Skip to main content

प्युअरसोतम - ला - देस्पांद

लेखक ज्ञानव यांनी मंगळवार, 24/12/2013 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
उर्फ पु.ल. वरील शिर्षकातले नाव त्यांनीच "अपूर्वाई" ह्या त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये फ्रांसच्या भेटीवर असताना घेतले होते. पु.ल. म्हंटल्यावर काही लांबलचक लिहून त्यांची ओळख वगैरे मी करून द्यावी ह्याची गरज नाही. पण मराठीतल्या विनोदाची उंची....सॉरी शुद्ध,निर्मळ,निर्भेळ विनोदाची त्यांनी गाठलेली उंची आजचे काही लेखक (त्याच्या पायथ्यापर्यंतही पोहचू शकत नसताना)गाठण्याचा प्रयत्न करताना पहिले की मला रावसाहेब आठवतात ते म्हणतात "बदला की वो चाऽऽऽल, ते दिनानाथ नाही का बदलले पण त्यांचा अधिकार होता म्हणतोय मी...." थोडक्यात आजचे लेखक "कोटीच्या" नावाखाली जे करतात त्याने खूप त्रास होतो.

मेट्रो येणार ..

लेखक देव मासा यांनी मंगळवार, 24/12/2013 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
आलि का मेट्रो ? म्हन्जे या नविन वर्शि तरि येइल का ? कि आपलि बोलाचि कढि आणी बोलिचाच भात ....या मेट्रो पाइ आम्हि मुंबईकराणी किति खास्ता खल्या , ते आंमचे आम्हाला ठाऊक , मुख्यंमंत्रि लाख झेंडा हलऊन जातात, दर वेळी पेपरात फोटो पण येतो छापुन ( हसरा फोटो येतो बर का ) पण ति मेट्रो बया काहि चालु होत नाहि....त्या मेट्रो रेल्वेच्या बांधकाम मजदुराणी जेव्हढा घांम गाळला नसेल तेवढा घाम बेस्टच्या ३४० क्रमंकाच्य प्रवाशि मंडळीनि गाळला आसेल आनि अजुनहि गाळत आहेत. ३४० बस म्हन्जे घाटकोपर ते अंधेरि प्रवासाचे एक -मेव सुलभ साधन.

गायत्री मंत्राचा सोपा अर्थ

लेखक अमित खोजे यांनी मंगळवार, 24/12/2013 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
बायकोच्या घरी चहा प्यायला म्हणून गेलो. चहा पीत असताना मेहुण्यांनी मध्येच एक बॉम्ब टाकला. "गायत्री मंत्राचा अर्थ माहिती आहे का?" चहा सगळा नाकातोंडातून बाहेर, एवढा जोराचा ठसका लागला. मनात म्हटले चहा पिताना गायत्री मंत्र नदीवरच्या भटाने देखील म्हटला नसेल तर यांना कुठून आठवण आली? नवीनच लग्न झालेले. त्यामुळे बायकोच्या घरी आपली इज्जत जायला नको म्हणून म्हटले पहिले मंत्र तरी आठवतोय का? लगेच मनातल्या मनात त्या मंत्राची उजळणी करून बघीतली. तेवढ्यात मेहुणे रावांनीच खुलासा केला. "या प्रश्नचा उद्देश तुझे संस्कृत ज्ञान वगैरे तपासणे हा नसून सोप्या भाषेत त्या मंत्राचा अर्थ हवाय हा आहे." "वा रे बच्चू!

त्रास

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 24/12/2013 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता.म्हणून आम्ही मुलुंडलाच एका चिनी आणि थाय खाद्यसेवा देणारया हॉटेलात जायचे ठरविले होते.मुळात मधलाच वार असल्याने हॉटेलात गर्दी नसेल म्हणून आम्ही जायचे ठरविले होते.माझा दवाखाना साडेआठला बंद होतो. त्यादिवशी आठ पंचवीसला कोणी रुग्ण नाही म्हणून मी माझ्या स्वागत सहाय्यीकेला दवाखाना बंद करायला सांगून जिना उतरत होतो. आता शांतपणे हॉटेलात बसून छानपैकी जेवूया या विचारत होतो. एवढ्यात एक तरुण जोडपे पंचविशीच्या आत बाहेर ( बायको पंचविशीच्या आत आणि नवरा पंचविशीच्या बाहेर) चिंताक्रांत चेहेर्याने समोरून येताना दिसले.

गारठा!

