१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ९
एव्हरेस्टच्या वायव्य धारेवर तिबेटच्या बाजूने चढाई करण्यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस आणि जपानी फुकोका मोहीमेव्यतिरिक्त इतरही अनेक मोहीमा शिखरावरील चढाईसाठी तळ ठोकून होत्या. मात्रं यापैकी कोणीही १०-११ मे रोजी चढाईचा प्रयत्न केला नव्हता !
इंग्लंडच्या चॅनल ४ - हिमालयन किंगडमची मोहीम एव्हरेस्टच्या पायथ्याला होती. सायमन लोवेच्या नेतृत्वाखालील या मोहीमेचं प्रमुख उद्दीष्ट ब्रिटीश अभिनेता ब्रायन ब्लेस्डच्या एव्हरेस्टवरच्या चढाईचं चित्रीकरण हे होतं. गाजलेला ब्रिटीश गिर्यारोहक अॅलन हिंक्स या मोहीमेचा भाग होता.
मिसळपाव