दिवा आणि ती
सजतानाही थिजलेली ती
रोज मनाचे द्वंद्व मनाशी
भिंतीवरती बापुडवाणा
दिवा एकटा जळे स्वतःशी
बोथटलेली जुनी वेदना
जशी काजळी दिसे दिव्याची
जळता अवचित विझून जाणे
हीच वंचना जन्मभराची
अशा तमातुन प्रकाश कोठे
कुणी कुणाचा ना कैवारी
दिवा जळो वा शील, सुखाचे
मोल सारखे त्या बाजारी
तिजला ठावे दैव स्वतःचे
आयुष्याच्या सरत्या वाती
जोवर आहे तेल वाहते
दाह सोसणे उरले हाती
-- अमेय
मिसळपाव