Skip to main content

चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 10/12/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत. “वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी!

सत्याची झडती

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 10/12/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरून जात होते. अचानक कानावर आरोळी आली. ‘कोणतेही पुस्तक , शंभर रुपये...’ पावलांना प्रतिक्षिप्तपणे ब्रेक लागला. वळून पहिले तर फुटपाथवर एकदोन इंच जाडीची बरीच पुस्तके मांडली होती. पायांनी लगबग केली. मांडलेल्या पुस्तकांवर नजर टाकली, तर दोन नजरेत भरली. ‘सत्याचे प्रयोग’ --- मो. क. गांधी. ‘झाडाझडती’ --- विश्वास पाटील. पण घ्यायचे धाडस होईना. राजकारण आणि भजन या दोन प्रकरणांपासून मी चार हात लांबच राहते. श्रीयुत मो. क. गांधी या दोन विषयांबद्दलच जादातर प्रसिद्ध ! आणि ‘पानिपत’ वाचून आलेली उद्विग्नता अजुनी आठवणीत आहे. त्यामुळे ही दोन पुस्तके हातात घेताना मन साशंक.

पिझा.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/12/2013 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कन्येची ही पाककृती देण्याची पद्धत मला भयंकर आवडली.

काळ्या किनारीचे सोनेरी पान

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 10/12/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास हा जेत्यांनी, राज्यकर्त्यांनी लिहिलेला असतो. त्यामुळे जेत्यांना नसलेले गुण चिकटवण्यात आणि पराभूतांना नसलेले दुर्गुण चिकटवण्यात इतिहासकारांचे बरेच श्रम खर्ची पडतात. त्यातून जर जेते वा राज्यकर्ते संकुचित, कोत्या, प्रतिगामी विचारांचे असतील तर विचारायलाच नको. राजकारणातील दबाव हे देखील एक कारण असू शकते. आधुनिक इतिहासकारांना मात्र लोकशाहीचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे अकबराच्या तथाकथित नवरत्नांपैकी एक असलेल्या अबुल फझलसारख्या तथाकथित इतिहासकारांची भाष्ये विश्वासार्ह अशा ऐतिहासिक पुराव्यांवर तपासून घेण्याची वेळ आलेली आहे असे काही मान्यवरांचे मत आहे.

"घन आज तो कठोर आहे"

लेखक वैभवकुमारन यांनी मंगळवार, 10/12/2013 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
"घन आज तो कठोर आहे" कीती फोडशील हंबरडा तू घन आज तो कठोर आहे ना थांबे तुझ रानापाशी कोणाशी तरी फितूर आहे तुझाच अश्रू तुझ्याच रानात गळण्यासाठी आतुर आहे कोरडी गर्जना ऐकवत कानी घन आज तो कठोर आहे आसुसलेली नजर तुझे ती नभापाशी का लाचार आहे नभी कडाडी वेजेची ती अर्थहीन पण वाचाळ आहे तुझेच काळीज पेटवायला पाणी हे एक हत्यार आहे दु:ख आपले गीळत बस तू घन आज तो फितूर आहे

जरा सांगा कुठे जाऊ !

लेखक आनंदराव यांनी सोमवार, 09/12/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रनो आणि मैत्रिनिनो , ४ दिवस मी आणि बायको फिरायला जाईन म्हणतोय. लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय हो. आम्हाला स्वताच्या गाडीने फिरण्याची फार हौस अहे. ( खाज?) आणि कोकण किनारपट्टी ला आमचे जाऊन झाले अहे. कोस्टल कर्नाटक पण झाले अहे. केरळ ४ दिवसात जाऊन होणार नहि. आणि कोलकत्ता वगैरे तर फारच लांब हो. म्हणजे आम्हाला कसे पाहिजे कि ट्रीप तर ४ दिवसाचीच झाली पाहिजे, पण ठिकाण पण बघून झाले पहिजे. मध्य प्रदेश - म्हणजे इंदोर वगैरे …. काय ? जरा कुठे जाऊ ते ठरवायला मदत करा कि. हक्काची विनंती आहे तुम्हाला .

जत्रा

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता, कवी ,सर्वांची माफी मागून जत्रा -भारनियमनाची हा भार सोसंना जनता झालीय हैराण गावात लाईट नाई बंद पडलीय गिरण , सांग तू माझ्या राजा कस आणू मी दळण , दिवाळी आली हि दारात पर नाई नाई लाईट हि घरात बोंब बोंब बोंब बोंब बोंब . . . . . . -------------विनय गदो