Skip to main content

ढोकळा

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 27/01/2014 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढोकळ्याच्या अनेक रेसिप्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत, पण ही एका गुज्जु मैतरिणीची बिनताकाची ही रेसिपी थोडी वेगळी वाटली म्हणून तुम्हा सर्वांसाठी- साहित्य- नेहमीचेच.. डाळीचे पीठ(बेसन) साधारण कपभर, २ चहाचे चमचे रवा, पाऊण ते १ चमचा खायचा सोडा, १/२ चमचा धणे खरगटून, १-२ हिरव्या मिरच्या + पेरभर आलं भरड वाटून्, साखर,लिंबू,मीठ,तेल,मोहरी,हिंग,खोबरे,कोथिंबिर कृती- अर्ध्या लिंबाचे २ चमचे साखर घालून पेलाभर सरबत बनवून घ्या. त्यात मावेल एवढे बेसन घाला आणि ढोकळ्याच्या पीठाला भिजवतो तितपर सरसरीत कालवा.साधारण कपभर पीठ लागते. त्यात २चमचे रवा, खरगटलेले धने १/२ चमचा, १ चमचा तेल,१चमचा आलं मिरचीचे वाटण घाला.

अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 27/01/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :
  1. अंगिरस (Epsilon of Ursa Major)
  2. अत्रि (Delta Ursae Majoris)
  3. क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
  4. पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
  5. पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
  6. मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
  7. वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).

प्रजासत्ता की प्रजा’सट्टा’

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/01/2014 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी. एक असा दिवस, ज्या दिवशी १९५० साली भारत, एक प्रजासत्ता म्हणून उदयास आला. एक असा दिवस ज्या दिवशी भारताची आपली अशी घटना, आपलं संविधान लागू झालं, आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळाले. मतदानाचा हक्क मिळाला. प्रत्येक भारतीय नागरिकावर एक जबाबदारी आली. राष्ट्र घडवण्याची, राष्ट्राचा उद्धार करण्याची. आज २६ जानेवारी हा दिवस खिशावर, गाडीत, स्कूटर वर झेंडे लावण्याचा, आणि त्या दिवसापुरता राष्ट्राभिमान दाखविण्याचा दिवस म्हणून उरला आहे, असं चित्र दिसतं. येत्या २६ जानेवारीला भारताच्या प्रजासत्ता होण्याला ६४ वर्ष पूर्ण होत आहेत.

अठरा श्लोकी मराठी गीता

लेखक खेडूत यांनी रविवार, 26/01/2014 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत असणे आणि अर्थ सुद्धा समजत असणे हे फारच विशेष आहे. कांही जणांना ती पूर्ण पाठ असते. तसेच माझ्या आईला पण संपूर्ण गीता पाठ आहे. तेही साठ वर्षांपासून! मला संस्कृत येत नाही याचे नेहमी वाईट वाटते. पुढे कधी तरी नक्की करायच्या गोष्टीत संस्कृत शिकणे सर्वांत पहिले आहे. आमच्या गावातल्या शाळेत संस्कृत हा विषय माझ्या ब्याच पासून बंद झाला, कारण म्हणे संस्कृत शिक्षकांचा तुटवडा. हे खरे नसावे असे वाटते कारण आमच्या शाळेतल्या तांबोळी नावाच्या मुस्लिम बाई संस्कृत मध्ये एम ए होत्या आणि त्याना हिंदी शिकवावे लागे म्हणून त्याना वाईट वाटे!

ट्रोजन युद्ध भाग ३.१- अकिलीसचे शेवटचे पराक्रम व मृत्यू.

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 26/01/2014 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ भाग २.५ ग्रीक एपिक सायकल- पार्श्वभूमी. मागील भागात पाहिल्याप्रमाणे हेक्टरच्या मरणानिशी इलियड संपते, तर ट्रॉयचा पाडाव झाल्यानंतर ओडीसिअस त्याच्या घरी इथाका येथे १० वर्षांनंतर पोहोचतो तो १० कालखंड ओडिसीमध्ये आलेला आहे.

नेईअप्पम

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 26/01/2014 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय पध्दतीचे गोडाचे आप्पे, नेई म्हणजे तूप...

जिजामाता उद्यान कट्टा - वृत्तांत

लेखक वडापाव यांनी रविवार, 26/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर जिजामाता उद्यानात जाण्याची आणि मिपा कट्ट्याला येण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे अनायासे एकाच तिकीटात दोन पक्षी मारायला मिळण्याची आयती संधी चालून आल्यावर ती मी सोडेन कशी?? ठरल्याप्रमाणे मिपा कट्टा सुरळीत पार पडला. त्याच्या वृत्तांताचा एक भाग मी, आणि दुसरा (माहितीपूर्ण) भाग सुंधाशूनूलकर यांनी फोटोंसकट मिपावर टाकायचा, असं ठरलंय!! कट्ट्यातले मी पाहिलेले आणि माझ्या लक्षात असलेले प्रसंग इथे सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. चू.भू.द्या.घ्या. राणीच्या बागेत घरची माणसं फार फार वर्षांपूर्वी गेली होती. त्यांनी मला 'कॅमेरा घेऊन जा' असा सल्ला दिला.

भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 26/01/2014 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते.

मानव : चिंपँझी आणि वराह यांच्या संकरातून बनलेला प्राणी ???

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 26/01/2014 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रायमेट नावाच्या पूर्वज प्रजातीपासून माणूस आणि ग्रेट एप प्रकारची माकडे उत्क्रांत झाली" आणि "ही उत्क्रांती डार्विनच्या सिद्धान्ताबरहुकूम हळूहळू होत गेली" हे दोन सिद्धांत शास्त्रीय जगतात आणि जनसामान्यात चांगले मान्यता पावलेले आहेत. एका शास्त्रीय संशोधनाला सुरुंग लावणारे इतर शास्त्रीय सिद्धांत मांडले जात नाहीतच असे नाही. पण वरच्या या दोन गोष्टी शास्त्रीय जगतात बर्‍यापैकी जम धरून बसलेल्या आहेत... किंवा खरेतर "आताआतापर्यंत जम धरून बसलेल्या होत्या" असेच म्हणावे लागेल.