लेखकमुक्तचिंतकयांनी रविवार, 19/01/2014 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य
३ अंडे
२ बारीक चिरलेले कांदे
१ बारीक चिरलेला टोमाटो
३-४ ठेचलेल्या हिरव्या मिरच्या
२-३ चमचे कांदा लसून मसाला
१ छोटा चमचा तिखट
१ चमचा जिरे
हिंग व मीठ चवीनुसार
कृती
प्रथम एका नॉन स्टिक कढई मध्ये तेल तापवावे.
लेखकनिमिष ध.यांनी रविवार, 19/01/2014 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना बरीच मराठी गाणी ऐकली जायची. तसेही संगमनेर हे ग्रामीण आणि शहरी जीवनाचा संगम असलेले गाव होते त्यामुळे त्याकाळी आलेल्या "अरे संसार संसार" चित्रपटातील गाणी आवडीने सगळीकडे लावली जायची. एक सुंदर ग्रामीण चित्रपट आणि रंजना व कुलदीप पवार यांचा तितकाच सुंदर अभिनय.
लेखकAtul Thakurयांनी रविवार, 19/01/2014 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजकुमारच्या विक्षीप्तपणाबद्दल कोणी काही म्हणो पण तो एक जबरदस्त अभिनेता होता आणि त्याच्यासारखा स्क्रीन प्रेझेन्स असलेल्या अभिनेत्यांची गणना हिन्दीत तरी फार नसावी. त्यानंतर काहीतरी झाले आणि उतारवयात जानीसाहेब पडद्यापेक्षा मोठे झाले आणि घशातुन जास्तच खरबरीत आवाज निघु लागला. पूढे त्यावर अनेक मिमिक्री आर्टीस्टनी त्यावर टाळ्या मिळवल्या. "आपका मंगलसूत्र कहां है" असे बप्पी लाहीरीला ऐकवणार्या जानीचा येथे विचार नाही. मला भावलेला राजकुमार हा अतिशय संवेदनशील अभिनेता आहे.
लेखकप्रचेतसयांनी रविवार, 19/01/2014 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात.
लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.
लेखकविवेकपटाईतयांनी रविवार, 19/01/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते. त्या मुळे सौ. घरीच कांजी तैयार करते. सौ.चे माहेर दिल्लीतल्या शिवनगर (सिख आणि पंजाबी बहुल वस्तीतच आहे). कांजी लौह तत्वाने भरपूर स्वादिष्ट कांजी एक पाचक पेय आहे. कांजी मातीच्या, चीनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच बनविल्या जाते.
लेखकक्लिंटनयांनी रविवार, 19/01/2014 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला परिस्थिती अनुकूल असताना एखादा महत्वाचा निर्णय धडाडीने वेळेत घेतला नाही तर तशी अनुकूल संधी परत येतेच असे नाही आणि मग बस चुकते ती कायमचीच.अशा परिस्थितीत हळहळ व्यक्त करण्यापेक्षा फारसे काही करता नाही.आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात अशी वेळ नक्कीच येतात.मग राजकीय नेतेही त्याला अपवाद कसे असतील?माझ्या मते अशी वेळ एकदा नक्कीच आली होती.आयत्या वेळी महत्वाचा निर्णय घेताना लागणारी धडाडी न दाखविल्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे नेते व्हायची संधी त्यांनी घालवली.
३० मार्च १९९७ मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष सीताराम केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतला.त्यामागे तात्कालिक असे कोणतेच कारण नव
लेखकयुयुत्सुयांनी रविवार, 19/01/2014 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या...
स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते.
लेखकआनंदरावयांनी रविवार, 19/01/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/26634#comment-547109
मध्य प्रदेश सहल - ४ दिवस फिरण्याचे !
वरील लेख लिहिल्यावर त्याचा पुढचा भाग आज लिहितोय. कार्यबाहुल्यामुळे सवड झाली नाही. जे लोक पुढील भागाच्या प्रतिक्षेत होते आणि जे नव्हते त्यांची पण जाहिर माफी मागुन सुरुवात करतो.
दुसर्या दिवशी जरा उशिराच उठलो. कालचा driving चा शीण होता आणि कालचे सराफा बाजारात खाल्लेले असे काही अंगावर आले होते कि सकाळी डोळे लवकर उघडलेच नाही.
लेखकवडापावयांनी रविवार, 19/01/2014 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
विनाकारण छोट्याशा गैरसमजावरून मोठ्ठंसं भांडण झालं. नेहमीप्रमाणेच माझे जुने माफ केलेले (माफ करण्यापूर्वी घातलेल्या थैमानाचा आता, 'तरी मी शांतपणे सहन केलं होतं ते सगळं' असा न विसरता उल्लेख) अक्षम्य गुन्हे पुन्हा वर उपसण्यात आले!! मी सगळ्या शंकां-कुशंकांचं निरसन केलं, पण रूळावर पडलेल्या तीन मेजर धोंड्यांपायी गाडी जागची हलेना. नुसतीच भोंगा वाजवत बसली. वाजून वाजून शेवटी भोंगा थकला आणि गाडीने ट्रॅकच सोडून दिला.