Skip to main content

खोटे बालंट टाळण्यासाठी काय करावं?

लेखक मन१ यांनी गुरुवार, 22/11/2012 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
सल्ला हवा आहे.(मिपाकर आनंदाने फुकटात देउ शकतील अशी ही एक महत्वाची गोष्ट.) बालंट आल्यावर काय करावं? आम्ही तीन जण कथेतील पात्रे आहोत.मी, माझा मित्र महेंद्र आणि महेंद्रचा मित्र जग्या. समजा महेंद्र ह्या माझ्या मित्राचे बायकोशी पटत नाही. एक दिवस त्याने येउन मला सांगितलं की "जग्या काल बायकोशी का पटत नाही असे मला विचारत होता. तु जग्याला माझं बायकोशी पटत नाही असं का सांगितलस?" . वस्तुस्थिती:- जग्याशी माझी काहीही ओळखपाळख नाही. महेंद्रचा मित्र म्हणून फार तर "परिचित" इतकच म्हणू शकतो. मागील कित्येक वर्षात माझा जग्याशी धड संपर्कही नाही. मगः- जग्यानं असं खरच सांगितलं असावं का?

*......................एक नाजुक परी..............*

लेखक प्रेमवेडा यांनी गुरुवार, 22/11/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक नाजुक परी आली आमुच्या घरी दिवे लागले दारी आप आंगे स्वतः || * दुडू दुडू रांगत फिरे अवघ्या घरात आनंद काळजात उठे पाहुनिया || चिमुकले दोन दात आले बोळक्या मुखात जे जे दिसते घरात पाही चाखावया || तुरू तुरू चालत आवडे दुधभात भोवताली पसारा जमा करुनिया || ती चिमुकली परी झाली राजकुमारी सुकुमार, निघालो आम्ही शोधावया |||| * = आपोआप

कसाबच्या निमित्ताने......

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 22/11/2012 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
चला,उशिरा का होईना,भारत सरकारला एकदाची जाग आली आणि कसाब फासावर लटकला. पण हा खरंच भारताने दहशतवाद्यांना शिकवलेला धडा म्हणावे का? एक कसाब मारायला आपल्या देशाची ४ वर्षे आणि ४० कोटी रुपये खर्ची पडले. असे अनेक कसाब तिकडे पाकिस्तानात दिवसाला १०० पैदा होत आहेत. ते सगळे जर अंदाधुंद सुटले तर ते आपल्याला कितीला पडणार आहे ? आजच पेपरात कै मेजर संदीप उन्नीकृष्णन याच्या वडिलांचे विचार वाचले. ते म्हणतात की दहशतवादी कधीच धडा वगैरे शिकत नसतात. ज्यांचा धर्मच जिहाद आहे त्याला मरणाची भीती वाटतच नसते. आपल्या सहिष्णू सरकारकडे अजून ही अफजल गुरूच्या दयेचा अर्ज प्रलंबित आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन २०१२

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 22/11/2012 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
संसदेचे २०१२चे हिवाळी अधिवेशन आज, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. त्या सत्रासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, एकूणच संबंधीत राजकारणावर चर्चा करण्यासाठी, मांडलेल्या बिलांवर मिपाकरांची मते समजून घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे. यात शक्य तितके दररोज काल काय झाले आणि आज संसदेपुढे कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेच.

काळ, काम आणि पेग

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 22/11/2012 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या काळ, काम आणि वेग ह्यांच्या गणितातले वाद रंगात आहेत. गणित शास्त्रींना ते सोडवू देत. कोणी "पेग" असे देखील वाचले होते. त्यावरून काही कोडी आठवली. त्यांची उत्तरे कोणाला देता आली तर पहा.... १) काम आणि पेग ह्यांची काळवेळ कोणती? २) काल, काम आणि पेगसाठी गमावला, तर आज आणि उद्याचे काय? ३) किती काळ पेग घेतले तर काम पूर्ण होते?

मासे ३८) भाकस

लेखक जागु यांनी गुरुवार, 22/11/2012 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
भाकस मासा एका बाजुने चपटा असतो. चपटी बाजू पांढरी असते तर वरची बाजू फुगीर व खवलांनी भरलेली काळी असते. साधारण हलव्यासारखी. ह्याची खवले काढावीत व तुकड्या करून घ्याव्यात. जर रस्सा आणि तळायचेही असतील तर मधल्या चांगल्या तुकड्या तळण्यासाठी घ्यावात व डोके आणि शेपटाकडील तुकड्या रश्यासाठी वापराव्यात. रस्सा इतर रश्यांसारखाच ओल्या खोबर्‍याच्या वाटणाने करतात.

कॉमन मॅन, सायंटिस्ट, इंजिनियर आणि एक कोडे

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 21/11/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वी मिसळपाव या संस्थळावर एक सोपे वाटणारे कोडे दिले गेले होते. ते असे होते, "वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल?" सर्वसामान्य माणूस (कॉमन मॅन) असा विचार करेल, "दोन लिटर पाणी निघायला १ मिनिट लागले, या गतीने वीस लिटर पाणी दहा मिनिटात बाहेर पडेल." हे प्राथमिक शाळेतले साधे त्रैराशिक झाले, यात कोडे कसले आले?

किल्ले शिवनेरी

लेखक saumitrasalunke यांनी बुधवार, 21/11/2012 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक: शनिवार, ०३ नोव्हेंबर २०१२ दुर्गस्थ: सौमित्र आणि सुनिता साळुंके पहाटे ०६ वाजता माळशेज मार्गे जाणारी कुर्ला नेहरूनगर–जुन्नर गाडी पकडून निघालो. मुरबाडच्या पुढे आल्यावर जीवधन–खडा पारशी–नानाचा अंगठा याचं सुरेख दर्शन झालं. या मार्गावर आम्ही दोघेही प्रथमच येत होतो तेव्हा डावीकडे हरिश्चंद्रगड, पिंपळगाव जोगा जलाशय बघून भान हरपलं. साधारण ११ च्या सुमारास जुन्नरला पोहोचलो. शिवनेरी एका दिवसात करण्याजोगा आहे मात्र मुक्काम करावयाचा असल्यास लॉजिंगची व्यवस्था आहे. मात्र त्याचं बुकिंग वगैरे करूनच यावं. थोडी विश्रांती घेऊन आम्ही साडेतीन वाजता गडाकडे प्रयाण केले.

मैत्री

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
"भावना" आणी "नाती" बदलतात का ? जसे ॠतू बदलतात ? जसी माणसे बदलतात .! का ति बदलून हि ह्र्द्यात जस्सीच्या तस्सी राहतात ...? Graduation सम्प्ल्यानन्तर सारेजण आपापल्या रस्त्याने गेले.. एक जण bank manager ,एक जण engineer - अमेरिकेत , एक जण "यशदा " मधे UPSC ची तयारी...! एक जण PSI ! आणी एक जण MPSC ची तयारी ! - अन तयारी करत असताना "गाव कामगार तलाठि" ..! काल सर्वच भेटले..कोलेजात असताना चहा किवा नाश्त्याचे पैसे देताना कधीच दुरावा वाट्ला नाहि..पण काल " Teachers " विकत घेताना जो दुरावा जानवला..तो मनात काहुर माजवनारा ....त्या वेळि सग्ळ्याची लायकि सारखीच होती..आत्ता पगारात लायकि वाटली गेली..!