लेखक amit_m यांनी सोमवार, 23/12/2013 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
नको वाटणाऱ्या अलार्मच्या कर्कश्य आवाजाने त्याला जाग आली…तो उठून बसला…यांत्रिकपणे करायच्या पुढच्या सगळ्या हालचाली आता अंगवळणीच पडलेल्या. उत्तररात्रीच्या त्या अखेरच्या प्रहरात शुभ्र चांदणं पसरलेलं. "थंडी आहे रे खूप…असुदे" म्हणत आईनं बळेच दिलेल्या गोधडीकडे पाहताना त्याला लहानपणीचा गारवा आठवला. आई कधीचीच उठलेली आहे. स्वयंपाक घरातल्या पिवळट बल्बचा प्रकाश डोक्यावरून घेतलेल्या चादारीतूनही आत पाझरायचा. वडील बाहेरगावी जायचे असले कि त्यासाठी आईची लगबग चाललेली असायची. आपल्याला जाग येऊ नये म्हणून दबक्या चालीनच ती सगळी काम करायची.

'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 23/12/2013 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
... 'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे. 'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार. त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे. त्यातून 'गाय' हा मराठी माणूस.

चला व्हिएतनामला १० : हो ची मिन् शहरातला टेट पुष्पमहोत्सव

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 23/12/2013 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

मिपाकरलक्षणे

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 23/12/2013 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
| जय जय रघुवीर समर्थ | समर्थांसी मनोभावे प्रार्थुनी, मिपाकरांची काही येक लक्षणे डोळियांस दिसली ती श्रोतींयांस विनयपूर्वक सादर . || श्रीमिसळपाव || | मिपाकरलक्षणनाम समास प्रथम | ओम नमोजी संस्थळचालका | नीलकांता मिपामालका | कृपादृष्टीं सदस्यलोका | अवलोकिजे |१| तुज नमू रेवतीतै | अक्षयकान्ते आणि पैसातै | धागीं ठेवी कृपाहस्ते | लेखकुंच्या |२| वंदुनिया सल्लागारचरण | करूनिया संपादकस्मरण | परिक्षणार्थ मिपकरलक्षण | बोलिजेल |३| येक वोरीजिनल एक डूआयडी | उभयलक्षणे सरळ-कानडी | येकयेका घालुन सांगडी | शब्द मांडिले |४| डूआयडीचे लक्षण | पुढिले समासी वर्णन | सावधपणे वाचकजन | परिसोत
काव्यरस

खिम्याचे उन्डे

लेखक वासु यांनी सोमवार, 23/12/2013 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
जे लोक नोन्-वेज खातात त्यान्च्यासाठी साहित्य: १ किलो खिमा १ चमचा आल्-लसुण पेस्ट ३ चमचे लाल तिखट १/२ चमचा हळद १/२ चमचा गरम मसाला १/२ चमचा धने मसाला मीठ तेल कृती: प्रथम खिमा धुवून घ्यावा. नन्तर दगडी खलबत्त्यात(मिक्सर चालेल) खिमा चान्ग्ले बारीक वाटावे. नन्तर एका ताटात खिमा काढुन त्यात आल्-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने मसाला आणि मीठ घालुन ते एकजीव करावे व त्याचे हाताने गोळे करावे. आता एका कुकर मधे थोड तेल, (जास्त तिखट खात नसल्यास १ कापलेला टोमाटो टाकु शकता) घालुन फ्राय करावे. मग त्यात हे गोळे टाकावेत. त्यात थोडेसे पाणी टाकुन(फक्त शिजण्यापुरते) कुकर ला २-३ शिटी द्यावी.

पौष्टिक मूग भजी

लेखक वासु यांनी सोमवार, 23/12/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल रविवार होता आणि काहितरी चटक-मटक खाण्याचा मूड होता. मग मूग भजीची आठवण आली. मूग हे कडधान्य आहे आणि ते पौष्टिक पण आहे. घरात मिरची, कोथिंबीर, अदरक-लसूण, बेसन हे होतच. मग पटकन जाऊन भिजलेले हिरवे मूग घेउन आले.(भिजलेले हिरवे मूग नसल्यास मूगाची डाळ ३-४ तास भिजत घालावे) आता लगेच तयारीला लागले. साहित्य : २५० ग्राम भिजलेले मूग ४-५ हिरव्या मिरच्या (तिखट) आर्धी गड्डी चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा अदरक-लसूणची पेस्ट हळद जीरे बेसन मीठ आणि लाल तिखट तेल सौस / हिरव्या चटणी किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणी आता कृती: भिजलेले हिरवे मूग असल्यास बारीक वाटून घ्यावे.