Skip to main content

शशक- अशीही एक धुंद, गुलाबी सकाळ

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 23/01/2023 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी- झालं का ग तुझं? ती - उम्म, अजून नाही रे, तुमचं पुरुषांचं बरं असत. झट की पट काम. लगेच कपडे घालून तयार.बायकांचं तसं नसत ना? आम्हाला वेळ लागतो. मी-ते काय मला माहित नाही? झाली की आता लग्नाला १५ वर्ष. ती - पण उपयोग काय? अजूनही सांगायला लागत सगळं तुला. मी- बायकांना ना असं वाटतं की नवऱ्याने न बोलताच आपल्या मनातलं ओळखावं. ती - जाऊदे तो विषय. सांगून सांगून थकले मी. मी- डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? चिकाटीने प्रयत्न करत राहा. जमेल. ती- त्यांना काय जातंय सांगायला? एकतर मरणाची थंडी. मी- जाऊदे. येणारेस का तू मॉर्निंग वॉकला?नाहीतर मी चाललो.

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 23/01/2023 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात! ✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड ✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर! ✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन) ✪ सायकलिंगचे मानसिक पैलू ✪ भाषेचा अडथळा?

पैशाचे झाड- भाग १

लेखक अतरंगी यांनी सोमवार, 23/01/2023 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो" "बोल" " कुठे आहेस?" " घरी" "किती वेळ लागेल?" "का?" "अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?" "कोण थांबले आहेत? आणि कुठे?" विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय? "अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?" "नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? " "नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.." "स्टॉक आहे की घेऊन येऊ?" "अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत.

शशक- निवडणूक

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 22/01/2023 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे. मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा. तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा. मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले. तो- तुम्ही कायले टेन्शन घेताय? आपली मानसे असत्याल, सगळ्यांकडे घोडे असणार.काय लोचा झाला तर ते निस्तारत्याल. मी- काय राव तुम्ही तर सगळं प्लॅन करून ठेवलाय. किती न्यायचेत? तो-- जास्त नाही. ५० लाख.

एक धुंद, गुलाबी सकाळ!

लेखक Bhakti यांनी रविवार, 22/01/2023 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांपासुन ग्रुप ट्रेक करायचा विचार होता.आज जरा योग जुळवून आणला.शहरातच जवळ २० किमी.वरचा छोटासा ट्रेक करायच ठरवलं.नवर्याला म्हटलं उठ पहाटेचे ४.३० वाजलेत.म्हणाला काय गरज आहे थंडीच,८.३०,ला जाऊ.मी म्हटलं "ठीक आहे माझं आवरत १५मिनिटात जाते एकटी" एकटी शब्द ऐकून स्वारी १० मिनिटांत रेडी आणि चहापण रेडी झाला ..वार बरोबर झाला तर ;) कुट्ट अंधारच होता.बाईकवर निघालो.उड्डाणपुलाची तिरंगा रंगातील रोषणाई म्हणजे एक आकर्षणाचा विषय आहे हल्ली.त्याचा व्हिडिओ काढत .सगळे जमणार त्या ठिकाणी पोहचलो.जास्तप्रमाणात महाविद्यालयीन युवक होते.विशालदादा आला त्याने सर्वांना शेनुडी ट्रेकची माहिती दिली.अंधार आहे, औरंगाबाद हाय

विसरु नकोस नाते

लेखक सागरसाथी यांनी रविवार, 22/01/2023 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई. सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा श्वासास दोष इतका देवू नकोस बाई. वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई. ---- अभय बापट
काव्यरस

हा उन्हाचा गाव आहे.

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 22/01/2023 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे? पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे. शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो? का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे? जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे. लाच घेऊनी अता विकती इमान आपुले जी कधी मज सभ्य तेव्हा वाटलेली माणसे. हो भले अथवा बुरे, ना काळजी येथे कुणा का मनाने येथली ही गोठलेली माणसे?
काव्यरस

How to make sense in the age of tiktok?

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी रविवार, 22/01/2023 05:37 या दिवशी प्रकाशित केले.
चोबाजूंनी ‘कन्टेन्ट’ नावाची गोष्ट आदळत आहे. थोडेसे स्मरणरंजन आणि माझी कन्टेन्टसुकाळापूर्वीची जिज्ञासा - मी लहान होतो तेव्हा टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायची पद्धत होती. अभ्यासू मुलांनी टीव्हीवगैरे पाहू नये असं कायम सांगितले जायचे आणि टीव्हीपासून आवर्जून दूर लोटले जायचे. टीव्ही हे कधी कधी इडियट बॉक्स आहे हे मलाही पूर्णपणे पटले होते कारण सगळे कुटुंब मिहीर कधी परत येणार या चिंतेत कामं धामं सोडून टीव्ही समोर येऊन बसायचे. परंतु मला टीव्ही नेहमीच इडियट बॉक्स वाटत नसे. टीव्ही पाहायचो ते फक्त डिस्कवरी आणि हिस्टरी या दोन चॅनेल्ससाठीच. Nat Geo आमच्या केबलला लागायचे नाही.

नकोसा (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी शनिवार, 21/01/2023 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं, तुला खरंच वेड लागलं असलं पाहिजे. अशा हवेत फिरायला जायचंय तुला? गेले दोन महिने बघतोय, काहीतरी विचित्र कल्पना येताहेत तुझ्या डोक्यात. माझ्या इच्छेविरुद्ध मला समुद्रकिनाऱ्यावर आणलंस. आपल्या लग्नाला चव्वेचाळीस वर्षं झाली, पण इतक्या वर्षांत कधी असली लहर आली नव्हती तुला! त्यातून गाव कोणतं निवडलंस, तर फेकाम्प. कसलं बेक्कार कंटाळवाणं आहे हे गाव. मला विचारायचंस तरी आधी. आता काय तर म्हणे, गावात फिरायला जाऊ. एरव्ही कधी पायी चालत नाहीस ती! दिवस तरी कोणता निवडला आहेस? वर्षात कधी नसतो इतका उकाडा आहे आज. जा, त्या द अप्रवॅलला विचार . तू सांगशील ते करायला तयार असतो तो.

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ५- बीर बिलिंग व बैजनाथ मंदिर

लेखक गोरगावलेकर यांनी शुक्रवार, 20/01/2023 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४ येथे वाचा कालची संध्याकाळ पालमपूर येथील सौरभ वनविहारला फेरफटका मारून खूपच छान व्यतीत झाली होती. पालमपूर म्हणजे धौलाधर पर्वतरांगेच्याकुशीतील एक नयनरम्य ठिकाण. कांगड्यातील धर्मशाळा-मॅकलॉडगंजनंतर पालमपूर हेच मोठे शहर. येथील निसर्ग व आजूबाजूच्या परिसरातील किल्ला, मंदिरे या गोष्टींमुळे पर्यटनासाठी हे एक उत्तम ठिकाण. येथील थंड व आर्द्र वातावरण, पाऊस तसेच नदी, ओढे यामुळे मिळणारे मुबलक पाणी, पाण्याचा निचरा व्हावा म्हणून जमिनीचा उतार असे चहाच्या पिकासाठी अगदी उत्तम वातावरण.