सोने : बघावे, घ्यावे की -----
एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.-
आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या
व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या
बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे
काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे
क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच.
मिसळपाव