Skip to main content

पुणे आंतरराष्र्टीय पतंग महोत्सव

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 01/02/2014 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या शनिवारि २५ तरखेला पेपरमधे पतंग महोत्सवाची जहिरात पाहीली.तसा त्याचा आधिपासूनच गाजावाजा चालला होताच,त्यात मिपावर अहमदाबादच्या महोत्सवाचे वर्णन आणि फोटो पाहिल्यावर तर महोत्सव मुलांसाठी तरी पहायला हवा असे वाटले.

सोयीस्कर गांधीवाद

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 01/02/2014 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
Premise Four: Civilization is based on a clearly defined and widely accepted yet often unarticulated hierarchy. Violence done by those higher on the hierarchy to those lower is nearly always invisible, that is, unnoticed. When it is noticed, it is fully rationalized. Violence done by those lower on the hierarchy to those higher is unthinkable, and when it does occur is regarded with shock, horror, and the fetishization of the victims.
-Derrick Jensen (Endgame)

नाटक...

लेखक psajid यांनी शनिवार, 01/02/2014 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी आकांत माझ्या ओशाळणारे ओठ हलले, ज्यांनी केले वार शेवटी धीर देऊन गेले ! वादळातील शरीर माझे पाहायला तमाशा आले, केले चौकात उभे ज्यांनी नजरा उंचावून गेले ! कारणे ऐकवण्या अपयशाची समीक्षक ते होऊन आले, देऊन धीर उसना भुंग्यांनी वासे पोकळ केले ! हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! फुंकर घालण्याचे नाटक सोद्यांनी हुबेहूब वटवले, उरात दडवल्या दुःखाची शेवटी किंमत करून गेले ! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली

फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 31/01/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्‍यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.

मदगन्ध

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 31/01/2014 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओठावर प्रणयी ओल स्नेहमय शब्द जिव्हाळ्याचे ओषाड घनातिल जणू धरेवर अगतिक वळवाचे सढळ समागम तृप्त विसावा खेळ ऐहिकाचे मोहरलेले अंग अंग उधळी मदगंध मनाचे ……… अज्ञात
काव्यरस

कान्हा नॅशनल पार्क - वाघ....... (भाग ४)

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 31/01/2014 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १) कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २) कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३) आज आम्ही खुप काही पाहिलं होतं..अनुभवलं होतं.. पहिल्यांदाच जंगलात फिरलो होतो.. एक अविस्मरणीय अनुभव घेतला होता.. पण....... .... पण कान्हा मध्ये वाघ पहायची शक्यता मी आणि माझ्या नवर्‍यापुरती तरी संपली होती... ...हिरमुसुन परतलो..

उदयाआधीच ग्रहण?

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 31/01/2014 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Modi-Pawar-secret-meeting… http://www.loksatta.com/desh-videsh-news/narendra-modi-sharad-pawar-sec… केजरीवालांनी सत्ता हाती घेतल्यावर काही दिवसात अपेक्षाभंगाला सुरवात केली. मोदींनी सत्ता मिळवायच्या आधीच केली की काय असे वाटू लागले आहे.

तुम्ही आय लव्ह यू च उत्तर काय द्याल?

लेखक सुवर्णमयी यांनी शुक्रवार, 31/01/2014 05:08 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हॅलेंटाईन्स डे" यंदा पौर्णिमेला येतो आहे (बहुधा.. ) म्हणजे अगदी दुर्मिळ असा योग! प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. (पडते म्हणजे तोंडघाशी पडते असा अर्थ घेऊ नये..) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

ट्रोजन युद्ध भाग ३.२- अकिलीसच्या शवाभोवतीची लढाई, अंत्यविधी व फ्यूनरल गेम्स. जजमेंट ऑफ आर्म्स आणि थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.

लेखक बॅटमॅन यांनी शुक्रवार, 31/01/2014 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ भाग २.५ भाग ३.१ अकिलीसच्या शवाभोवतीची तुंबळ लढाई- थोरल्या अजॅक्सचा महापराक्रम आणि ओडीसिअसची समर्थ साथ.

व्यवहार...

लेखक किश्या यांनी गुरुवार, 30/01/2014 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्य माथ्यावर आला होता. अजय आणि त्यांच्या शेतावर काम करणारा गडी गणपत लिंबाच्या झाडाखाली भाकरी ची परडी उघडी करुन बसले होते. गणपतने परडीवरच गाळान काढताच मस्त लसनाच्या ढेस्याचा मस्त वास वातावरनात घुमला. अजय आणि त्याने भाकरीवर मस्त ताव मारुन आडवे पडण्याच्या बेतात होते. "तुम्ही साळत जाता न्हव ? कितवीला हाईसा मालक? " गणपत, "मी पाचवीला आहे का रे?" अजय. "काई न्हाई असच विचारलं, मला बी साळत जायच होतं पण ४ थीत नापास झाल्यामुळे मला बा नं परत धाडलच न्हाई साळतं." गणपत..... हे सगळे होईपर्यंत अजय च्या डोळ्यावर झोप आली होती..