के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ३
जॉन स्मॉलीच आणि अॅलन पेनींग्टनच्या मृत्यूने हादरलेल्या अमेरिकन तुकडीने मोहीम आवरती घेतली आणि बेस कँप सोडला. त्यांच्यापाठोपाठ मिचेल पार्मेंटिअरने स्कार्डूची वाट पकडली. बेस कँपवर असलेल्या पाकीस्तानी अधिका-यांनी मारी अब्रेगो आणि जोसेमा कासिमीरो यांना विनापरवाना अॅब्रझी स्परने चढाई केल्याबद्दल ताब्यात घेतलं होतं ! अर्थात यामागील हेतू बेस कँपवरुन इस्लामाबादला सटकण्याचा आणि गिर्यारोहकांकडून पैसे उकळण्याचा होता हे उघड होतं.
अॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेतील गिर्यारोहकांची प्रगती फारच धीम्या गतीने सुरू होती.
मिसळपाव