(तमाशा)
प्रेरणा: गोंधळ
साल्या तू बेवडा मारताना
तुझे डोळे फार तांबारुन जातात
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
-----
गोठलेल्या पाण्यासारखी ती चिल्ड बीयर
आणि जळमटं पकडलेल्या
गंजलेल्या खिडकीतून दिसणारा
तो बर्ड व्हॅलीचा तलाव...
अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो
आणि सगळा लफडा होतो...
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
-----
साल्या तू बेवडा मारताना
बघता बघता बसल्या जागी तरंगू लागतोस
भरभर शिव्या बाहेर येतात
बाजूचे बेवडे तुझ्याकडे पाहायला लागतात
तुझ्या हेलकावे खाणार्या शरीराकडे पाहतात
मग त्यांचाही डोलकर होतो, आणि
सगळाच शिमगा आणि मग
सगळ्याचा कसा उगाचंच त
मिसळपाव