Skip to main content

महाराष्ट्र खगोल संमेलनाचा अविस्मरणीय अनुभव!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 31/01/2023 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन ✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद ✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton ✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था ✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी ✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश ✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट! ✪ GMRT येथील व्याख्याने, चर्चा सत्र आणि आकाश दर्शन ✪ व

आजीचे बोल--फार अनमोल!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 31/01/2023 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! माझी आजी(आईची आई) कोकणातील देवरुखजवळच्या एका खेड्यातली होती. तिच्या लहानपणीच तिची आई वारली आणि सगळ्या भावंडात आजी मोठी असल्याने लहान वयातच तिच्यावर स्वयंपाक करण्यापासुन, सगळी घरकामे ,भावंडांचे करणे वगैरे जबाबदारी आली. वडील शाळामास्तर होते, त्यांनी मुलांना चांगले शिकवले, पण मुलींना त्या मानाने कमी शिकवले, कदाचित तो काळच तसा होता(१९२०-३०). पुढे आजी लग्न झाल्यावर ठाण्याला रहायला आली, पण २ मुली झाल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तिचा नवरा जलोदराने गेला.( म्हणजे काय नक्की माहित नाही).

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ६: पालमपूर ते डलहौसी प्रवास व पर्यटन स्थळे

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 31/01/2023 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५ येथे वाचा आज पालमपूरचे हॉटेल सोडून डलहौसीला मुक्कामी जायचे होते त्यामुळे सकाळी उठून बाहेर फेरफटका मारायचा विचार रद्द केला. आमच्या फॅमिली कॉटेजला आतूनच लाकडी जिना असलेली व छपराच्या तिरक्या भागात अजून एक खोली होती ज्यात ३-४ जणांची झोपण्याची व्यवस्था सहज होऊ शकेल.

पैशाचे झाड- भाग शेवटचा

लेखक अतरंगी यांनी मंगळवार, 31/01/2023 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 भाग ५ https://www.misalpav.com/node/51053 दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच अमोलचा मेसेज आलेला पाहून अभिने कुतूहलाने तो मेसेज ऊघडला.

पैशाचे झाड- भाग ५

लेखक अतरंगी यांनी सोमवार, 30/01/2023 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 अमोलच्या डोक्यात चाललेल्या विचारांनी त्याला चांगलंच पछाडलं होतं. त्याला जितका विचार करु तितके जास्त प्रश्न पडत होते. गुंता वाढतच चालला होता.

ही माहीती कशी शोधावी?

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 29/01/2023 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कधी कधी एक प्रकारची माहीती शोधत असतो. जसे की मला तांदुळ विकत घ्यायचे आहेत.म्हणुन तांदुळ विकणारे कोण हे शोधायला गेलो कि लगेच मिळतात जे तांदुळ सप्लाय करतात. पाहीजे तेवढ्या प्रमाणात तांदुळ विकत घेता येतात. ह्यांना आपण सप्लायर बोलुया. हे स्त्रोत आहेत 'सप्लाय' चे. ह्यांचा शोध घेणे काही कठीण नाही. एक मागितले की दहा मिळतात. पण जेव्हा कधी आपण तांदुळ विकायचे आहेत, म्हणुन तांदुळ विकत घेणा-यांचा शोध घेतो. तेव्हा ते मिळत नाहीत. आता शोधयचे आहेत जे तांदुळ विकत घेणारे म्हणजे बायर्स आहेत. ह्यांना आपण 'बायर्स' बोलुया. हे स्त्रोत आहेत 'डीमांड' चे. ह्यांचा शोध घेणे कठीण आहे.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 28/01/2023 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 28/01/2023 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

शशक- औताचा बैल

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 27/01/2023 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची वेळ. बंडू शाळेत जाताना माझे लाड केल्याशिवाय पुढे जातच नाही. मालकही रोज पाठीवर थाप मारणारच, दिमतीला गडी ठेवलाय.मी माझ्या बापासारखाच शर्यतीचा बैल आहे.या मालकाला माझ्या बापाने भरपूर बक्षिसे मिळवून दिली म्हणे. पण बरेच दिवस झाले नेहमीसारखा खुराक मिळत नाहीये. मालक कायतरी बोलत होते. बैलगाडा शर्यत ,कोर्टाचा निर्णय, औताला जुंपूया. संध्याकाळची वेळ.मालक मला शेतात घेऊन आलेत. मस्त वारा वाहतोय. अरेच्चा!!हे काय?चारी पाय बांबूला बांधून मला खाली पाडले. अचानक खाट खाट आवाज आले. सण्णकन डोक्यात कळ गेली आणि डोळ्यापुढे अंधारी आली. मोठ्याने ओरडायचे होते, पण तोंडातून शब्दच फुटले नाहीत.

शापित यक्ष!--१

लेखक भागो यांनी गुरुवार, 26/01/2023 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
I am Ubik. Before the universe was I am. I made the suns. I made the worlds. I created the lives and the places they inhabit; I move them here, I put them there. They go as I say, they do as I tell them. I am the word and my name is never spoken, the name which no one knows. I am called Ubik but that is not my name. I am. I shall always be. ------------Ubik-Philip K Dick त्याचे नाव? पहा मला पण नेमकं आठवत नाही. काही तरी “स” ने सुरुवात होणारे होते. समीर? सदानंद? सज्जन? सतीश? सत्येन? नाही. असं बंगाली वाटणारं निश्चित नव्हतं. नावात काय आहे?