यमन
हल्ली संध्यकाळी मस्त गार वारे सुटतायत. असच अचानक त्या दिवशी ते सूर पुन्हा मनात घुमू लागले. आतल्या आवाजामुळे त्या संध्येचे रंग अजून खुलू लागले. मला संगीतातलं शास्त्र खरच कळत नाही पण हि सुरावट माझ्या मनात एकदम पक्कं घर करून राहिलिये. शाळा-कॉलेज च्या वयात असताना फिल्मी गाणी, खास करून हिंदी ऐकायची खूप सवय पण फार तर फार समजले तर शब्द कळणार. आणखी गाण्यात काय ऐकण्यासारखं असत? असं मला वाटायचं . आता एक-दोन वर्षापूर्वी थोडी थोडी मराठी गाणी ऐकायला लागलो .
मराठी वाहिनीवर आलेल्या एका प्रसिद्ध स्पर्धेत तर अजून बरीच गाणी ऐकायला मिळाली.
मिसळपाव
पहिल्यांदाच सांगते, ही पाकृ माझी नाही हं. याची कर्ती-करवती माझी वहिनी शिल्पा. तिचं माहेर हुबळी.तीच या पाकृची अन प्रतिसादांची मालकीण.
दिवाळीचा गोडधोड फराळ खाऊन झाल्यावर भाऊबीजेला भाऊरायाला ओवाळायला कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूरची पद्धत अशी की दिवाळीचा फराळ खाऊन ‘गुळमाट’ झालेलं तोंड भाऊबीजेला ‘वशाट’ खाऊन खंगाळायचं ! घरोघरी भाऊबीजेला मटण ! या भाऊबीजेला आमच्या भावांना (मायंदाळ हैत ) खिम्याच्या गोळ्यांचा आठव आला. झालं ! शिल्पा हुबळीची.