
मिसळपाव